उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. या ऋतूंत येणारा घाम आणि त्या घामाची दुर्गंधी यामुळे आपल्याला नकोसे वाटते. उन्हाळयात अंगाला सतत येणाऱ्या घामाच्या धारांमुळे आपले अंग ( Homemade Herbal Bath Powder for Summer) दिवसभर घामाने डबडबलेले राहते. दिवसभर अंगाला असाच घाम येत राहिला तर हळुहळु त्या घामाची दुर्गंधी वाढू लागते. घामाची दुर्गंधी कमी करण्यासाठी आपण महागडे परफ्युम, स्प्रे, डिओ यांसारख्या सुगंधित (How to make ayurvedic bath powder at home) उपायांचा वापर करतो. यामुळे आपल्याला (Homemade Herbal Bath Powder for Summer) दिवसभर फ्रेश, ताजेतवाने वाटते तसेच घामाची दुर्गंधी देखील कमी करण्यास मदत होते. परंतु कितीही केले तरीही परफ्युम, स्प्रे, डिओ यात केमिकल्सयुक्त पदार्थांचा वापर केलेला असतो. असे केमिकल्सयुक्त घटक आपल्या त्वचेसाठी हानिकारक ठरु शकतात (How To Make Herbal Bath Powder at Home During Summer Season).
यासाठीच, अंगाला घामाची दुर्गंधी येऊ नये म्हणून केमिकल्सयुक्त परफ्युम, स्प्रे, डिओ वापरण्यापेक्षा आपण घरगुती उपाय नक्कीच ट्राय करून पाहू शकतो. या घरगुती उपायांमध्ये आपण उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा वाळा आणि इतर नैसर्गिक पदार्थांचा वापर करून औषधी बाथ पावडर तयार करू शकतो. उन्हाळ्यात अंगाला घामाची दुर्गंधी येऊ नये म्ह्णून आपण सुगंधित साबण, स्प्रे, डिओ, परफ्युम ऐवजी या बाथ पावडरचा वापर करू शकतो. ही बाथ पावडर घरच्या घरीच कशी तयार करायची ते पाहूयात.
साहित्य :-
१. गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या - १ कप
२. हिरवे मूग - १ कप
३. तांदूळ - १ कप
४. बेसन पीठ - १ कप
५. हळकुंड - ३ ते ४ काड्या
६. वाळा - मूठभर
७. कडुलिंबाची पाने - २ कप
त्वचेसाठी नागवेलीचं पान म्हणजे वरदान! त्वचेचे ३ त्रास कायमचे होतात बरे, विड्याचं पान भारीच काम!
कृती :-
१. सगळ्यांत आधी एका मोठ्या सुती कापडावर गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या, हिरवे मूग, तांदूळ, बेसन पीठ, हळकुंड, वाळा असे सगळे जिन्नस एकत्रित करून ३ ते ४ दिवस व्यवस्थित वाळवून घ्यावे.
२. त्यानंतर इतर सर्व साहित्यांप्रमाणे कडुलिंबाची पाने देखील उन्हांत ३ ते ४ दिवस व्यवस्थित वाळवून घ्यावी.
उन्हाळयात कलिंगड खा आणि त्वचेलाही लावा! मिसळा फक्त 'हे' ६ पदार्थ - करा त्वचेचे लाड!
३. आता एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात संपूर्णपणे वाळवून घेतलेले सर्व जिन्नस आणि कडुलिंबाची पाने एकत्रित करून मिक्सरमध्ये वाटून घ्यावी.
४. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी ही खास पावडर तयार आहे. आपण साबणाऐवजी उन्हाळ्यात या पावडरचा वापर करु शकतो.