एप्रिल महिना सुरू झाला आणि सगळीकडेच उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या. या दिवसांत डिहायड्रेशन होऊन अनेकांना उष्णतेचा खूप त्रास होतो. शरीरातली उष्णता वाढते. यामुळे मग तळहात किंवा तळपायाची सालं निघतात आणि त्यातून उष्णता बाहेर पडते. यामुळे तळहात, तळपाय खरखरीत होऊन जातात (how to use camphor to get rid of cracked heel?). याशिवाय उन्हामुळे टॅनिंगही होते. त्वचा रापल्यासारखी दिसते. शिवाय काही जणांना सनबर्नचा त्रासही होतो. असे उष्णतेमुळे होणारे सगळ्याच प्रकारचे त्रास कमी करायचे असतील तर त्यासाठी थोडासा कापूर घेऊन हा एक सोपा उपाय करून पाहा (use of camphor for reducing heat in body). यामुळे उष्णतेचा त्रास बराच कमी होईल.(use of camphor for reducing dryness of skin)
अंगातली उष्णता कमी करण्यासाठी कापुराचा कसा उपयोग करावा?
१. कापुराचे तेल
कापुरामध्ये ॲण्टीबॅक्टेरियल, ॲण्टीफंगल गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरातला दाह, आग कमी करण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारचा संसर्ग कमी करण्यासाठी त्याची मदत होते.
इरकल साडीचा थाट न्यारा! पाहा ५ सुंदर साडी डिझाइन्स, एकतरी हवीच मायेची इरकल!
ॲण्टी रिंकल कंपोनंट म्हणूनही कापूर अनेक कॉस्मेटिक्समध्ये वापरला जातो. त्यामुळे शरीराचा दाह कमी करण्यासाठी कापुराच्य तेलाचा उपाय करून पाहा. खोबरेल तेलामध्ये कापूराची पावडर करून टाका. ७ ते ८ तास तेल तसेच ठेवा आणि त्यानंतर या तेलाने चेहऱ्याला, कोरड्या पडलेल्या तळहातांना, तळपायांना मालिश करा. अंगातली उष्णता कमी होण्यास मदत होईल.
२. कापुराचा फेसपॅक
कापुराच्या दोन ते तीन वड्या घेऊन हातानेच त्यांची पावडर करा. त्यामध्ये थोडंसं दही आणि थोडासा मध घाला.
कशाला हवेत विकतचे कोल्ड्रिंक? उन्हाळ्यात थंड- थंड वाटण्यासाठी प्या ७ पेयं- आरोग्यासाठीही उत्तम
सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून एकजीव केल्यानंतर हा लेप चेहऱ्याला तसेच तळपाय, तळहात याठिकाणी लावा. १० ते १२ मिनिटांनी धुवून टाका. हा उपाय करण्यापुर्वी पॅच टेस्ट जरुर करून पाहा.