Join us
Daily Top 2Weekly Top 5

चेहऱ्यावरचे पिंपल्स, ओपन पोअर्स वाढले? बघा तुळशीच्या पानांचा बिनपैशाचा उपाय- रातोरात त्वचा चमकेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2025 13:00 IST

Use of Tulsi to Reduce Pimples and Open Pores: चेहऱ्यावरचे पिंपल्स, ओपन पोअर्स वाढले असतील तर घरासमोर असणाऱ्या तुळशीची काही पानं आणा आणि पुढे सांगितलेले उपाय करून पाहा...(how to get rid of pimples and open pores?)

ठळक मुद्देतुळशीमध्ये असणाऱ्या ॲण्टीबॅक्टेरियल, ॲण्टीफंगल गुणधर्मामुळे चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी होण्यास मदत होते. 

चेहऱ्यावर पिंपल्स येणे, टॅनिंग आणि डेडस्किन वाढल्याने त्वचा काळवंडून जाणे, त्वचेवरचा ग्लो कमी होणे, पिगमेंटेशन तसेच ॲक्ने वाढणे, गालांवर ओपन पोअर्स जास्त प्रमाणात दिसून येणे यापैकी काेणता ना कोणता त्रास प्रत्येकीलाच कधी ना कधी होतो. असं झाल्यानंतर मग आपण महागडे कॉस्मेटिक्स विकत आणतो आणि चेहऱ्यावर वेगवेगळे प्रयोग करून पाहतो. तरीही त्याचा त्वचेवर फारसा परिणाम दिसून येत नाही (Use of Tulsi to Reduce Pimples and Open Pores). म्हणूनच हे सगळे महागडे उपचार करण्यात वेळ आणि पैसा घालविण्यापेक्षा अंगणातल्या तुळशीची काही पानं तोडून आणा आणि पुढे सांगितलेले उपाय करून पाहा..(how to get rid of pimples and open pores?)

पिंपल्स, ओपन पोअर्स कमी करण्यासाठी तुळशीच्या पानांचा उपयोग

 

१. ओपन पोअर्स

चेहऱ्यावरचे ओपन पोअर्स वाढले की कमी वयातच चेहरा रापलेला, वयस्कर दिसू लागतो. यामुळे साहजिकच सौंदर्य कमी होतं. म्हणूनच त्वचेवरचे ओपन पोअर्स कमी करण्यासाठी एका पातेल्यामध्ये १ कप पाणी घ्या.

जुन्या पारंपरिक साड्यांचे पाहा ७ सुंदर Co-ord Sets! साडीला मॉडर्न ड्रेसचा लूक, घ्या मापाचा ड्रेस शिवून

त्या पाण्यामध्ये तुळशीची ८ ते १० पाने थोडी कुटून टाका. हे पाणी गरम करायला ठेवा आणि ३ ते ४ मिनिटे उकळू द्या. थंड झाल्यानंतर गाळून घ्या. त्यामध्ये १ चमचा गुलाबजल घाला आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. चेहरा धुतल्यानंत हे पाणी चेहऱ्यावर शिंपडा. असं दिवसातून २ ते ३ वेळा करा. काही दिवस नियमितपणे केल्यास ओपन पोअर्स नक्कीच कमी होतील.

 

२. पिंपल्स

चेहऱ्यावर नेहमीच पिंपल्स येत असतील तर तुळशीच्या पानांचा हा उपाय नक्कीच उपयोगी येऊ शकतो. हा उपाय करण्यासाठी तुळशीच्या पानांची पावडर करून घ्या. किंवा तुळशीच्या पानांचा रस काढला तरी चालेल.

सर्दी, खोकला कमी करणारा हर्बल चहा! घ्या सोपी रेसिपी- कफ मोकळा होऊन मिळेल आराम

आता तुळशीच्या पानांच्या रसामध्ये थोडी कडुलिंबाची पावडर आणि थोडे गुलाबजल घाला. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवा आणि ते चेहऱ्याला लावा. १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. तुळस आणि कडुलिंब यांच्यामध्ये असणाऱ्या ॲण्टीबॅक्टेरियल, ॲण्टीफंगल गुणधर्मामुळे चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी होण्यास मदत होते.  

English
हिंदी सारांश
Web Title : Tulsi leaves for pimples and open pores: A natural remedy.

Web Summary : Fight pimples and open pores naturally with tulsi leaves. A tulsi-infused water spray reduces pores. A tulsi, neem, and rosewater mask combats pimples. Simple, effective skincare!
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी