Join us
Daily Top 2Weekly Top 5

२००० रुपयांचं महागडे व्हिटामिन C सीरम विकत न आणता 'असं ' करा घरी, ७ दिवसांत पाहा चेहऱ्यात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2026 13:04 IST

Vitamin C serum benefits for face Marathi: Affordable skincare routine at Home: अवघ्या ७ दिवसांच्या नियमित वापराने आपल्या चेहऱ्यावर असा काही ग्लो येईल लोक सौंदर्याचे गुपित विचारू लागतील. हा सीरम घरी कसा बनवायचा पाहूया.

हल्लीच्या धावपळीच्या आणि प्रदूषणच्या युगात त्वचेच्या समस्या जसे की पिंपल्स, काळे डाग आणि निस्तेजपणा सामान्य झाला आहे. आपली त्वचा सुंदर, ग्लोइंग आणि डागमुक्त असावी असं प्रत्येकाला वाटतं.(Vitamin C serum benefits for face Marathi) यासाठी आपण बाजारात मिळणाऱ्या महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्सवर हजारो रुपये खर्च करतो. यातील सगळ्यात लोकप्रिय असणारं प्रॉड्क्ट म्हणजे व्हिटॅमिन सी सीरम.(Affordable skincare routine at Home) त्वचा उजळवण्यासाठी, पिंपल्सचे काळे डाग घालवण्यासाठी आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी हे सीरम एखाद्या जादूप्रमाणे काम करते.(Skin care Tips) पण बाजारात याच सीरमची किंमत १५०० ते २००० रुपयांपर्यंत मिळते. जे प्रत्येकाला परवडणारी नसते. यात असणारे केमिकल्स संवेदनशील त्वचेला खाज किंवा पुरळ आणण्याची शक्यता जास्त असते. (7 days skin transformation challenge)पण हेच महागडे सीरम आपण घरच्या घरी बनवू शकतो. घरगुती पद्धतीने बनवलेले हे सीरम पूर्णपणे नैसर्गिक, सुरक्षित आणि अत्यंत स्वस्त असते. यामध्ये कोणतेही कृत्रिम रंग किंवा हानिकारक प्रिझर्व्हेटिव्ह्ज नसल्यामुळे ते त्वचेवर खोलवर जाऊन पोषण देते. पिंपल्स, पिगमेंटेशन किंवा निस्तेज त्वचेमुळे त्रस्त असाल, तर हे घरगुती सीरम आपल्यासाठी वरदान ठरेल. अवघ्या ७ दिवसांच्या नियमित वापराने आपल्या चेहऱ्यावर असा काही ग्लो येईल लोक सौंदर्याचे गुपित विचारू लागतील. हा सीरम घरी कसा बनवायचा पाहूया. 

चेहऱ्यावरचे नको असलेले केस होतील गायब! बटाट्याच्या रसात मिसळा 'या' २ गोष्टी; पार्लरचा खर्च वाचेल- चेहरा दिसेल काचेसारखा स्वच्छ

व्हिटॅमिन सी सीरम बनवण्यासाठी आपल्याला दोन संत्र्याच्या साली घ्याव्या लागतील. त्यांना स्वच्छ धुवून गरम पाण्यात ५ ते ६ मिनिटे उकळ्यास ठेवा. साली पूर्णपणे मऊ व्हायला हव्यात. थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करा. तयार पेस्टमध्ये ४ ते ५ चमचे गुलाबपाणी घाला. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यात चाळणीच्या मदतीने गाळून घ्या. नंतर त्यात १ चमचा ग्लिसरीन आणि १ चमचा कोरफडीचा गर घालून व्यवस्थित मिक्स करा. व्हिटॅमिन सी सीरम तयार होईल. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून हे सीरम त्वचेला लावा. हलक्या हाताने मसाज करा. नियमितपणे हे चेहऱ्याला लावल्यास फरक दिसेल. 

हे सीरम काचेच्या बाटलीत भरुन ठेवा. व्हिटॅमिन सी सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येऊ देऊ नका. नेहमी थंड किंवा अंधाऱ्या जागेत ठेवा. व्हिटॅमिन C सीरम लावल्यानंतर त्वचा थोडी संवेदनशील होते, त्यामुळे दिवसा बाहेर पडताना सनस्क्रीन लावायला हवे. हे घरगुती सीरम १०-१२ दिवसांपेक्षा जास्त काळ वापरू नका; त्यानंतर नवीन तयार करा.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Make Vitamin C serum at home, see changes in 7 days.

Web Summary : Skip expensive serums! Make Vitamin C serum at home with orange peels, rose water, glycerin, and aloe vera. Apply nightly for glowing skin in just 7 days. Remember sunscreen!
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी