Lokmat Sakhi >Beauty > बाकी सगळं विसरा, हिवाळ्यात केसांना लावा दही-खोबरेल तेल; ‘हा’ पॅक करतो झाडूसारखे केस मऊ

बाकी सगळं विसरा, हिवाळ्यात केसांना लावा दही-खोबरेल तेल; ‘हा’ पॅक करतो झाडूसारखे केस मऊ

Try These Curd & Coconut Oil Home Remedies For Hair This Winter : Curd & Coconut Oil For Dry Hair During Winters : coconut oil & curd hair masks to cure hair fall, dryness and dandruff during winters : थंडीच्या दिवसांत केस कोरडे होऊन झाडूसारखेच दिसू लागतात, यासाठी एक घरगुती हेअर मास्क नक्की ट्राय करा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2024 06:45 PM2024-11-30T18:45:09+5:302024-12-02T16:29:29+5:30

Try These Curd & Coconut Oil Home Remedies For Hair This Winter : Curd & Coconut Oil For Dry Hair During Winters : coconut oil & curd hair masks to cure hair fall, dryness and dandruff during winters : थंडीच्या दिवसांत केस कोरडे होऊन झाडूसारखेच दिसू लागतात, यासाठी एक घरगुती हेअर मास्क नक्की ट्राय करा...

Try These Curd & Coconut Oil Home Remedies For Hair This Winter Curd & Coconut Oil For Dry Hair During Winters coconut oil & curd hair masks to cure hair fall, dryness and dandruff during winters | बाकी सगळं विसरा, हिवाळ्यात केसांना लावा दही-खोबरेल तेल; ‘हा’ पॅक करतो झाडूसारखे केस मऊ

बाकी सगळं विसरा, हिवाळ्यात केसांना लावा दही-खोबरेल तेल; ‘हा’ पॅक करतो झाडूसारखे केस मऊ

इतर ऋतूंपेक्षा हिवाळ्यात केसांची अधिक विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात अनेकदा आपली स्काल्प आणि केस दोन्ही कोरडे पडू शकतात. वातावरणातील गारठ्याने स्काल्प आणि केसांना कोरडेपणा आल्यांस केसांसंबंधित अनेक लहान - मोठ्या समस्या सुरु होतात. स्काल्पला कोरडेपणा येऊन केसांत कोंडा होतो, केसांची मूळ कमकुवत होतात. केस रुक्ष - निस्तेज होतात, केसगळती आणि केसांना एक प्रकारचा फ्रिजीनेस येतो. शक्यतो हिवाळ्यात आपण पाहिले असेल की आपल्या केसांची खालची टोकं खूपच कोरडी , रुक्ष होऊ लागतात. अशा कोरडेपणामुळे केसांना फाटे फुटतात, फाटे फुटल्यामुळे केस दुभंगतात आणि तुटू लागतात. एवढंच नव्हे तर केस खालच्या बाजूने अगदी झाडू प्रमाणेच दिसतात. असे होऊ नये यासाठी आपण अनेक उपाय करतो(Try These Curd & Coconut Oil Home Remedies For Hair This Winter).

केसांचा फ्रिजीनेस घालवण्यासाठी आपण लगेच पार्लरला जाऊन अनेक महागड्या (Curd & Coconut Oil For Dry Hair During Winters) ट्रिटमेंट्स करुन घेतो. परंतु या कृत्रिम उपायांचा परिणाम थोडेच दिवस टिकतो, त्यानंतर केस जैसे थे, असेच होतात. यासाठीच फारसे महागडे किंवा अगदीच हायफाय उपाय न करता सरळ घरातील खोबरेल तेल आणि दही फक्त या दोनच गोष्टींचा वापर करून आपण हिवाळ्यात केसांना येणारा कोरडेपणा अगदी सहजपणे कमी करु शकतो. केसांचा कोरडेपणा घालवण्यासाठी खोबरेल तेल आणि दह्याचा वापर कसा करावा ते पाहूयात(coconut oil & curd hair masks to cure hair fall, dryness and dandruff during winters).

केसांचा फ्रिजीनेस करा नैसर्गिकरीत्या दूर... 

खोबरेल तेल आणि दह्याचा वापर करुन आपण फ्रिजी केसांसाठी एक घरगुती हेअरमास्क तयार करु शकतो. हिवाळ्यात कोरडे, रुक्ष, निस्तेज झालेले केस आणि केसांशी संबंधित इतर समस्यांवर खोबरेल तेल आणि दही वापरणे अधिक फायदेशीर ठरते. हा हेअरमास्क तयार करण्यासाठी दोन टेबलस्पून दही आणि तीन टेबलस्पून दही इतक्या दोनच गोष्टींची गरज लागणार आहे.

त्वचेवरील ॲक्ने कमी करण्यासाठी मलायका अरोरा वापरते हा खास 'देसी उपाय',आता पार्लरला जायची गरजच नाही...

हा हेअरमास्क तयार करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात दही आणि खोबरेल तेल एकत्रित घेऊन ते मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. आता हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून ब्रशच्या मदतीने केसांवर लावून घ्यावे. अर्ध्या तासासाठी हा हेअरमास्क असाच केसांवर लावून ठेवावा. त्यानंतर केस स्वच्छ धुवावेत. हा उपाय आठवड्यातून किमान दोनवेळा करावा. यामुळे केसांचा कोरडेपणा नैसर्गिकरीत्या कमी होऊन केस मऊ, मुलायम, सिल्की होतात.

दही आणि खोबरेल तेलाचा हेअरमास्क वापरण्याचे फायदे... 

१. दही :- केसांसाठी दही वापरल्याने केसांमधील कोरडेपणा कमी होऊन केसांतील कोंडा जाण्यास अधिक मदत होते. केस मजबूत करण्यासोबतच केसांची वाढ होण्यासाठी, नवीन केस उगवण्यासाठी दह्याचा उपयोग होतो. दह्यामुळे केसांचं खोलवर माॅश्चरायझिंग होतं. दह्यामुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि केस वाढतातही.

ब्यूटी एक्स्पर्ट शहनाज हुसेन सांगतात, त्वचेसाठी फेसपॅकपासून-स्क्रबरपर्यंत तुळशीच्या पानांचा 'या' पद्धतीने करा वापर!

२. खोबरेल तेल :- खोबरेल तेल पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करून केसांना निरोगी बनवण्यास मदत करते. त्यामुळे केस वेगाने वाढू लागतात. खोबरेल तेल लावून केसांचे नुकसान मुळापासून दूर करू शकता. खोबरेल तेल वापरणे हा देखील केसांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. खोबरेल तेल टाळूला मॉइश्चरायझ करून केसांचे तेल संतुलन लॉक करण्याचे काम करते. त्यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होऊ लागतो आणि केसांना नैसर्गिक चमक येते.

Web Title: Try These Curd & Coconut Oil Home Remedies For Hair This Winter Curd & Coconut Oil For Dry Hair During Winters coconut oil & curd hair masks to cure hair fall, dryness and dandruff during winters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.