Join us

केसांची वाढच खुंटली-पातळ झालेत? 'हे' खास तेल लावा; लांब-दाट केसांचं गुपित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 13:32 IST

Use Pumpkin Seed Oil For Hair Growth (How To Grow Hair Faster) : शिल्पा अरोरा सांगतात की भोपळ्याच्या बियांचे (Pumpkin Seed Oil) तेल एखाद्या जादूई तेलाप्रमाणे काम करते.

आजकाल केस गळणं (Hair Fall) ही एक सामान्य समस्या बनली आहे. ताण-तणाव, चुकीचं डाएट, हॉर्मोनल बदल, प्रदूषण आणि केमिकल्सयुक्त  उत्पादनं हे याचं मुख्य कारण आहे. पण जास्त खर्च न करतात घरी उपलब्ध असलेल्या नैसर्गिक पदार्थांनी तुम्ही केसाचं आरोग्य चांगलं ठेवू शकता. ज्यामुळे केसांच्या स्थितीत सुधारणा होईल. आहारतज्ज्ञ शिल्पा अरोडा यांनी एका खास तेलाबाबत सांगितलं आहे. हे तेल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. याबाबत त्यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. शिल्पा अरोरा सांगतात की भोपळ्याच्या बियांचे (Pumpkin Seed Oil) तेल एखाद्या जादूई तेलाप्रमाणे काम करते. (Use Pumpkin Seed Oil For Hair Growth)

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या रिपोर्टनुसार भोपळ्याच्या बियांमध्ये फायटोस्टेरॉल नावाचे खास तत्व असते. यात डिएचडी हॉर्मोन ब्लॉक करण्यास मदत होते. डीएचटी केसांची मुळं कमकुवत करते आणि हेअर थिनिंग, हेअर फॉलचं कारण ठरते. केस गळती नियंत्रणात ठेवण्यासाठी केस मजबूत आणि दाट असायला हवेत. भोपळ्याच्या बियांचे तेल फक्त डीएचडी रोखण्यास मदत करत नाहीत तर स्काल्पला आतून पोषण देतात. या बियांच्या तेलाच्या वापरानं केसांची वाढ चांगली होते आणि केसही भराभर वाढतात.

भोपळ्याच्या बियांमध्ये कोणती पोषक तत्व असतात? (Pumpkin Seeds For Hair Growth)

या तेलात आयर्न, जिंक, व्हिटामीन ई, ओमेगा ६ फॅटी एसिड्स मोठ्या प्रमाणात असतात. यातील पोषक तत्व रक्ताभिसरण वाढवतात ज्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते. स्काल्प हेल्दी राहतो आणि केसांची वाढ होण्यासही मदत होते. हे तेल तुम्ही सरळ स्काल्पला लावून हलक्या हातानं मसाज करू शकता. रात्रभर हे तेल लावून ठेवा नंतर केस स्वच्छ धुवा. केसांची वाढ नॅच्युरली व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर  भोपळ्याच्या बियांचे तेल हा एक चांगला पर्याय आहे. हे केमिकल फ्री असून सुरक्षित आहे. २ ते ३ आठवडे याचा वापर केल्यास तुम्हाला चांगला परीणाम दिसून येईल.

भोपळ्याच्या बियांच्या तेलाचा केसांवर वापर कसा करावा? (How To Use Pumpkin Seeds On Hair)

हे तेल हातावर ४ ते ५ थेंब घेऊ तुम्ही थेट केसांवर लावू शकता. स्काल्पला लावण्यासाठी तसंच केसांच्या लांबीला लावण्यासाठीसुद्धा हे तेल उत्तम आहे. दुसऱ्या पद्धतीनं कोणत्याही पेपरमिंट तेलासोबत तुम्ही याचा वापर करू शकता. ऑईलबेस्ड हेअर मास्कसोबतही तुम्ही याचा वापर करू शकता. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी