थंडीचा कडाका आता सगळीकडेच चांगलाच वाढलेला आहे. हिवाळ्यातल्या थंड आणि कोरड्या हवेचा परिणाम लगेचच आपल्या त्वचेवर दिसून येतो आणि त्वचा काळवंडून जाते. कोरडी पडते. अशा कोरड्या पडलेल्या त्वचेला पुन्हा एकदा मऊ, मुलायम आणि चमकदार करायचं असेल तर केळीच्या सालींचा पुढे सांगितलेल्या पद्धतीने वापर करून पाहा (use of banana peel for glowing skin). हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये दिसून येणारा फरक एवढा छान वाटेल की यानंतर केळीची सालं तुम्हाला कधीच टाकून द्यावी वाटणार नाहीत.(how to make banana peel face mask and scrub for glowing skin?)
त्वचेसाठी केळीची सालं कशा पद्धतीने वापरावी?
१. केळीचा फेसमास्क
केळीचा फेसमास्क तयार करण्यासाठी सगळ्यात आधी केळीची सालं बाहेरच्या बाजुने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करा आणि ते मिक्सरमध्ये फिरवून त्याची पेस्ट करा.
केस गळणं थांबून वाढतील दुपटीने! कांद्याचा रस घेऊन 'हा' शाम्पू तयार करा, केस होतील दाट
आता ही पेस्ट एका वाटीमध्ये काढा. त्यामध्ये थोडा मध आणि थोडं गुलाबपाणी घाला. सगळं व्यवस्थित एकत्र केल्यानंतर हा लेप चेहऱ्याला लावा. १० ते १५ मिनिटांनी हलक्या हाताने चोळून चेहरा धुूूवून टाका. त्वचा छान मऊ पडेल.
२. केळीच्या सालींचं स्क्रबर
चेहऱ्यावरची डेडस्किन, टॅनिंग काढून टाकण्यासाठीही केळीच्या सालांचा खूप चांगला उपयोग करता येतो. यासाठी एका वाटीमध्ये थोडी पिठीसाखर आणि थोडी काॅफी पावडर घ्या.
नीतू कपूरला मुळीच आवडली नव्हती आलियाने तिच्या लग्नात केलेली 'ही' गोष्ट, दोघींची होती टाेकाची मतं..
हे दोन्ही पदार्थ एकत्र करा. त्यानंतर केळीच्या सालाचा एक छोटा तुकडा घ्या. तो तुकडा आतल्या बाजुने तयार कॉफी आणि साखरेच्या मिश्रणात बुडवा आणि त्यानंतर तो चेहऱ्यावर चोळा. ४ ते ५ मिनिटे चेहऱ्याला या पद्धतीने मसाज केल्यानंतर चेहरा धुवून टाका. काळवंडलेली त्वचा स्वच्छ, नितळ दिसेल.
