Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > 'हा' काळा पदार्थ रोज खा, म्हातारपणीही केस राहतील काळेभोर, दाट- पांढऱ्या केसांचं टेन्शनच विसरा

'हा' काळा पदार्थ रोज खा, म्हातारपणीही केस राहतील काळेभोर, दाट- पांढऱ्या केसांचं टेन्शनच विसरा

Hair Care Tips: कमी वयात केस पांढरे होत असतील तर पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करून बघाच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2026 09:35 IST2026-04-11T09:31:39+5:302026-04-11T09:35:01+5:30

Hair Care Tips: कमी वयात केस पांढरे होत असतील तर पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करून बघाच..

use of black sesame seeds for black hair, hair care tips using black sesame seeds and pumpkin seeds  | 'हा' काळा पदार्थ रोज खा, म्हातारपणीही केस राहतील काळेभोर, दाट- पांढऱ्या केसांचं टेन्शनच विसरा

'हा' काळा पदार्थ रोज खा, म्हातारपणीही केस राहतील काळेभोर, दाट- पांढऱ्या केसांचं टेन्शनच विसरा

बऱ्याच जणांचे केस कमी वयातच पांढरे व्हायला सुरुवात झालेली आहे. त्या झपाट्याने केस जर पांढरे होत गेले तर अगदी तिशीतच डोक्यावरचे सगळे केस पांढरे होतील की काय अशी भीती वाटायला लागते. केस पांढरे झाले की आत्मविश्वासही कमी होतो. शिवाय वारंवार केस रंगविण्याचाही कंटाळा येतोच. म्हणूनच आता पुढे सांगितलेला एक उपाय लगेचच करायला सुरुवात करा. हा उपाय केल्याने केस पांढरे होणं थांबेल. एवढंच नाही तर केस छान दाट होतील. त्वचेवरही चमक येईल आणि हाडंही मजबूत होतील. केस, त्वचा आणि हाडांचे आरोग्य उत्तम ठेवणारा हा कोणता उपाय ते पाहुया...(use of black sesame seeds for black hair)

 

केस पांढरे होऊ नयेत म्हणून घरगुती उपाय

हा उपाय करण्यााठी आपल्याला काळे तीळ लागणार आहेत. काळ्या तिळांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे केस, त्वचा आणि हाडांसाठी ते उत्तम आहेत.

रोज 'हे' सुपरफूड खा- वजन तर कमी होईलच, रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलही कंट्रोलमध्ये राहील

याशिवाय हिमोग्लोबिन वाढण्यासाठीही काळ्या तिळांचा उपयोग होतो. त्यामुळे हा उपाय केल्यास तुमचे केस तर काळे होतीलच पण आरोग्यालाही भरपूर लाभ होतील. शिवाय यामध्ये आपण भोपळ्याच्या बियाही घालणार आहोत. त्यातूनही मॅग्नेशियम, झिंक चांगल्या प्रमाणात मिळते. त्यामुळे केसांचे आरोग्य सुधारण्यास आणखीनच मदत होते.

 

हा उपाय करण्यासाठी काळे तीळ आणि भोपळ्याच्या बिया एकत्र करा आणि तव्यावर त्या मंद आचेवर भाजून घ्या. भाजून घेतलेल्या बिया आणि तीळ थंड झाल्यानंतर त्या मिक्सरच्या भांड्यात घाला.

चवदार गुलाबी बीटरुट रायते- उन्हाळ्यातल्या दुपारी जेवणात हवाच हा खास पदार्थ, ५ मिनिटांची सोपी रेसिपी

त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि थोडा मध घाला. हे सगळं मिक्सरमधून बारीक फिरवून घ्या. आता तयार झालेलं मिश्रण एका काचेच्या बरणीत भरून ठेवा. रोज सकाळी १ चमचा खा. यामुळे आरोग्याला खूप फायदे होतील. हा उपाय batati.being.batati या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 



 

Web Title : हमेशा काले बाल पाने के लिए इस काले भोजन को रोज खाएं

Web Summary : समय से पहले बाल सफेद हो रहे हैं? इस उपाय में काले तिल और कद्दू के बीज शामिल हैं, जो पोषक तत्वों से भरपूर हैं, जो संभावित रूप से बालों को काला करते हैं, त्वचा में सुधार करते हैं और हड्डियों को मजबूत करते हैं। सर्वोत्तम परिणामों के लिए इस मिश्रण का रोजाना एक चम्मच सेवन करें।

Web Title : Eat This Black Food Daily for Naturally Black Hair Forever

Web Summary : Premature graying? This remedy uses black sesame seeds and pumpkin seeds, rich in nutrients, to potentially darken hair, improve skin, and strengthen bones. Consume a daily spoonful of this mixture for optimal results.