Join us

१५ मिनिटांत फेशियलसारखा ग्लो हवा? फक्त १ टोमॅटोने ‘अशी’ करा चेहऱ्यावर चमकदार जादू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2024 18:32 IST

Tomato Facial For Radiant Glowing Skin: चेहरा काळवंडून गेला असेल तर टोमॅटो आणि स्वयंपाक घरातले काही पदार्थ घेऊन हा एक सोपा उपाय करून पाहा...(how to do tomato facial at home?)

ठळक मुद्दे५ ते ७ मिनिटांनी लेप सुकला की चेहरा धुवून टाका. बघा तुमच्या चेहऱ्यावर अगदी जादू झाल्याप्रमाणे सुंदर चमक आलेली असेल. 

आता थंडीचे दिवस सुरू झाले आहेेत. थंडीचा परिणाम सगळ्यात आधी आपल्या त्वचेवर दिसून येते. त्वचा कोरडी पडायला सुरुवात होते आणि अशी कोरडी पडलेली त्वचा खूपच लवकर टॅन होते. त्यामुळे हिवाळ्यात टॅनिंगची समस्या जरा जास्तच वाढते. म्हणूनच हा एक सोपा उपाय आताच पाहून घ्या. कारण हिवाळ्यात काळवंडलेली त्वचा पुन्हा पहिल्यासारखी चमकदार करण्यासाठी हा उपाय तुमच्या खूपच उपयोगी येणारा आहे (how to do tomato facial at home?). फक्त १ टोमॅटो घेऊन त्याच्या मदतीने त्वचेवर कशी जादू करता येते ते पाहूया..(Tomato Facial For Radiant Glowing Skin)

 

घरच्याघरी टोमॅटो फेशियल करण्याची पद्धत

टोमॅटो फेशियल कसं करायचं, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ dr.vivek_joshi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

Winter Fashion: लांब बाह्यांच्या ब्लाऊजचे ८ स्टायलिश प्रकार, यातलं एखादं तरी तुमच्याकडे असायलाच हवं

पहिली स्टेप

टाेमॅटो फेशियलची सुरुवात आपण त्वचा स्वच्छ करून करणार आहोत.  यासाठी एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेऊन किसा. टोमॅटोचा १ चमचा पल्प एका वाटीत घ्या आणि त्यामध्येे २ चमचे कच्चं दूध टाका. हे मिश्रण व्यवस्थित हलवा आणि ते चेहऱ्याला लावून हलक्या हाताने मसाज करा.

 

दुसरी स्टेप

वरील पद्धतीने त्वचा स्वच्छ केल्यानंतर आता डेड स्किन काढून टाकण्यासाठ स्क्रबिंग करणं गरजेचं आहे.

केस फार गळतात- कोंडा खूप झाला? जावेद हबीब सांगतात ४ उपाय, कोंडा जाऊन केस होतील हेल्दी- सुंदर

यासाठी टोमॅटोची एक फोड घेऊन तिच्यावर थोडी कॉफी पावडर टाका. आता ही फोड थेट चेहऱ्यावर लावून ५ मिनिटांसाठी त्वचेला छान मसाज करा. यामुळे डेडस्किन जाऊन त्वचा छान मऊ होईल.

 

तिसरी स्टेप

आता त्वचेला आपण टोमॅटोचा फेसपॅक कसा लावायचा ते पाहूया.. यासाठी टोमॅटोचा २ चमचे पल्प एका वाटीत घ्या. त्यामध्येच १ चमचा मुलतानी माती आणि १ टीस्पून हळद टाका.

आवळ्याच्या चटपटीत पदार्थांची खास यादी! कोणताही पदार्थ खा आणि केस, त्वचा, आरोग्य उत्तम ठेवा..

त्यासोबतच अर्धा टीस्पून खोबरेल तेल किंवा बदाम तेल टाका. हे सगळे पदार्थ व्यवस्थित एकत्र करा आणि त्याचा लेप चेहऱ्याला लावा. ५ ते ७ मिनिटांनी लेप सुकला की चेहरा धुवून टाका. बघा तुमच्या चेहऱ्यावर अगदी जादू झाल्याप्रमाणे सुंदर चमक आलेली असेल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीटोमॅटो