सणासुदीच्या काळात आपली त्वचा सुंदर तजेलदार असावी असं प्रत्येकाला वाटतं. पार्लरमध्ये जाऊन आपण अनेक महागड्या टिट्रमेंट्सवर पैसे खर्च करतो.(Skin Tanning) परंतु काळवंडलेल्या त्वचेकडे कायम दुर्लक्ष करतो. ज्यामुळे चेहरा आणि मान किंवा हाताचे कोपरे यांसोबत त्वचेचा रंग काही मिळत नाही.(turmeric for glowing skin) लवकर दिवाळीचा सण येणार आहे. या काळात घर आवरणं, सजवणं आणि इतर गोष्टींमुळे आपल्याला स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ नसेल.(homemade turmeric face pack) पार्लरमध्ये जाण्याची देखील उसंत नसेल. पण अनेकदा आपल्या त्वचेवरील टॅनिंग पाहून लाज वाटू लागते.(turmeric for glowing skin)
ऋतू कोणताही असला तरी त्वचेवर, हाताला, पायाला टॅनिंगच्या समस्यांना सामोरे जावे लागते. ऊन, धूळ किंवा प्रदूषणामुळे त्वचेवर परिणाम होतो आणि मग त्वचा काळवंडते.(turmeric beauty tips at home) डेड स्किनचे प्रमाणही वाढते. अशावेळी पार्लरमध्ये जाऊन क्लिनअप, फेशियल करणं नेहमीच आपल्याला शक्य होत नाही. यावेळी आपण चमचाभर हळदीचा उपाय करु शकतो. हा उपाय कसा करायचा पाहूया.(how to remove tanning with turmeric)
केस प्रमाणापेक्षा जास्त गळतात? दह्यात कालवून लावा १ गोष्ट, विंचरताना कंगव्याला एकही केस चिकटणार नाही
फेसपॅक तयार करण्यासाठी हळद, कॉफी, लिंबाचा रस आणि मध लागेल. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला तव्यावर हळद पावडर भाजून घ्यावी लागेल. हळद तपकिरी होईपर्यंत भाजत राहा. यात कॉफी पावडर, लिंबाचा रस आणि मध मिसळून याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट मान, हाताचे कोपरे आणि टॅनिंग असणाऱ्या ठिकाणी लावा. १५ मिनिटानंतर त्वचा स्वच्छ करा. यामुळे त्वचेवर साचलेली घाण आणि काळपटपणा निघून जाईल.
हळदीमध्ये कर्क्यूमिन असते. जे आपल्या त्वचेला जळजळीपासून वाचवण्यास मदत करते. त्वचा स्वच्छ करुन बॅक्टेरियापासून संरक्षण करण्यास मदत करते. मुरुम आणि फोड कमी करण्यास देखील मदत करते. कॉफीमुळे रक्ताभिसरण वाढते. त्वचेवरील तेज वाढते. कॉफी नैसर्गित स्क्रब म्हणून काम करते. लिंबाचा रस त्वचेसाठी ब्लीचिंग एजंट म्हणून काम करतो. त्वचेवरील डाग, टॅनिंग आणि काळे डाग हलके करण्यास मदत करतो.