हल्ली कमी वयातच केस पांढरे होण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. यासाठी अनेक गोष्टी जबाबदार आहेत. त्यापैकी एक म्हणजे आपला आहार योग्य नसणे. आहारातून पौष्टिक घटक पुरेशा प्रमाणात मिळाले नाहीत, तर त्याचा परिणाम केसांवर होतो. शिवाय केसांवर वारंवार वेगवेगळ्या कॉस्मेटिक्सचा मारा केला तर ते देखील केसांसाठी खूप हानिकारक ठरते. वाढते ऊन, धूळ, प्रदुषण यांचाही परिणाम केसांवर होतो. म्हणूनच केस कमी वयात पांढरे होऊ द्यायचे नसतील आणि त्यांचं आरोग्य जपायचं असेल तर आहारावर लक्ष केंद्रित तर कराच, पण त्यासोबतच भृंगराजचा एक आयुर्वेदिक उपायही करून पाहा..(use of bhringraj for gray hair)
केस पांढरे होऊ नयेत म्हणून उपाय
केस पांढरे होऊ नयेत म्हणून भृंगराज खूप उपयोगी ठरते. भृंगराजला केसरंजन असेही म्हणतात. त्यामुळे त्याचा उपयोग करून पांढरे केस काळे करता येतात. त्यासाठी दोन पद्धतींनी भृंगराज वापरायला हवे. ते कसे ते पाहूया..
होणाऱ्या नवरीकडे असायलाच हव्या ५ प्रकारच्या बांगड्या, पाहा कोणत्या प्रसंगी कोणती बांगडी घालावी
१. हा उपाय करण्यासाठी भृंगराज पावडर आणि आवळा पावडर दोन्हीही सम प्रमाणात घ्या. यानंतर त्यात थोडं पाणी घालून ते कालवून घ्या. आता हा लेप तुमच्या केसांना लावा. अर्धा ते पाऊण तासाने केस धुवून टाका. यामुळे केस पांढरे होणं तर कमी होईलच, पण त्यासोबतच केसांची मुळं पक्की होऊन केस गळण्याचं प्रमाणही कमी होईल.
२. दुसरा उपाय करण्यासाठी आपण घरच्याघरी भृंगराज तेल तयार करणार आहोत. हा उपाय करण्यासाठी एक वाटी खोबरेल तेल घ्या. त्यामध्ये एक चमचा भृंगराज पावडर, १ चमचा मेथ्या आणि १ चमचा कलौंजी घाला.
पिंपल्स गेले पण त्यांचे डाग चेहऱ्यावर तसेच आहेत? संत्र्याच्या सालींचा 'हा' उपाय करा, लगेच फरक दिसेल
आता या तेलाला २ ते ३ मिनिटे उकळू द्या. यानंतर तेल गाळून घ्या. या तेलाने आठवड्यातून दोन वेळा डोक्याला मालिश करा आणि त्यानंतर एखाद्या तासाने केस धुवून घ्या. केस अकाली पांढरे होण्याचं प्रमाण बरंच कमी होईल.
