Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्याचे सगळे प्रॉब्लेम दूर करणारी ही पाहा १ जादूवाली गोष्ट, लावा आणि पाहा चेहऱ्यावरची चमक

चेहऱ्याचे सगळे प्रॉब्लेम दूर करणारी ही पाहा १ जादूवाली गोष्ट, लावा आणि पाहा चेहऱ्यावरची चमक

Use Retinol For Better Skin : त्वचा उजळेल आणि तरुण दिसाल. पाहा कमालीचं प्रॉडक्ट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2025 19:28 IST2025-02-26T19:00:17+5:302025-02-26T19:28:22+5:30

Use Retinol For Better Skin : त्वचा उजळेल आणि तरुण दिसाल. पाहा कमालीचं प्रॉडक्ट.

Use Retinol For Better Skin | चेहऱ्याचे सगळे प्रॉब्लेम दूर करणारी ही पाहा १ जादूवाली गोष्ट, लावा आणि पाहा चेहऱ्यावरची चमक

चेहऱ्याचे सगळे प्रॉब्लेम दूर करणारी ही पाहा १ जादूवाली गोष्ट, लावा आणि पाहा चेहऱ्यावरची चमक

आपण त्वचा चांगली ठेवण्यासाठी विविध उत्पादकांचा वापर करत असतो. मेडिकल मध्ये मिळणाऱ्या, तसेच ब्यूटी ट्रिटमेंटसाठी मिळणाऱ्या वस्तू, आदी. आपण विकत घेत असतो. घरगुती उपायही आपण करतच असतो. (Use Retinol For Better Skin )असं सगळं करून सुद्धा बरेचदा त्वचा फार चांगली काही राहत नाही. आपण असे जे प्रॉडक्ट वापरतो, त्याच्यामध्ये एक पदार्थ वापरला जातो. ज्याला रेटीनॉल असं म्हणतात. रेटीनॉल म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर जीवनसत्त्व ए आहे. रेटीनॉल मध्ये अँन्टीएजिंग सत्व असतात.(Use Retinol For Better Skin ) ज्यांच्यामुळे त्वचेवरील पुरळ नाहीसे होते. तसेच चेहरा तरुण दिसतो. चेहर्‍यावरील सर्व डाग निघून जातात. 

चेहऱ्यावरील सुरकूत्या रेटीनॉल लावल्याने गायब होतात. जीवनसत्त्व ए चा खजिना म्हणजे रेटीनॉल होय. जवळपास सर्वच प्रकारच्या त्वचेला रेटीनॉल सुट होते. त्यामुळे चांगली त्वचा हवी असल्यास, त्वचेवर रेटीनॉल लावणे हा चांगला उपाय आहे. पण मग हे रेटीनॉल कधी लावायचे आणि कसे? हे जाणून घ्या. उर्मिला निंबाळकरने तिच्या चॅनल वरून सविस्तर अशी माहिती दिली आहे.

रेटनॉल त्वचा स्मूथ करते. तसेच त्वचेचे टेक्सचरसुद्धा सुधारते. त्वचा काळवंडली असेल तर रेटीनॉल त्वचा उजळवते. तसेच ते वापरल्याने त्वचा एक्सपोलिएटही होते. त्वचेवरील जुने  टेक्सचर घालवून नवीन तेज देण्याचे काम रेटीनॉल करते. कोलॅजीनला चालना देण्याचे कामही रेटीनॉल करते. म्हणूनच ते औषधांमध्ये गणले जाते.  त्वचेसाठी ते अत्यंत गुणकारी आहे. 

पण सर्वांनी ते लावू नये त्याला वयाचे बंधन आहे. २५ वर्षाच्या खालील कोणीही ते वापरू नये. रेटीनॉल लावण्यासाठी त्वचा तेवढी डेवलप होणं गरजेचे आहे. म्हणून पंचवीशीच्या पुढच्या कोणीही रेटीनॉल लावण्यात हरकत नाही. रेटीनॉल फक्त रात्री झोपताना लावायचे. दिवसभर लावायचे नाही. फक्त रात्रीच लावायचे. शरीराची काहीही हालचाल होत नसताना ते लावले तर त्याचा उपयोग होतो. रेटीनॉल लावण्याआधी फेस वॉशने किंवा साबणाने चेहरा स्वच्छ धुवायचा. मस्त पुसून कोरडा करायचा. मगच रेटीनॉल लावायचे. रेटीनॉलमध्ये विविध प्रकार असतात. पण सुरवात करताना ०.०५ %  एवढे प्रमाण असलेलेच क्रिम मिळते तेच वापरा.

Web Title: Use Retinol For Better Skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.