केस गळण्याचं मुख्य (Hair Fall) कारण हॉर्मोनल असंतुलन आणि पोषणासंबंधित समस्या आहे. अत्याधिक स्टायलिंग टुल्स आणि केमिकल्स प्रोडक्ट्सच्या वापरामुळे केस गळण्याची समस्या उद्भवते. साईड इफेक्ट्स किंवा काही इंटरनल हेल्थ इश्यूजमुळेही अशी समस्या उद्भवते. केस मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. ज्यामुळे 1 महिन्यात केस लांबसडक दाट होतील आणि हेअर फॉलवर नियंत्रण मिळेल. (How To Grow Hairs Faster In a Month Hair Care Tips)
नारळाचं तेल आणि आवळा तेल
ही दोन्ही तेलं तुमच्या केसांना भरपूर फायदा देतात. कारण केसांना आतून पोषण मिळते. केस तुटत नाहीत. केस मुळापासून मजबूत राहतात. ही दोन्ही तेलं एकत्र करून हेअर वॉश करण्याआधी हलक्या हातानं मसाज करा नंतर 2 ते 3 तासांनी शॅम्पूनं केस धुवा. आठवड्यातून 2 दिवस हा उपाय केल्यास काही दिवसांतच फरक दिसून येईल.
साखर की गूळ, तब्येतीसाठी काय फायद्याचं? शुगर-वजन वाढू नये म्हणून काय खावं काय टाळावं
बायोटीन बी-7
व्हिटामीन्स तुमच्या केसांसाठी भरपूर गरजेचे असतात. ज्यामुळे केस कमजोर होऊ लागतात. तुम्ही हवंतर बायोटीन सप्लिमेंट्स घेऊ शकतात किंवा बायोटीननं परीपूर्ण असे सुके मेवे, पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.
केस ट्रिम करत राहा
केसांच्या चांगल्या वाढीसाठी नियमित स्पिल्ट एंड्स काढत राहायला हवेत. यामुळे केसांची वाढ चांगली होईल. जर 6 ते 8 आठवड्यांनी केस ट्रिम करत राहा.
राजेशाही तोड्यांचे १० आकर्षक पॅटर्न; लग्नसराईत अभिमानानं मिरवावा असा पारंपरिक दागिना
कांद्याचा रस
केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी कांद्याचा रस केसांना लावा. कारण यामुळे हेअर ग्रोथ चांगली होते. केस मजबूत होतात. कांद्याचा रस केसांना लावून 30 मिनिटं तसंच ठेवा नंतर वॉश करा.
संतुलित आहार
संतुलित आहारानं केसांना भरपूर पोषण मिळते. तुम्ही व्हिटामीन ए, सी, ई, आणि आयर्नयुक्त आहाराचा समावेश करायला हवा. यासाठी डाळी, हिरव्या भाज्या, फळं अन्य हेल्दी फूड्सचे सेवन करा.