अगदी कमी वयात त्वचेच्या अनेक समस्या आपल्याला सतावू लागतात.(Skin Care Tips) पिंपल्स, मुरुमे, पिग्मेंटेशन,चेहऱ्यावर येणारे काळे डाग, चट्टे यामुळे आपलं सौंदर्य खराब होतं.(skincare mistakes ) आपल्यापैकी अनेकांना त्वचा सुंदर, छान आणि चांगली असावी असं वाटतं.(Kitchen ingredients bad for face) यासाठी आपण त्वचेवर अनेक महागडे उत्पादने लावतो. त्यात असणारे केमिकल्स त्वचेच नुकसान अधिक प्रमाणात करतात. आपल्या त्वचेवरील डाग आणि पिंपल्स घालवण्यासाठी आपण अनेक घरगुती उपाय करतो. ज्याचा आपल्याला त्वचेवर विपरीत परिणाम होतो. (Viral beauty hacks that damage skin)
त्वचारोगतज्ज्ञ डॉ. गुरवीन वरैच गारेकर म्हणतात. आपण स्वयंपाकघरातील काही गोष्टींचा वापर करुन त्वचेची चमक वाढवण्याचा प्रयत्न करतो.(Pimple and dark spot warning) परंतु, चमक वाढवण्याऐवजी ती अधिक कमी होऊ लागते. जाणून घेऊया कोणत्या ४ गोष्टी त्वचेवर चुकूनही लावू नये याबाबतीत.
त्वचेवर येईल तेज! स्वयंपाकघरातील ३ पदार्थांनी करा चेहरा स्वच्छ, पिंपल्स- सुरकुत्यांचा त्रास होईल कमी
1. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात असते. जे त्याच्या ब्लीचिंग गुणधर्मांसाठी ओळखले जाते. अनेकदा आपण चेहऱ्यावर लिंबू चोळल्याने डाग निघून रंग उजळेल असं वाटते. परंतु यात असणारे आम्लयुक्त घटक त्वचेवर जळजळ, लालसरपणा, कोरडेपणा वाढतो. ज्यामुळे त्वचेच्या अडथळ्यांना नुकसान होते.
2. बेकिंग सोडा हे एक्सफोलिएंट म्हणून काम करते. यामुळे मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत होते. बेकिंग सोडा अल्कधर्मी असतो. जो आपली त्वचा कमी आम्लयुक्त करतो. चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचे पीएच संतुलन बिघडते. ज्यामुळे त्वचेचा कोरडेपणा, जळजळ आणि मुरुमे वाढू शकतात.
3. बटाट्याचा रस अनेकदा काळी वर्तुळे आणि डाग कमी करण्यासाठी वापरला जातो. बटाट्यामध्ये काही विशिष्ट एंजाइम असतात जे लोकांच्या त्वचेवर ऍलर्जी होण्यास कारणीभूत ठरतात. त्वचेवर बटाटा चोळल्यास जळजळ किंवा खाज सुटू शकते. जर आपली त्वचा संवदेनशील असेल तर बटाटा लावणे टाळा.
4. त्वचेला घट्ट आणि उजळ करण्यासाठी कच्चे अंडे अनेकदा त्वचेवर फेस मास्क म्हणून लावले जाते. कच्च्या अंड्यांमध्ये साल्मोनेलासारखे बॅक्टेरिया असू शकतात. जे त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करतात. यामुळे संसर्ग होतो. कच्चे अंडे त्वचेवर लावल्याने ऍलर्जी देखील होऊ शकते. त्वचेवर खाज सुटणे, लालसरपणा किंवा पुरळ येऊ शकतात.