Join us

उन्हाळ्यात पचन सुधारण्यासाठी डिंक खा आणि चमकदार त्वचेसाठी चेहऱ्यालाही लावा, पाहा डिंकाचा भन्नाट उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2025 13:29 IST

Ways To Use Gond Katira On Face Benefits : Essential Summer Skincare Tips for a Healthy Glow : Major Benefits of Gond Katira for Your Skin : उन्हाळ्यात त्वचेला नैसर्गिक थंडावा मिळावा म्हणून लावा 'हे' खास डिंकाचे फेसपॅक...

उन्हाळ्यात आपल्याला अधिक एनर्जी आणि हायड्रेशनची सर्वात जास्त गरज असते. रणरणते ऊन, वातावरणातील वाढती उष्णता आणि घाम यामुळे त्वचा रुक्ष, निस्तेज, काळवंडलेली तसेच (Ways To Use Gond Katira On Face Benefits) थकलेली दिसते. उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासोबतच त्वचेची (Essential Summer Skincare Tips for a Healthy Glow) देखील काळजी घेणे गरजेचे असते. उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण काही नैसर्गिक उपाय घरच्याघरीच करु शकतो. उन्हाळ्यात शरीराला आतून थंडावा देण्यासाठी आपण सरबतं किंवा इतर पदार्थांमध्ये डिंक घालतो(Major Benefits of Gond Katira for Your Skin).

डिंक हा आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक व औषधी असतो, त्यामुळे उन्हाळ्यात डिंक खाणे फायदेशीर ठरते. असा हा बहुगुणी डिंक खाण्यासोबतच जर आपण त्वचेसाठी देखील त्याचा वापर केला, तर उन्हाळ्यातील त्वचेच्या अनेक समस्या देखील कमी होतात. यंदाच्या उन्हाळ्यात डिंक खाण्यासोबतच, त्वचेला देखील लावून त्वचेची काळजी कशी घ्यावी ते पाहूयात. 

उन्हाळ्यात त्वचेला लावा डिंकाचे थंडगार फेसपॅक... 

१. डिंक आणि मध :- एका बाऊलमध्ये डिंक घेऊन तो रात्रभर गुलाब पाण्यांत भिजत ठेवा. सकाळी हाच डिंक फुलून त्याचे जेलमध्ये रूपांतर झाले असेल. यात १ ते २ टेबलस्पून मध घाला आणि हा तयार फेसपॅक चेहऱ्यावर लावून १५ ते २० मिनिटे चेहऱ्यावर तसाच राहू द्यावा. गुलाबपाणी त्वचेला टोन्ड करण्याचे काम करते, तर डिंक गमावलेला ओलावा परत मिळवण्यास मदत करते. याचबरोबर, मध त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास फायदेशीर ठरते. विशेषतः उन्हाळ्यात हा फेसपॅक त्वचेला थंडावा देण्यासाठी, जळजळ आणि कोरडेपणा कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. 

तुम्हांला लांब केस चांगले दिसतील की शॉर्ट, कसे ओळखालं ? करून पाहा ही भन्नाट ट्रिक - मिळेल परफेक्ट लूक...

२. डिंक आणि मुलतानी माती :- ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांनी मुलतानी माती आणि गुलाब पाण्यात भिजवलेला डिंक एकत्रित मिसळून फेसपॅक तयार करावा. १ टेबलस्पून भिजवलेला डिंक घ्या, त्यात १ टेबलस्पून मुलतानी माती थोडे गुळपाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. मुलतानी माती त्वचेला खोलवर स्वच्छ करते आणि जास्तीचे तेल त्वचेतून शोषून घेते. डिंक त्वचेला मॉइश्चराईझ करते. तेलकट आणि मिश्र त्वचा असणाऱ्यांसाठी हा फेसमास्क विशेषतः फायदेशीर आहे.

३. डिंक आणि एलोवेरा जेल :- गुलाब पाण्यात रात्रभर भिजवलेला डिंक जेल स्वरूपात झाल्यावर तो एका बाऊलमध्ये काढून घ्यावा. आता यात १ टेबलस्पून एलोवेरा जेल मिसळून त्याचा फेसपॅक तयार करून घ्यावा. हा तयार फेसपॅक चेहऱ्यावर लावून मग १५ ते २० मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. एलोवेरा जेल आणि डिंक या दोन्हींमध्ये त्वचेला थंडावा देणारे गुणधर्म असतात.  यामुळे उन्हाळ्यात होणारी त्वचेची जळजळ, रॅशेज आणि खाज यापासून आराम मिळतो. या फेसपॅकमुळे त्वचा उन्हाळ्यात ताजीतवानी होते. 

चेहऱ्यावर येईल नॅचरल गुलाबी ग्लो, पाहा 'ब्लश' लावण्याची सेलिब्रिटी टेक्निक! गाल दिसतील आलिया-दीपिकासारखे...

उन्हाळ्यात त्वचेवर डिंक लावण्याचे फायदे... 

१. डिंक उन्हाळ्यात त्वचेला थंडावा देतो आणि त्वचेची जळजळ कमी करतो. याचबरोबर, त्वचेतील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतो, ज्यामुळे उन्हाळ्यात त्वचा हायड्रेटेड आणि मऊ राहते.   

२. डिंक त्वचेवरील सुरकुत्या, बारीक रेषा आणि एजिंगच्या खुणा कमी करण्यास मदत करते. याच्या नियमित वापराने त्वचा कायम तरुण राहते.

३. डिंक उन्हाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या जसे की सनबर्न, रॅशेस आणि ऍलर्जी सारख्या समस्या बरे करण्यास मदत करते. यातील थंड गुणधर्मामुळे त्वचेला त्वरित आराम मिळतो.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीसमर स्पेशलहोम रेमेडी