त्वचेची व्यवस्थित काळजी घेतली गेली नाही, उन्हामध्ये जाताना सनस्क्रिन लाावलं नाही तर उन्हाचा, धुळीचा त्वचेवर परिणाम होत जातो आणि हळूहळू त्वचेवर पिगमेंटेशन व्हायला लागतं. यामुळे मग काही ठिकाणी चेहरा काळपट दिसायला लागतो. विशेषत: कपाळ, हनुवटी, डोळे आणि कानाच्या मधला भाग यांच्यामध्ये पिगमेंटेशन हाेतं. त्यामुळे मग तिथली त्वचा काळी दिसते. अशी पिगमेंटेड त्वचा असेल तर साहजिकच आपलं सौंदर्यही कमी होतंच. म्हणूनच त्वचेवरचं पिगमेंटेशन कमी करून त्वचेचा रंग एकसारखा करायचा असेल तर बटाट्याचा एका खास पद्धतीने वापर करून पाहा (benefits of applying potato juice on face or skin). हा उपाय काही दिवस नियमितपणे केल्यास त्वचेमध्ये खूप चांगला बदल दिसून येईल.(use of potato for reducing pigmentation and dark spots)
चेहऱ्यावरचं पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स कमी करण्यासाठी उपाय
हा उपाय करण्यासाठी एक बटाटा घ्या. त्याची सालं काढून टाका आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्या. थोडंसं पाणी घालून हे तुकडे मिक्सरमधून बारीक फिरवून घ्या. यानंतर तयार झालेला बटाट्याचा गर सुती कपड्यातून गाळून घ्या.
केस गळून टक्कल पडण्याची वेळ आली? रात्री केसांना लावा 'हे' पाणी, महिनाभरात नव्याने केस उगवतील
गाळून घेतलेलं बटाट्याचं पाणी काही मिनिटांसाठी तसंच राहू द्या. यानंतर वरचं पाणी काढून टाकलं की भांड्याच्या तळाशी बटाट्यामधलं स्टार्च जमा झालेलं दिसेल. या स्टार्चचा उपयोग आपल्या त्वचेसाठी करायचा आहे.
या स्टार्चमध्ये थोडं ॲलोव्हेरा जेल आणि व्हिटॅमिन ई ची १ कॅप्सूल घाला. तिन्ही पदार्थ व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्या. यानंतर ते एका बाटलीमध्ये भरा आणि जेवढं हे मिश्रण असेल तेवढंच त्यामध्ये गुलाबपाणी घाला.
काही केल्या घरातले उंदीर कमी होत नाहीत? ५ सोपे उपाय, घरातून उंदीर पळून जातील
आता हे तयार झालेलं मिश्रण दररोज रात्री झोपण्यापुर्वी त्वचेला लावा. बघा ८ ते १० दिवसांतच तुमची त्वचा छान वाटेल. पिगमेंटेशन बऱ्याच प्रमाणात कमी झालेलं दिसेल. हा उपाय केल्याने त्वचेची लवचिकताही वाढते आणि त्वचेवर अकाली सुरकुत्या येणंही कमी होतं. तसेच बटाटा हा नॅचरल ब्लिचिंग एजंट असल्याने त्वचा स्वच्छ, नितळ, उजळ राहण्यासही मदत होते.
