lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > केसांच्या सगळ्या समस्यांवर सोपा उपाय, कढीपत्ता ! हा हेअर मास्क लावूनच पहा...

केसांच्या सगळ्या समस्यांवर सोपा उपाय, कढीपत्ता ! हा हेअर मास्क लावूनच पहा...

भाज्या, वरण आणि विविध पदार्थांमध्ये आपण कढीपत्त्याचा वापर आवर्जून करतो. आरोग्यासाठी कढीपत्ता आवश्यक तर असतोच. पण केस आणि त्वचा यासंदर्भात असणाऱ्या विविध समस्यांवरही कढीपत्ता प्रभावी  ठरतो. म्हणूनच कढीपत्त्याचे हे भन्नाट फायदे तुम्ही जाणून घेतले आणि त्याचा वापर करून पाहिला तर 'कढीपत्ता नकाे', असे म्हणणेच तुम्ही सोडून द्याल. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 01:17 PM2021-06-13T13:17:08+5:302021-06-13T13:27:43+5:30

भाज्या, वरण आणि विविध पदार्थांमध्ये आपण कढीपत्त्याचा वापर आवर्जून करतो. आरोग्यासाठी कढीपत्ता आवश्यक तर असतोच. पण केस आणि त्वचा यासंदर्भात असणाऱ्या विविध समस्यांवरही कढीपत्ता प्रभावी  ठरतो. म्हणूनच कढीपत्त्याचे हे भन्नाट फायदे तुम्ही जाणून घेतले आणि त्याचा वापर करून पाहिला तर 'कढीपत्ता नकाे', असे म्हणणेच तुम्ही सोडून द्याल. 

Uses of curry leaves for hair fall, white hairs and dandruff problems | केसांच्या सगळ्या समस्यांवर सोपा उपाय, कढीपत्ता ! हा हेअर मास्क लावूनच पहा...

केसांच्या सगळ्या समस्यांवर सोपा उपाय, कढीपत्ता ! हा हेअर मास्क लावूनच पहा...

Highlightsफोडणीमध्ये तडतडून पदार्थाला चविष्ठ बनविणारा आणि उत्तम सुगंध देणारा कढीपत्ता खरोखरंच सौंदर्य वाढविणारा आहे. कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन बी, सी आणि ई मोठ्या प्रमाणावर असतो. यासोबतच फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह हे घटकही असतात. या घटकांमुळे केसांची वाढ चांगली होते, कोंडा नाहीसा होतो, केस चमकदार होतात आणि अकाली पांढरेही होत नाहीत. 

आजकाल प्रत्येक जण केसांच्या वेगवेगळ्या समस्येने हैराण झालेला आहे. कुणाचे केस गळत आहे, तर कुणाचे केस अकाली पांढरे होत आहेत. कुणी केसांच्या रूक्षपणामुळे आणि कोरडेपणामुळे परेशान आहे, तर कुणाच्या केसांची वाढच खुंटली आहे. म्हणूनच केसांच्या अशा कोणत्याही समस्या असतील, तर कढीपत्त्यापासून घरच्याघरी अगदी  सोप्या पद्धतीने हेअर मास्क बनवा  आणि अवघ्या काही दिवसांतच  लांब, काळेभोर, घनदाट आणि चमकदार केस मिळवा 

 

कढीपत्ता हेअरमास्क बनविण्याची सोपी पद्धत
१. कढीपत्ता- दही हेअर मास्क
कढीपत्ता आणि दही यापासून बनविलेला हेअर मास्क वापरला तर कोंड्याची समस्या झटकन दूर होते. केसातील कोंडा घालविण्यासाठी अनेक जण केसांना दही, लिंबू हे पदार्थ लावत असतात. पण दह्यासोबत जर कढीपत्त्याचाही वापर केला तर तो निश्चितच अधिक प्रभावी ठरतो.
कढीपत्ता- दही हेअर मास्क वापरण्यासाठी सगळ्यात आधी कढीपत्त्याची मोठी वाटी भरून फ्रेश पाने घ्या. पाने चांगली धूवून घ्या. यानंतर ही पाने आणि दोन ते तीन चमचे दही असे एकत्रित करून मिक्सरमधून वाटून घ्या. केसांची लांबी जास्त असेल तर कढीपत्त्याची पाने आणि दही यांचे प्रमाण वाढवून घ्या. हा हेअर मास्क डोक्याच्या त्वचेला हलक्या हाताने लावा आणि २० ते ३० मिनिटे तसाच राहू द्या. यानंतर केस स्वच्छ धुवून घ्या. यामुळे काेंड्याची समस्या दूर होऊन केसांची वाढ चांगली आणि निरोगी होईल. 

 

२. कढीपत्ता आणि कांदा हेअर मास्क
केसांची वाढ होण्यासाठी कांद्याचा रस केसांच्या मुळाजवळ लावला जातो. पण जेव्हा कांदा आणि कढीपत्ता यांचा एकत्रित वापर केला जातो, तेव्हा अधिक जलद परिणाम दिसून येतो. हा मास्क तयार करण्याची पद्धतही अत्यंत सोपी आहे. साधारण मोठी वाटीभरून कढीपत्त्याची पाने आणि एक मध्यम आकाराचा कांदा हे दोन्ही एकत्रितपणे मिक्सरमधून वाटून घ्या. हे मिश्रण हळूवार हाताने केसांच्या मुळाजवळ लावा. यामुळे केस मुलायम, लांब आणि घनदाट होतील. शिवाय केस अकाली पांढरेही होणार नाहीत.
 

Web Title: Uses of curry leaves for hair fall, white hairs and dandruff problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.