Join us  

चेहऱ्यावर चमक हवी, मग लावा कॉफी पॅक! त्वचेच्या समस्यांवर सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2021 3:00 PM

कॉफी पिऊन तरतरी तर येतेच, पण कॉफीची पावडर चेहऱ्याला लावल्यास चेहराही टवटवीत होतो आणि त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात...

ठळक मुद्देचेहऱ्याच्या सौंदर्यात बाधा आणणाऱ्या विविध समस्यांवर कॉफी उपयुक्तकॅन्सरपासून ते त्वचेवरील डाग, सूज घालवण्यापर्यंत अनेक समस्यांवर गुणकारी

एक कडक कॉफी प्यायली की कशी तरतरी आल्यासारखी होते आणि मूडच बदलून जातो. दिवसाच्या कोणत्याही वेळेला आपल्याला रिफ्रेश करणारी ही कॉफी इतरही अनेक गोष्टींसाठी उपयुक्त असते. पोटदुखीसाठी रामबाण उपाय असलेली कोरी कॉफी केसांचे आरोग्य सुधारावे यासाठीही उपयुक्त असते. केसाच्या मुळांना कॉफी पॅक लावल्यास केस मऊ आणि मुलायम होण्यास मदत होते. तर चेहऱ्याच्या त्वचेसाठीही कॉफीचा अतिशय चांगला उपयोग होतो. कॉफीमुळे त्वचेवरील डाग जाण्यास मदत होते. त्वचेच्या समस्यांमुळे आपल्या सौंदर्यात बाधा येते मात्र क़फी हा त्यावरील रामबाण उपाय ठरु शकतो. सध्या बाजारातही कॉफी फ्लेवरची अनेक उत्पादने उपलब्ध असतात. कॉफीच्या फेसमास्कने त्वचेच्या अनेक समस्या दूर होत असल्याचे समोर आले आहे. पाहूयात कॉफीचे त्वचेसाठी असणारे उपयोग....

१. त्वचेचा कर्करोग दूर करण्यास मदत 

त्वचेचा कॅन्सर ही मागील काही काळापासून वाढती समस्या असल्याचे समोर आले आहे. कॅन्सरचे कारण आणि त्यावर ठोस उपाय अद्याप उपलब्ध नाहीत. मात्र चेहऱ्याला कॉफी पावडर लावल्यामुळे त्वचेचा कॅन्सर होण्यापासून तुमचे संरक्षण होऊ शकते. कॉफी पावडरमध्ये असणारे कॅफीन त्वचेच्यासाठी उपयुक्त असते. कॅफीनमधील अँटीऑक्सिडंटस स्कीनमधील पेशींना सू्र्यकिरणांपासून वाचविण्यासाठी मदत करतात. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचेला सुरकुत्या येणे, त्वचा काळी पडणे यांसारख्या समस्या उद्भवतात. पण कॉफी पॅक लावल्यास या समस्यांपासून तुम्ही दूर राहू शकता. 

२. त्वचेचा रंग उजळण्यास उपयुक्त 

कॉफी प्यायल्याने त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. आपल्याला वाटते की आपल्या डोक्याला ताण होतो. मात्र आपली त्वचा इतकी सेन्सिटीव्ह असते की आपल्या ताणाचा त्वचेवरही परीणाम होतो. त्वचेवर हा ताण सुरकुत्यांच्या माध्यमातून दिसतो आणि आपण वयापेक्षा मोठे दिसायला लागतो. त्यामुळे त्वचेवरील ताण घालवण्यासाठी चेहऱ्याला कॉफी लावणे उपयुक्त ठरते. १ चमचा कॉफी पावडर, एक चमचा नारळाचे तेल, अर्धा चमचा चंदन पावडर एकत्र करा आणि हा पॅक २० मिनिटांसाठी चेहऱ्याला लावून ठेवा. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. नियमितपणे हा उपाय केल्यास त्वचा तणावमुक्त दिसण्यास मदत होईल.

३. पिंपलपासून मिळवा मुक्ती 

अनेक तरुणींना पिंपल्सचा त्रास असतो. पण पिंपल्सपासून सुटका करायची असल्यास कॉफीचा वापर अतिशय उपयुक्त ठरतो. चेहऱ्यावरील डाग आणि पिपंल्समुळे तरुणींच्या सौंदर्यात बाधा येते. मेकअप करायचा असला तरीही पिंपल्समुळे अनेक समस्या उद्भवतात. १ चमचा कॉफीमध्ये १ चमचा मध, १ चमचा कोरफड जेल, पाव चमचा हळद एकत्र करावी. हे मिश्रण चेहऱ्याला लावावे. २५ ते ३० मिनिटांपर्यंत हा पॅक चेहऱ्यावर ठेवावा. हलक्या हाताने चेहरा चोळा आणि पाण्याने धुवा. यामुळे त्वचेवरील डाग, मुरुम आणि पिंपल्स जाण्यास मदत होईल. 

४. चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यास मदत 

तरुणींना डोळ्याखाली किंवा हनुवटीवर, नाकाच्या बाजुला काळे डाग येण्याची समस्या असते. हे डाग चेहऱ्यावर व्यवस्थित दिसतात. त्यामुळे चेहऱ्यावर पॅच असल्यासारखे दिसते. त्वचेत तयार होणाऱ्या मेलेनिन या घटकाला कॉफी नियंत्रित करते. त्यामुळे कॉफीमध्ये काही थेंब पाणी घालून ती चेहऱ्यावर लावल्यास चेहरा उजळण्यास मदत होते. 

५. चेहऱ्यावरील सूज कमी होण्यास मदत

चेहऱ्याला कॉफी लावल्यास त्वचेला सुरक्षा मिळते. वाढलेले वय चेहऱ्यावर दिसते. मात्र कॉफी लावल्याने वय काही प्रमाणात लपते कारण चेहरा ताजातवाना आणि टवटवीत दिसतो. काही वेळा चेहऱ्याला जास्त झोप झाली किंवा कमी झोप झाली की सूज येऊ शकते. तसेच पोट खराब असेल किंवा शरीरात रक्ताची कमतरता असेल तर चेहऱ्याला सूज येते. पण कॉफी पॅक लावल्यास ही सूज कमी होण्यास मदत होते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सआरोग्यत्वचेची काळजी