Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > डोक्यावर पांढरे केस धाग्यासारखे चमकतात? ५ रुपयांच्या तुरटीची कमाल-मुळापासून काळे होतील केस

डोक्यावर पांढरे केस धाग्यासारखे चमकतात? ५ रुपयांच्या तुरटीची कमाल-मुळापासून काळे होतील केस

Use Alum Fitkari For White Hairs : जेनेटिक कारणं, जास्त ताण येणं, चुकीचा आहार, पोषक तत्वांची कमतरता, केमिकल्सयुक्त उत्पादनांचा अतिवापर यामुळे केस पांढरे होतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 16:18 IST2026-02-09T16:03:49+5:302026-02-09T16:18:27+5:30

Use Alum Fitkari For White Hairs : जेनेटिक कारणं, जास्त ताण येणं, चुकीचा आहार, पोषक तत्वांची कमतरता, केमिकल्सयुक्त उत्पादनांचा अतिवापर यामुळे केस पांढरे होतात.

Use Alum Fitkari For White Hairs : Home Remedies For White Hairs Use Alum Fitkari | डोक्यावर पांढरे केस धाग्यासारखे चमकतात? ५ रुपयांच्या तुरटीची कमाल-मुळापासून काळे होतील केस

डोक्यावर पांढरे केस धाग्यासारखे चमकतात? ५ रुपयांच्या तुरटीची कमाल-मुळापासून काळे होतील केस

केस पांढरे होणं आपण ठरवूनही थांबवू शकत नाही. विशिष्ट वयोगटात केस पांढरे व्हायला सुरूवात होतेच. तर वय कमी असतानाच केस पांढरे व्हायला सुरूवात झाली असेल आणि तुम्ही केमिकलयुक्त डाय वापरायला सुरूवात केली तर केस अजूनच पांढरे होऊ लागतील. केसांना नैसर्गिकरित्या काळे  करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. (Use Alum Fitkari For White Hairs)

ज्यामुळे तुमचे केस काळे राहतील आणि त्याचे काही साईड इफेक्टसही दिसणार नाहीत. केमिकल्स न वापरता केसांची योग्यप्रकारे काळजी घेऊ शकता. जेनेटिक कारणं, जास्त ताण येणं, चुकीचा आहार, पोषक तत्वांची कमतरता, केमिकल्सयुक्त उत्पादनांचा अतिवापर यामुळे केस पांढरे होतात.

केसांसाठी फायदेशीर ठरते तुरटी

तुरटी केसांसाठी अनेकदृष्ट्या फायदेशीर ठरते. यात एंटी बॅक्टेरिअल, एंटी फंगल प्रॉप्रटीज असतात ज्यामुळे केस चांगले राहतात. खाज, कोंडा, केस गळणं केस पांढरे होणं हे त्रास कमी होतात.  केस स्वच्छ चांगले ठेवण्यासाठी तुरटी फायदेशीर ठरते. तुरटीचा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुरटीची पावडर, आवळा पावडर, कढीपत्ता, लिंबाचा रस हे साहित्य लागेल. 

सगळ्यात आधी तुरटीची पावडर घेऊन एका दगडावर वाटून घ्या. नंतर यात आवळा पावडर आणि कढीपत्ता घाला. शेवटी लिंबाचा रस घालून हे सर्व साहित्य पाण्यात उकळवून घ्या. तुम्ही शॅम्पूऐवजी या मिश्रणानं केस धुवू शकता. हा उपाय केल्यानं पांढरे केस हळूहळू काळे होऊ लागतील. केस मुळांपासून काळे होण्यास मदत होईल, केस मजबूत राहतील तसंच केसांचे टेक्स्चर सुधरण्यासही मदत होईल.

 तुरटी त्वचेवरील मृत पेशी आणि बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत करते. ज्यामुळे कोंड्याची समस्या कमी होते. तुरटीमध्ये उवा मारण्याचे गुणधर्म असतात. तुरटीच्या पाण्यानं केस धुतल्यानं उवांपासून सुटका मिळते. डोक्याची त्वचा स्वच्छ राहिल्यानं केसांची मुळं मजबूत होतात आणि केस गळती कमी होण्यास मदत होते. ज्यांचे केस खूपच तेलकट असतात त्यांच्यासाठी तुरटी नैसर्गिक एस्ट्रिंजंट म्हणून काम करते आणि जास्तीचं तेल शोषून घेते.

Web Title : सफेद बालों के लिए फिटकरी: प्राकृतिक रूप से सफेद बाल काले करें।

Web Summary : फिटकरी सफेद बालों को काला करने का एक प्राकृतिक उपाय है। इसके जीवाणुरोधी और एंटिफंगल गुण खोपड़ी को साफ करते हैं, रूसी, बालों के झड़ने और सफेदी को कम करते हैं। फिटकरी, आंवला पाउडर, करी पत्ते और नींबू के रस का मिश्रण, जब हेयर वॉश के रूप में उपयोग किया जाता है, तो बालों को मजबूत कर सकता है और इसकी बनावट में सुधार कर सकता है।

Web Title : Alum for grey hair: Reverses white hair to black naturally.

Web Summary : Alum offers a natural solution for turning grey hair black. Its antibacterial and antifungal properties cleanse the scalp, reducing dandruff, hair fall, and greying. A mixture of alum, amla powder, curry leaves, and lemon juice, when used as a hair wash, can strengthen hair and improve its texture.