दिवाळसण आता अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे. त्यामुळे अनेकजणी जसा वेळ मिळेल तसं पार्लरमध्ये जाऊन फेशियल, क्लीन-अप करून घेत आहेत. पण काहीजणी कामात एवढ्या गुरफटलेल्या असतात की त्यांना पार्लरमध्ये जाण्यासाठी अजिबातच वेळ मिळत नाही. अशा मैत्रिणींसाठी तुरटीचा हा एक खास उपाय. तुरटीचा फेसपॅक करून पुढे सांगितलेल्या पद्धतीने चेहऱ्याला लावा (Use of Alum or Fitkari For Glowing Skin). पिगमेंटेशन, डार्क सर्कल्स तसेच डार्क स्पॉट कमी होऊन चेहऱ्यावर छान चमक येईल.(how to use alum or fitkari for reducing dark spots and pigmentation?)
पिगमेंटेशन, डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी तुरटीचा उपाय
हा उपाय करण्यासाठी बाजारातून तुरटीचा एक खडा विकत आणा. तुरटीच्या खडा फोडून त्याची बारीक पावडर करा. गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवा. तवा गरम झाल्यानंतर त्यावर तुरटीची पावडर टाका आणि ती हलवत राहा. हळूहळू तुरटीच्या पावडरला पाणी सुटेल आणि त्याची वाफ होऊन जाईल.
Diwali 2025: ऋजुता दिवेकर सांगतात ३ खास टिप्स- चेहऱ्यावर येईल दिव्यांसारखं सोनेरी तेज..
अशा पद्धतीने जेव्हा तुरटीमधलं मॉईश्चर पूर्णपणे निघून जाईल तेव्हा तव्यावर जमा झालेली तुरटीची पावडर वेगळी काढून घ्या. एका वाटीमध्ये १ चमचा मुलतानी माती घ्या. त्यामध्ये एक ते दीड टीस्पून तुरटीची पावडर घाला. यामध्ये गुलाबपाणी घालून त्याची छान पेस्ट तयार करून घ्या.
हा झाला तुरटीचा फेसपॅक तयार. आता चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर तयार केलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावा. त्यानंतर १० ते १२ मिनिटांनी हलक्या हाताने चोळून चेहरा धुऊन टाका.
जुन्या, टाकाऊ बाटल्यांपासून करा सुंदर, आकर्षक दिवे- बघा सोपी युक्ती, दिवाळीत उजळेल घर
चेहरा धुतल्यानंतर आठवणीने माॅईश्चराईज करा. आठवड्यातून एकदा हा उपाय करा. काही दिवसांतच त्वचेमध्ये खूप छान फरक दिसून येईल. हा उपाय करताना सुरुवातीला पॅच टेस्ट जरूर घ्या. त्वचेला काही त्रास झाला नाही तर मग हा फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावा.