Join us

उन्हाने त्वचा निस्तेज झाली, तुरटीचा सोपा असरदार उपाय, चेहऱ्यावर येईल तेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2023 13:54 IST

Want To Get Glowing Skin, Why Not Try Alum उन्हामुळे चेहरा टॅन - निस्तेज झाले? ५ रुपयांच्या तुरटीचा बनवा हायड्रेटिंग टोनर, चेहरा दिसेल फ्रेश..

उन्हाचा तडाखा अनेक ठिकाणी वाढत चालला आहे. उन्हामुळे शरीराची लाही लाही होते. मुख्य म्हणजे त्वचेवर याचा फटका जास्त बसतो. ज्यामुळे त्वचा निस्तेज, टॅन, रूक्ष दिसते. त्वचेवरील टॅनिंग सहसा लवकर निघत नाही. उन्हाळ्यात उद्भवणारी त्वचेची समस्या सोडवण्यासाठी तुरटीचा वापर करून पाहा. तुरटी, जवळजवळ प्रत्येक भारतीय घरात आढळते.

तुरटीमुळे त्वचा हायड्रेट राहते. यासह त्वचेच्या इतर समस्या सोडवण्यासाठी मदतगार ठरते. तुरटी टोनर चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषांची लक्षणे कमी करण्यातही खूप प्रभावी आहे. तुरटी टोनर बनवण्याची पद्धत व त्याचा वापर कसा करावा हे पाहूयात(Want To Get Glowing Skin, Why Not Try Alum).

तुरटी टोनर बनवण्यासाठी लागणारं साहित्य

एक कप तुरटीचं पाणी 

एक कप साधं पाणी

हेअर स्ट्रेटनिंगसाठी करायचं आहे, १० रुपये दह्यावर खर्च करा, सरळ-सिल्की केसांसाठी हा घ्या दह्याचा उपाय

एक टेबलस्पून एलोवेरा जेल

या पद्धतीने बनवा तुरटी टोनर

सर्वप्रथम, तुरटीचे पाणी बनवा, यासाठी एका वाटीत तुरटी व सामान्य पाणी घ्या. त्यात तुरटी फिरवत राहा. थोड्या वेळेसाठी तुरटी ठेवा. त्यानंतर चहाच्या गाळणीने तुरटीचे पाणी वेगळे करा. आता त्यात सामान्य पाणी मिक्स करा. नंतर त्यात एक टेबलस्पून एलोवेरा जेल मिसळून टोनर तयार करा. आता हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. अशा प्रकारे हायड्रेटिंग तुरटी टोनर वापरण्यासाठी रेडी.

महागडे कंडीशनर कशाला, खोबरेल तेलाचे बनवा नैसर्गिक कंडीशनर, केस होतील मुलायम, करतील शाईन

हायड्रेटिंग तुरटी टोनर वापरण्याची पद्धत

हायड्रेटिंग तुरटी टोनर वापरणे अगदी सोपे आहे. सकाळी उठल्यानंतर लगेच याचे पाणी चेहऱ्यावर स्प्रे करा. काही वेळानंतर कॉटन बॉलच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा. याच्या वापरामुळे चेहऱ्याची डलनेस दूर होईल. व पोर्स देखील साफ होतील, व टॅनिंगही कमी होईल. यासह त्वचेच्या संबंधित अनेक समस्या दूर होतील. ज्यामुळे चेहऱ्यावर नवी चमक येईल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी