Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > रोज गळून केसांचं चपटं शेपूट झालं? तेलात १ पदार्थ घालून हेअर टॉनिक लावा, केस सहज दाट होतील

रोज गळून केसांचं चपटं शेपूट झालं? तेलात १ पदार्थ घालून हेअर टॉनिक लावा, केस सहज दाट होतील

Try These Homemade Hair Tonic To Stop Hair Fall : केसांची स्थिती सुधारण्यासाठी महगडे तेल किंवा शॅम्पू विकत घेण्याची काहीच गरज नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 15:11 IST2025-10-28T14:54:15+5:302025-10-28T15:11:38+5:30

Try These Homemade Hair Tonic To Stop Hair Fall : केसांची स्थिती सुधारण्यासाठी महगडे तेल किंवा शॅम्पू विकत घेण्याची काहीच गरज नाही.

Try These Homemade Hair Tonic To Stop Hair Fall : Hair Care Tips Homemade Hair Tonic For Hair Growth | रोज गळून केसांचं चपटं शेपूट झालं? तेलात १ पदार्थ घालून हेअर टॉनिक लावा, केस सहज दाट होतील

रोज गळून केसांचं चपटं शेपूट झालं? तेलात १ पदार्थ घालून हेअर टॉनिक लावा, केस सहज दाट होतील

आजच्या व्यस्त जीवनशैलीत, प्रदूषण, असंतुलित खाण्यापिण्याच्या सवयींमुळे केस गळण्याचं प्रमाण खूपच वाढलं आहे.  प्रत्येक वयोगटातील लोकांना केसांच्या समस्येचा सामना करावा लागतो. गरजेपेक्षा जास्त केस गळणं शरीरात पोषणाची कमतरता असल्याचं लक्षण आहे. म्हणून केसांची वेळीच देखभाल करायला हवी. अन्यथा वाढत्या वयात केसांना टक्कल पडू लागतं. (Homemade Hair Tonic For Hair Growth)

केसांची स्थिती सुधारण्यासाठी महगडे तेल किंवा शॅम्पू विकत घेण्याची काहीच गरज नाही. तुलनेने घरगुती उपाय जास्त परीणामकारक ठरतात. बाहेर बरेच हर्बल उत्पादनं आली आहे. या उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा घरीच सोप्या पद्धतीनं केसांसाठी उत्पादन तयार केलं तर तुमची समस्या कमी होईल. (Try These Homemade Hair Tonic To Stop Hair Fall)

केसांना मजबूत करणारे हे ड्रिंक तयार करण्यासाठी सगळ्यात आधी एक खास पावडर तयार करा. त्यासाठी कढीपत्ता आणि ऑलिव्ह ऑईलची आवश्यकता असते. सगळ्यात आधी कढीपत्ता धुवून स्वच्छ करा.नंतर ऑलिव्ह ऑईलमध्ये घालून व्यवस्थित शिजवून घ्या. त्यानंतर ही पानं थंड करून मिक्सरमध्ये बारीक करून एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करा. 

प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. वंदना तिवारी सांगतात की कढीपत्ता थंड झाल्यानंतर मिक्सरमधून वाटून घ्या. ज्यामुळे एक हिरवी पावडर तयार होईल. ही पावडर रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यात मिसळून लावल्यानं केस मजबूत होतील आणि केसांचं तुटणं हळूहळू कमी होईल.

श्रेयस अय्यरला दुखापत झाली त्या अवयवाचं काम काय असतं? स्प्लीन कुठे असतो...

जर तुमच्याकडे पावडर तयार करायला वेळ नसेल तर कडीपत्त्याची ६ ते १० ताजी पानं चावून घ्या.  ज्यामुळे केस निरोगी, दाट दिसतील. कढीपत्त्यात व्हिटामीन ए, बी, सी, ई  यांसोबतच आयर्न, कॅल्शियम, एंटी ऑक्सिडेंट्स असतात. ही तत्व केसांना मुळापासून पोषण देतात.  ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते आणि नवीन केस उगवण्यासही मदत होते. वेळेआधी केस पांढरे होण्याची  समस्याही उद्भवत नाही.

ऑलिव्ह ऑईलमध्ये व्हिटामीन ई,  आणि हेल्दी फॅट्स असतात. जे स्काल्पला पोषण देतात. तसंच केस मुलायम ठेवण्यासही मदत करतात. याव्यतिरिक्त केसांना आतून पोषण मिळण्यासही मदत होते. कढीपत्त्यापासून तयार झालेलं हे नॅच्युरल ड्रिंक केसांच्या मुळांना पोषण देऊन त्यांना मजबूत बनवते. नियमित हा उपाय केल्यास काही दिवसांतच चांगला परिणाम दिसून येईल. तसंच केसांची नैसर्गिक चमक परत येईल. त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरेल.

Web Title : घने बालों के लिए करी पत्ता और तेल का हेयर टॉनिक।

Web Summary : बाल झड़ने से परेशान हैं? करी पत्ता और जैतून के तेल से बने इस घरेलू हेयर टॉनिक को आजमाएं। विटामिन और एंटीऑक्सीडेंट से भरपूर, यह बालों की जड़ों को मजबूत करता है, विकास को बढ़ावा देता है और स्वस्थ, घने बालों के लिए समय से पहले सफ़ेद होने से रोकता है।

Web Title : Curry leaves and oil hair tonic for thick hair growth.

Web Summary : Suffering from hair fall? Try this homemade hair tonic with curry leaves and olive oil. Rich in vitamins and antioxidants, it strengthens hair roots, promotes growth, and prevents premature graying for healthy, thick hair.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.