Join us
Daily Top 2Weekly Top 5

तांदूळ धुवून फेकतो ते पाणीच देईल तुम्हाला उर्फी जावेदसारखा 'ग्लो’! पाहा उर्फी नेमकं काय करते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2026 14:55 IST

Urfi Javed skin care remedy : Urfi Javed summer skin care home remedy : urfi javed skincare routine with rice water : उन्हाळ्यात त्वचा शांत आणि फ्रेश ठेवण्यासाठी उर्फी नक्की कोणता घरगुती उपाय करते पाहा...

आपल्या अतरंगी फॅशनमुळे कायम चर्चेत राहणारी उर्फी जावेद तिच्या ग्लोइंग स्किनसाठीही तितकीच लोकप्रिय आहे. उन्हाळ्यात कडक ऊन आणि घामामुळे त्वचेची जळजळ, रॅशेस आणि टॅनिंग होणं फारच कॉमन आहे. अशावेळी महागड्या ब्यूटी प्रॉडक्ट्सवर खर्च करण्याऐवजी उर्फी जावेद एक खास घरगुती उपाय करणं अधिक जास्त पसंत करते. त्वचेला आतून थंडावा देण्यासाठी आणि चेहऱ्याचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी ती नैसर्गिक पदार्थांचा वापर करते. उर्फीचे हे 'स्किन केअर सिक्रेट' केवळ सोपे नाही तर अतिशय फायदेशीर देखील आहे(Urfi Javed summer skin care home remedy).

रणरणतं ऊन वाढलं की, त्वचेवर रॅशेस, जळजळ आणि काळवंडलेपणा येणं फारच कॉमन आहे. पण या समस्यांपासून वाचण्यासाठी तुम्हाला पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. फॅशन आयकॉन उर्फी जावेदने (Urfi Javed) उन्हाळ्यात त्वचा शांत आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी एक साधा पण सहजसोपा घरगुती उपाय शेअर केला आहे. तुमच्या किचनमध्ये सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून बनवलेला हा उपाय उन्हाळ्यात तुमच्या त्वचेला बर्फासारखा थंडावा देईल... उन्हाळ्यात त्वचा शांत आणि फ्रेश (Urfi Javed skin care remedy) ठेवण्यासाठी उर्फी नक्की काय करते? ते पाहा... 

काय आहे उर्फीचं स्किन केअर सिक्रेट ?

१. तांदुळाच्या पाण्याचे आईस क्यूब :- उर्फीच्या वेगवेगळ्या नवनवीन प्रयोगांपैकी ती स्किनकेअरसाठी तांदुळाच्या पाण्याचा वापर करते. तांदुळाचं पाणी तयार करण्यासाठी ती तांदूळ एका काचेच्या जारमध्ये पाण्यासोबत भिजवते आणि नंतर त्याला तीन दिवसांसाठी उन्हात ठेवून देते. तीन दिवसांनंतर जेव्हा ती हा जार उघडते, तेव्हा त्यातून एक विशिष्ट वास येतो, ज्याचा अर्थ असा की ते 'फरमेंट' झाले आहे. आता यातून पाणी आणि तांदूळ वेगळे करून घ्या. त्यानंतर या पाण्याचे 'आईस क्यूब' बनवून घ्या. आता दररोज एक आईस क्यूब चेहऱ्यावर लावा. याने चेहऱ्यावर व्यवस्थित मसाज करावा. 

आई झाल्यावर आलिया भटने ३ महिन्यात कमी केलं १६ किलो वजन, तिनं केल्या फक्त ६ गोष्टी-वाचा कोणत्या...

२. तांदुळाच्या पिठाचा फेसमास्क :- यासोबतच, पाण्यांत भिजवले तांदूळ व्यवस्थित वाळवून घ्या. तांदूळ नीट वाळले की ते  तांदूळ व्यवस्थित दळून घ्या आणि त्याचे पीठ तयार करा. त्यानंतर या पिठामध्ये मुलतानी माती, कोरफड जेल, दही असे ३ पदार्थ प्रत्येकी चमचाभर व्यवस्थित मिसळून घ्या आणि रोज हा फेसमास्क चेहऱ्याला लावून हलकेच मसाज करावा. १० ते १५ मिनिटे तसेच चेहऱ्यावर ठेवून मग पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. 

रणरणत्या उन्हातही घर राहील थंडगार पाहा १० टिप्स - वीजबील येईल कमी, घर राहील ठंडाठंडा - कूलकूल...

उन्हाळ्यात त्वचेसाठी 'हा' उपाय करण्याचे फायदे... 

१. तांदुळाच्या पाण्याचे आईस क्यूब चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला लगेच कूलिंग इफेक्ट मिळतो. यामुळे जळजळ आणि रॅशेस कमी होण्यास मदत होते.

२. उन्हामुळे आलेला काळवंडलेपणा कमी करण्यासाठी हा उपाय उपयोगी ठरतो. त्वचा हळूहळू क्लिअर आणि उजळ दिसू लागते.

३. कोरफड जेल आणि दहीमुळे त्वचेला आवश्यक ओलावा मिळतो. त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही आणि फ्रेश वाटते.

४. तांदुळाचं पाणी आणि त्यापासून तयार केलेला फेसमास्क त्वचेचा टेक्स्चर सुधारतो आणि नैसर्गिक ग्लो वाढवतो.

५. मुलतानी माती आणि कोरफडमुळे त्वचेतील अतिरिक्त तेल कमी होतं, ज्यामुळे पिंपल्स आणि रॅशेस नियंत्रणात राहतात.

६. आईस क्यूबने मसाज केल्याने पोर्स टाईट होतात आणि त्वचा अधिक टवटवीत दिसते.

७. फरमेंटेड राइस वॉटरमध्ये व्हिटॅमिन बी, सी आणि ई मुबलक प्रमाणात असते. हे त्वचेचा टोन सुधारण्यास मदत करते आणि चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक आणते.

८. तांदळाच्या पावडरीमध्ये मुलतानी माती आणि दही मिसळून लावल्याने चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषले जाते. यामुळे पिंपल्सची समस्या कमी होते आणि जुने डाग हलके होण्यास मदत होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Urfi Javed's rice water secret for glowing skin revealed!

Web Summary : Urfi Javed favors a simple homemade remedy for glowing skin: fermented rice water. She uses rice water ice cubes and a rice flour face mask with multani mitti, aloe vera, and yogurt to cool, hydrate, and brighten her skin, reducing blemishes and adding a natural glow.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीउर्फी जावेदसमर स्पेशल