राखीपौर्णिमेच्या दिवशी आपल्या भावाला ओवाळताना, त्याला राखी बांधताना आपण छान दिसायला हवं असं प्रत्येकीला वाटतंच.. पण त्यासाठी स्वत:ला वेळ देणं अनेकींना शक्य होत नाही. रोजची कामं तर असतातच. पण राखीपौर्णिमेसाठीची थोडी वेगळी कामं, वेगळी तयारीही असतेच. या धावपळीमध्ये पार्लरमध्ये १- २ तासांसाठी जाऊन बसायला अनेकींना सवडच मिळत नाही. म्हणूनच हा एक सोपा घरगुती उपाय पाहा आणि अगदी काही मिनिटांत आणि विशेष म्हणते खूपच कमी पैशात स्वत:चं सौंदर्य खुलवा (simple home hacks for radiant glowing skin). हा उपाय करण्यासाठी आपल्याला टोमॅटो (tomato facial for instant glow) आणि स्वयंपाक घरातले इतर काही पदार्थ लागणार आहेत.(how to do tomato facial at home?)
घरच्याघरी टोमॅटो फेशियल कसं करायचं?
हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एक टोमॅटो घ्या. तो मधोमध कापा आणि त्याच्यावर थोडा मध घाला. आता मध टाकलेली टोमॅटोची फोड तुमच्या चेहऱ्यावर १ ते २ मिनिटांसाठी चोळा. यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. मधामुळे त्वचा छान हायड्रेटेड होण्यास मदत होईल.
पौष्टिक म्हणून ब्रोकोली खाणंही देतं आजारपणाला आमंत्रण, पाहा कुणी ब्रोकोली अजिबात खाऊ नये
आता पातेल्यात गरम पाणी करून किंवा मग घरात जर वाफ घेण्याचं मशिन असेल तर ते वापरून वाफ घ्या. यानंतर मध घातलेल्या टाेमॅटोच्या फोडीवरच १ टीस्पून पिठी साखर आणि १ टीस्पून कॉफी पावडर घाला. ही फोड तुमच्या चेहऱ्यावर गोलाकार फिरवून मालिश करा. साखर आणि काॅफी याचं मिश्रण त्वचेसाठी नॅचरल स्क्रबर म्हणून काम करेल. शिवाय टोमॅटोच्या रसामुळे टॅनिंग कमी होईल.
यानंतर सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे त्वचेवर फेस मास्क लावणे. यासाठी उरलेला जो अर्धा टोमॅटो आहे त्याची मिक्सरमधून प्युरी करून घ्या किंवा मग तो किसून घ्या. आता त्यामध्ये १ चमचा बेसन, १ चमचा तांदळाचे पीठ आणि १ चमचा ॲलोव्हेरा जेल घाला.
मळकट पांढरे सॉक्स, शर्टची कॉलर धुण्याची भन्नाट ट्रिक, ब्रशने घासत बसण्याची गरजच नाही- घ्या उपाय
सगळे पदार्थ व्यवस्थित कालवून घ्या आणि हा लेप चेहऱ्याला लावा. ५ ते ६ मिनिटांनी लेप सुकत आल्यानंतर हळूवार हाताने चोळून तो काढून टाका. चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर मॉईश्चराईज करा. चेहरा छान चमकदार झालेला दिसेल.