lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > ट्विंकल खन्नानं सांगितलं तिचं ब्यूटी सिक्रेट; ग्लोइंग आणि फ्रेश त्वचेसाठी खाते एका ‘खास’ फळाची सालं

ट्विंकल खन्नानं सांगितलं तिचं ब्यूटी सिक्रेट; ग्लोइंग आणि फ्रेश त्वचेसाठी खाते एका ‘खास’ फळाची सालं

ट्विंकल खन्नाच्या चेहेर्‍यावर आजही पूर्वीसारखंच तेज आणि ताजेपणा आहे. याचं गुपित तिनंच एका इन्स्टाग्रामवरील पोस्टमधे शेअर केलं आहे. ट्विंकल संत्र्याचं साल खाते. नुसतंच संत्र्याचं नाही तर क जीवनसत्त्वं असलेली सर्व फळांची सालं खाते.यामागचं कारणही तिनं सांगितलं आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 03:57 PM2021-09-27T15:57:21+5:302021-09-27T16:04:30+5:30

ट्विंकल खन्नाच्या चेहेर्‍यावर आजही पूर्वीसारखंच तेज आणि ताजेपणा आहे. याचं गुपित तिनंच एका इन्स्टाग्रामवरील पोस्टमधे शेअर केलं आहे. ट्विंकल संत्र्याचं साल खाते. नुसतंच संत्र्याचं नाही तर क जीवनसत्त्वं असलेली सर्व फळांची सालं खाते.यामागचं कारणही तिनं सांगितलं आहे.

Twinkle Khanna reveals her beauty secret; A ‘special’ fruit peel that accounts for glowing and fresh skin | ट्विंकल खन्नानं सांगितलं तिचं ब्यूटी सिक्रेट; ग्लोइंग आणि फ्रेश त्वचेसाठी खाते एका ‘खास’ फळाची सालं

ट्विंकल खन्नानं सांगितलं तिचं ब्यूटी सिक्रेट; ग्लोइंग आणि फ्रेश त्वचेसाठी खाते एका ‘खास’ फळाची सालं

Highlightsसंत्र्याच्या सालीत संत्र्याच्या फोंडीपेक्षा जास्त फायबर असतं. संत्र्याच्या सालीतले गुणधर्म आतड्यांचं आरोग्य नीट ठेवतं. या सालांमुळे त्वचेच्या पेशी निरोगी राहातात.संत्र्यासोबतच लिंबू आणि मोसंबी यांची सालंही खावीत , ती वाळवून पावडर स्वरुपात ती सेवन करावी आणि त्वचेवरही लावावी, असं ट्विंकल सांगते.

ट्विंकल खन्नाचा बरसात हा पहिला चित्रपट आला तेव्हा तिचा अभिनय, नृत्य यापेक्षा सर्वात जास्त चर्चा झाली ती तिच्या चेहेर्‍यावरच्या तेजाची. विशेष मेकअप नसतानाही एकदम फ्रेश दिसणार्‍या ट्विंकलच्या सौंदर्याचं गुपित काय बरं असेल ? असं तेव्हा कुतुहल निर्माण झालं होतं. तेच कुतुहल आजही आहे. भलेही ट्विंकल आज चित्रपटात काम करत नसली तरी बॉलिवूडमधील अतिशय हुशार अभिनेत्री अशीच तिची ओळख आहे. तिचं वाचन, लेखन, सोशल मीडियावरच्या तिच्या पोस्ट यासर्व गोष्टी सतत चर्चेत असतात. तिच्या चेहेर्‍यावर आजही पूर्वीसारखंच तेज आणि ताजेपणा आहे. याचं गुपित तिनंच एका इन्स्टाग्रामवरील पोस्टमधे शेअर केलं आहे. या पोस्टची सुरुवातच ट्विंकल ‘माझं एक सिक्रेट आहे’ असं म्हणत करते. ती म्हणते की मी संत्र्याचं साल खाते. नुसतंच संत्र्याचं नाही तर क जीवनसत्त्वं असलेली सर्व फळांची सालं खाते.

फळांची सालं वाळवून, त्याची पावडर करुन चेहेर्‍यासाठी वापरतात हे माहिती आहे. पण ट्विंकल त्यापेक्षा आणखी वेगळं सांगते आहे, संत्र्याच्या सालीची कडवट चव बघता असं साल ट्विंकंल का खात असावी असा प्रश्न पडतो. पण ट्विंकल केवळ संत्र्याचंच साल खाते असं नाही तर क जीवनसत्त्व असलेल्या सर्व आंबट फळांची सालं ट्विंकल आवडीनं खाते.
ट्विंकल केवळ आपण आंबट फळांची सालं खातो एवढं गुपित सांगून थांबत नाही तर हे साल खाण्यामागचं कारणही ती सांगते. तसेच संत्र्याच्या सालीच्या फायद्यांबद्दल तिने सविस्तर सांगितलं आहेच शिवाय या सालींचा उपयोग करण्याच्या पध्दतीही सांगितल्या आहेत.

Image: Google

ट्विंकल संत्र्याचं सालं का खाते?
ट्विंकल म्हणते संत्र्याच्या सालीत संत्र्याच्या फोंडीपेक्षा जास्त फायबर असतं. तिच्या या पोस्टवर चर्चा व्हायला लागली तेव्हा सौंदर्य तज्ज्ञांनीही संत्र्याच्या सालीत असलेल्या गुणधर्मांबद्दल सांगितलं. संत्र्याचं साल खूप गुणकारी असतं. त्वचा आणि केस यासाठी संत्र्याच्या सालीतल्या गुणधर्मांचा उपयोग होतो. संत्र्याची सालं वाळवून त्याची पावडर करुन ती चेहेरा आणि केसांसाठी वापरली जाते. संत्र्याच्या सालीतले गुणधर्म चेहेर्‍यावरचं तेज वाढवतात.

Image: Google

ट्विंकल म्हणते संत्र्याची सालं वाळवून पावडर करुन ती चेहेर्‍याला लावल्यानं चेहेरा चमकतो हे खरं. पण संत्र्याची ताजी सालं खाल्ली तर त्याचा फायदा खूप होतो. संत्र्याच्या सालीतले गुणधर्म आतड्यांचं आरोग्य नीट ठेवतं. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. या सालांमुळे त्वचेच्या पेशी निरोगी राहातात. संत्र्याच्या सालीचा उपयोग केवळ सौंदर्याशी निगडित नसून संपूर्ण आरोग्यासाठी संत्र्याचं साल फायदेशीर ठरतं. यातील गुणधर्म पोटात गेल्यानं पचन क्रिया सुधारुन वजन कमी होतं तसेच कर्करोगासारख्या आजाराचा धोकाही कमी होतो.
संत्र्यासोबतच लिंबू आणि मोसंबी यांची सालंही खावीत , ती वाळवून पावडर स्वरुपात ती सेवन करावी आणि त्वचेवरही लावावी. कारण आंबट फळांच्या सालींमधे फ्लेवोनॉइडस असतात. हा घटक त्वचेच्या पेशींच्या आरोग्यासाठी महत्त्वपूृर्ण असतो.
तसेच आहारतज्ज्ञही सांगतात की, संत्र्याच्या सालीत आणि इतर आंबट फळांच्या सालींमधे स्ट्रेपरिडिन हा घटक असतो. हा घटक कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित करतो. आंबट फळांच्या सालीतले गुणधर्म हदयाचं आरोग्य जपतात तसेच ते खाल्ल्यानं शरीरातील रक्त प्रवाह सुरळित होतो. त्याचा त्वचेवर होणारा परिणाम म्हणजे त्वचा तरुण आणि तेजस्वी दिसते.

Image: Google

आपल्या पोटाचं आरोग्य कसं आहे ते आपल्या चेहेर्‍यावरुन आणि त्वचेवर इतरांना सहज ओळखता येतं असं तज्ज्ञ म्हणतात. पचन व्यवस्था नीट नसेल तर त्याचा परिणाम त्वचा खराब होते. कारण अन्नाचं पचन नीट झालं नाही तर त्वचेच्या पेशींचं पुरेसं पोषण होत नाही. त्यामुळे त्वचेच्या छोट्या मोठ्या तसेच गंभीर समस्या निर्माण होतात. संत्र्याची सालं वाळवून त्याची पावडर करुन ठेवावी. पोटाचं आरोग्य सुधारण्यासाठी रोज सकाळी एक चमचा संत्र्याच्या सालांची पावडर खावून त्यावर पाणी प्यावं. असं तज्ज्ञ सांगतात. पण ट्विंकल खन्नानं याचा अनुभव घेतला आहे. या संत्र्याची सालं खाल्ल्यानं काय होतं?याबद्दलच्या माहितीचा उपयोग इतरांनाही व्हावा म्हणून ट्विंकल खन्नानं संत्र्याची साल खाण्याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. ही पावडर सकाळी रिकाम्या पोटी नियमित खावी लागते. ती खाण्यापूर्वी एकदा आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ते आपली प्रकृती आणि गरज बघून पावडर किती खावी याबद्दल मार्गदर्शन करतात.
ट्विंकल ही संत्र्याची आणि इतर आंबट फळांची ताजी सालं खाते , तसेच संत्र्याची सालं वाळवून त्याची पावडर करुन ती पावडर ती आपल्या बागेत घालते तसेच आंघोळीच्या वेळेस स्क्रब पावडर म्हणून वापरते. ट्विंकलनं सांगितलेलं तिचं हे गुपित सगळ्यांसाठीच फायद्याचं आहे. संत्री सोलल्यावर त्याची सालं फेकून देताना कायम ट्विंकलची ही पोस्ट संत्र्याची सालं फेकू नका ती खा याची आठवण करुन देईल

Web Title: Twinkle Khanna reveals her beauty secret; A ‘special’ fruit peel that accounts for glowing and fresh skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.