बऱ्याचदा असं होतं की आपल्या चेहऱ्याकडे आपण पुरेसं लक्ष देतो. पण तेवढंच लक्ष आपण आपल्या हातांकडे देत नाही. उन्हामध्ये जाताना चेहरा झाकून घेतो. चेहऱ्याला सनस्क्रिन लावतो. पण हातांकडे मात्र दुर्लक्ष होतं. ना हातांना सनस्क्रिन लावलं जातं ना ते झाकून घेतले जातात. त्यामुळे मग हळूहळू हातांवर टॅनिंग व्हायला लागतं आणि ते काळवंडून जातात. ज्यांना नेहमीच दुचाकी चालवावी लागते, त्यांचे हात जास्त टॅन झालेले असतात. अशावेळी हातांना पुढे सांगितलेला एक घरगुती मास्क लावून पाहा. हा उपाय करताच हातावरचं टॅनिंग, डेडस्किन कमी होईल आणि हात अगदी स्वच्छ, उजळ दिसायला लागतील.(how to get rid of tanned hands?)
हातावरचं टॅनिंग काढून टाकण्यासाठी उपाय
१. हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये २ चमचे बेसन घ्या. त्यामध्ये १ चमचा काॅफी पावडर घाला. काॅफी त्वचेवरची डेडस्किन, टॅनिंग काढून त्वचा चमकदार करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. आता यामध्ये २ चमचे दही आणि १ चमचा मध घाला. सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्या. आता हा लेप तुमच्या हातांना लावा आणि हलक्या हाताने मालिश करा. यानंतर १० मिनिटे लेप हातांवर तसाच राहू द्या आणि नंतर चोळून चोळून काढून टाका. हात अगदी स्वच्छ झाल्यासारखे दिसतील.
२. पुढे सांगितलेला हा दुसरा उपायही करून पाहा. पण हा उपाय सगळ्यांनाच सहन होईल असं नाही. त्यामुळे हा उपाय करण्यापुर्वी पॅचटेस्ट जरूर घ्या. त्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीमध्ये १ चमचा मसूर डाळीचं पीठ, १ चमचा तांदळाचं पीठ, अर्धा चमचा कोणताही शाम्पू आणि अर्धा चमचा टुथपेस्ट घाला. अर्ध्या लिंबाचा रस पिळून सगळे पदार्थ हलवून घ्या. हा लेप हातांना लावून १० मिनिटे मालिश करा आणि नंतर हात धुवून टाका. हात छान दिसतील.
Web Summary : Prolonged sun exposure darkens hands, especially for bikers. A coffee and gram flour mask with yogurt and honey removes tan and dead skin. Alternatively, a mix of lentil flour, rice flour, shampoo, toothpaste, and lemon juice can be used, but patch test first.
Web Summary : धूप में रहने से हाथ काले पड़ जाते हैं, खासकर बाइक चलाने वालों के। कॉफी और बेसन का मास्क, दही और शहद के साथ, टैन और डेड स्किन को हटाता है। मसूर दाल का आटा, चावल का आटा, शैम्पू, टूथपेस्ट और नींबू का रस भी इस्तेमाल कर सकते हैं, लेकिन पहले पैच टेस्ट करें।