केस पांढरे (Grey Hairs) होण्याचा त्रास आजकाल तरूणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच जाणवतो. एकदा केस पिकले की ते पुन्हा काळे करणं हा मोठा टास्क असतो. डाय लावल्याला सुरूवात केली तर नेहमीच डाय लावून केस काळे करावे लागतात अन्यथा केस पांढरे दिसतात (How To Get Black Hairs Naturally). घरगुती उपाय केस काळे करण्यासाठी परीणामकारक ठरतात. त्यातीलच एक म्हणजे कढीपत्ता कढीपत्त्याचा वापर केसांवर केल्यास तुम्ही काळेभोर सुंदर केस मिळवू शकता. आपल्या सर्वांच्याच घरी कढीपत्ता असतो. ५ ते १० रूपयांना मिळणाऱ्या कढीपत्त्याचा वापर करून केस कसे काळे करायचे ते पाहूया. (Use Curry Leaves To Get Rid Of Grey Hairs)
संशोधनानुसार कढीपत्त्यात असलेले पोषक घटक केसांना नैसर्गिकरित्या केस काळे करण्यासाठी आवश्यक ठरतात. मेलेनिनची कमतरता केस पांढरे होण्याचं प्रमुख कारण आहे. कढीपत्त्यात अनेक औषधी गुणधर्म आढळतात. यात एंटी ऑक्सिडेंट्स, व्हिटामीन बी, बीटा कॅरोटीन आणि प्रोटीन्स असतात. जे केसांसाठी आवश्यक असतात. व्हिटामीन बी केस अकाली पांढरे होण्यापासून रोखते (Ref). बीटा कॅरोटीन केसांच्या मुळांना मजबूत बनवते ज्यामुळे केस गळणंही कमी होतं आणि केस चांगले वाढतात.
कढीपत्ता केसांवर कसा लावावा? (How To Apply Curry Leaves on Hairs)
1) ८ ते १० कढीपत्ते वाटून घ्या. यात थोडं पाणी मिसळून पातळ पेस्ट बनवा. ही पेस्ट स्काल्पला थोडावेळ लावून ठेवा. कमीत कमी ३० मिनिटांनी स्वच्छ शॅम्पूनं केस धुवा. या उपायानं तुम्हाला केसांची नैसर्गिक चमक परत आलेले दिसून येईल.
2) कढीपत्त्याच्या पेस्टमध्ये मोहोरी, नारळ, बदाम किंवा इतर इसेंशियल ऑईल मिसळून लावा. आधी तेल गरम करून घ्या नंतर केसांना लावा. ३० मिनिटांपासून ते ३ ते ४ तास तुम्ही केसांना लावून ठेवू शकता. ज्यामुळे केसांवर चांगला परीणाम दिसून येईल.
3) कढीपत्त्याप्रमाणेच आवळासुद्धा केसांसाठी फायदेशीर ठरतो. यात व्हिटामीन सी आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. कढीपत्ता, १ ते २ आवळे वाटून याची पेस्ट बनवून घ्या. यात तुम्ही लिंबाचा रस मिसळू शकता.कमीत कमी ३० मिनिटं लावून ठेवा नंतर केस धुवा.
4) कढीपत्ता पावडर आणि मेहंदी पावडरमध्ये मोहरी, नारळाचं तेल, बदामाचं तेल घालून व्यवस्थित शिजवून घ्या. तेल जास्त काळं होणार नाही याची काळजी घ्या. हे मिश्रण थंड केल्यानंतर ३ ते ४ तासांसाठी तसंच ठेवा. नंतर केसांना लावा. एक तासाने केस स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय केल्यानं केस नैसर्गिकरित्या काळे होण्यास मदत होईल.