Join us

अप्पर लिप्सचे केस वाढले? करा बेसनाचा झक्कास उपाय - वेदना न होता केस निघतील सहज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2025 12:00 IST

upper lip hair removal home remedy without pain : natural ways to remove upper lip hair at home : painless upper lip hair removal remedy : अप्पर लिप्सचे केस काढायचे म्हणजे होतात वेदना, करुन पाहा 'हा' खास घरगुती उपाय..

अप्पर लिप्सच्या केसांची वाढ झाल्यावर बहुतेकजणी ते काढून टाकणेच पसंत करतात. अप्पर लिप्स करायचं म्हणजे अनेकींना याच प्रचंड टेंन्शनच येत. अप्पर लिप्सचे नको असलेले केस काढणे हे एक वेदनामय आणि खर्चिक काम असते. अप्पर लिप्स करताना, थ्रेडिंग असो वा वॅक्सिंग प्रत्येकवेळी पार्लरमध्ये जाऊन वेदना सहन कराव्या लागतात आणि त्वचेवर लालसरपणा (upper lip hair removal home remedy without pain) येणे किंवा पुरळ उठणे अशा समस्याही उद्भवू शकतात. अप्पर लिप्स करताना वारंवार पार्लरला जाणे आणि वेदना सहन करणे या त्रासातून सुटका हवी असेल, तर त्यावर एक अत्यंत सोपा, नैसर्गिक आणि असरदार घरगुती उपाय आहे(natural ways to remove upper lip hair at home).

अप्पर लिप्स करण्यासाठी पार्लरला न जाता, घरीच नैसर्गिक पद्धतीने, वेदनेशिवाय हे करता आलं तर किती बरं होईल असे वाटते. यासाठी एक सोपा आणि सुरक्षित उपाय म्हणजे बेसनाचा लेप. बेसन त्वचेसाठी उपयुक्त असून तो केसांची मुळे सैल करून केस सहजपणे काढण्यास मदत करतो. विशेष म्हणजे, या उपायामुळे फक्त केसच निघत नाहीत, तर त्वचेचा रंग उजळतो आणि वाढणारे केस ( painless upper lip hair removal remedy) हळूहळू कमी होतात. यासाठीच, पार्लरमध्ये जाऊन वेळ आणि पैसे खर्च करण्याऐवजी आपण घरच्याघरी झटपट बेसनाचा लेप करून अप्पर लिप्सवरील केस सुरक्षितरीत्या काढू शकतो. यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूयात. 

अप्पर लिप्सचे केस काढण्यासाठी बेसन कसे काम करते?

बेसनामध्ये नैसर्गिक एक्सफोलिएटिंग गुणधर्म (Natural Exfoliating Properties) असतात. जेव्हा हे बेसन दूध, गुलाबपाणी किंवा दूध, दही यांसारख्या घटकांसोबत मिसळून त्याची पेस्ट बनवली जाते, तेव्हा ते त्वचेच्या वरच्या थरावर साचलेली घाण आणि डेड स्किन काढून टाकण्यास मदत करते. हा लेप सुकल्यावर, जेव्हा तो हलक्या हातांनी रगडला जातो, तेव्हा बारीक आणि छोटे केस देखील त्वचेतून त्या पेस्टसोबत सहजपणे बाहेर निघतात. 

केसांच्या प्रकारानुसार ठरवा आठवड्यातून कितीवेळा केस धुणं आवश्यक? केसांच्या तक्रारी होतील कमी, दिसतील सुंदर...

अप्पर लिप्ससाठी बेसन पॅक बनवण्याची सोपी पद्धत... 

एका वाटीत बेसन घ्या आणि त्यात हळद, गुलाबपाणी किंवा दही, दूध मिसळा. या मिश्रणामध्ये एक चिमूटभर हळद घाला. तयार झालेली ही पेस्ट अप्पर लिप्सच्या भागावर १० ते १५ मिनिटे लावून ठेवा. लेप हलका सुकल्यावर, तो हळू हळू घासून काढून टाका.

केस गळतात, कोंडाही वाढलाय? जावेद हबीब सांगतात, शाम्पूत मिसळा १ पदार्थ - केसांच्या सौंदर्यात पडेल भर... 

हा बेसन पॅक कसा आहे फायदेशीर... 

१. बेसन :- त्वचेवरील केस सैल करून सहजपणे काढायला मदत करतो व त्वचेवर नैसर्गिक क्लिन्झरचे काम करतो.

३. हळद :- हळदीमधील अँटीसेप्टिक गुणधर्मामुळे त्वचेवर लालसरपणा, इन्फेक्शन टाळते आणि उजळपणा देते.

४. दूध :- त्वचेची आर्द्रता टिकवते, कोरडेपणा कमी करते आणि मऊपणा आणते.

५. दही :- त्वचेला पोषण देते, सूज व जळजळ कमी करतो आणि नैसर्गिक ग्लो आणते.

६. गुलाबपाणी :- त्वचेला उजळपणा आणि नैसर्गिक ग्लो देतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Besan remedy for upper lip hair removal: Painless, easy solution.

Web Summary : Remove upper lip hair painlessly at home with a besan (gram flour) pack. This natural remedy exfoliates, lightens skin, and reduces hair growth. Mix besan with turmeric, rose water, or milk/yogurt, apply for 10-15 minutes, and gently scrub off for smooth, hair-free skin.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय