Join us

उष्णतेच्या त्रासाने हैराण झालात ? चंदनाचा 'असा' करा उपयोग, मिळतात अनेकविध फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2025 11:31 IST

Use sandalwood for better health, you will get many benefits, from skin to heat problems everything will be cured : चंदनाचा वापर करणे ठरते फायद्याचे. पाहा कसे वापरायचे.

उष्णतेचा त्रास तसेच पित्ताचा त्रास अनेकांना होतो. फार सामान्य अशी ही समस्या आहे. त्यावर अनेक घरगुती उपाय आपण करतोच. त्यापैकीच वर्षानुवर्षे केला जाणारा उपाय म्हणजे चंदनाचा लेप लावणे.  उष्णतेचा त्रास असेल तर चंदन नक्की वापरावे. (Use sandalwood for better health, you will get many benefits, from skin to heat problems everything will be cured )चंदन सुगंधी तर असतेच मात्र त्याचे अनेक औषधी गुणधर्मही असतात. चंदनाच्या लाकडातून मिळणाऱ्या पुडीत नैसर्गिक सुगंधी तेल असते जे केवळ सुगंधासाठी नव्हे तर त्वचेला स्वच्छ ठेवण्यासाठी आणि रोगजंतूंपासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरते. चंदनात जंतूनाशक, दाहशामक, थंडावा देणारे आणि सौंदर्यवर्धक असे अनेक गुण आहेत. म्हणूनच अनेक साबण, क्रीम, फेस पॅक, अगरबत्ती, अत्तर यांसारख्या गोष्टींमध्ये चंदनाचा वापर केला जातो.

चंदनाचा लेप चेहर्‍यावर लावल्याने त्वचेला शीतलता मिळते. उष्णतेमुळे निर्माण होणारा लालसरपणा आणि पुरळ कमी होतो. नियमित वापरल्यास त्वचेवरील तेलकटपणा कमी चेहरा उजळतो. उन्हात फिरल्याने त्वचा काळसर होते किंवा टॅनिंग होते. अशा वेळी चंदनाचा लेप लावल्यास त्वचा हळूहळू स्वच्छ आणि मऊसर होते. पिंपल्समुळे आलेले डाग आणि खुणा फिकट करण्यासाठी चंदन उत्तम मानले जाते. त्याचबरोबर त्वचेची खाज, दाह किंवा लहानसहान संसर्ग दूर करण्यास मदत होते.

फक्त चेहर्‍यासाठीच नव्हे तर शरीरासाठीही चंदनाचा वापर फार फायदेशीर आहे. काखेतला वास घालवण्यासाठी चंदनाचा लेप हा नैसर्गिक डिओडरंट म्हणून काम करतो. घामामुळे येणारा दुर्गंध हा बॅक्टेरियामुळे येतो आणि चंदनातील जंतूनाशक गुणधर्म हे बॅक्टेरिया नष्ट करून स्वच्छता राखतात. शिवाय त्याचा मोहक सुगंध तासनतास टिकतो. उष्णतेमुळे शरीरावर लहान फोड किंवा लालसर पुरळ आले तर चंदन लावल्याने लगेच थंडावा मिळतो आणि त्रास कमी होतो. चंदन केवळ बाह्य उपयोगासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. त्याचा सुगंध मनाला शांतता देतो. तणाव आणि थकवा कमी करतो, म्हणून ध्यानधारणा करताना किंवा देवपूजेत चंदनाचा वापर परंपरेने केला जातो. चंदनाचा लेप लावल्याने उष्णता पटकन कमी होते.  

टॅग्स :होम रेमेडीघरगुती उपायब्यूटी टिप्सहेल्थ टिप्स