डोळे हा अवयव बोलका असतो असे मानले जाते. कारण एखाद्याची डोळ्यात आनंद, चिंता, दु:ख या भावना स्पष्टपणे दिसून येतात. त्यामुळे डोळ्यांना बोलके म्हटले जाते. डोळे सुंदर दिसावेत म्हणून विविध प्रकारचा मेकअप केला जातो, मात्र जर डोळ्यांवर थकवा असेल तर काहीही केलं तरी डोळे छान वाटत नाहीत. (Tired and puffy eyes are a sign of stress - 4 easy ways to make your eyes look beautiful)अनेक कारणांमुळे डोळे थकलेले जाणवतात. ताण, अपुरी झोप, जास्त वेळ स्क्रीनकडे पाहणे किंवा अपुरी काळजी यामुळे डोळे मलूल आणि थकलेले दिसतात. डोळ्यांचा थकवा कमी करून त्यांना सुंदर आणि आकर्षक करण्यासाठी काही सोपे उपाय करता येतात.
१. सर्वप्रथम डोळ्यांना पुरेशी विश्रांती देणे आवश्यक आहे. पुरेशी झोप घेतली नाही तर डोळ्यांखाली काळी वर्तुळे आणि थकवा स्पष्ट दिसतो. त्यासाठी रात्री किमान सात ते आठ तासांची झोप गरजेची ठरते. डोळ्यांना थंडावा देण्यासाठी गुलाबपाणी, काकडीचे तुकडे किंवा थंड दुधात बुडवलेले कापसाचे बोळे ठेवले तर थकवा आणि सूज कमी होण्यास मदत होते.
२. काजळ हा केवळ शोभेचा भाग नसून डोळ्यांसाठी फायदेशीर असलेली गोष्ट आहे. स्वच्छ आणि नैसर्गिक काजळ डोळ्यांना थंडावा देतो तसेच डोळ्यांतील घाण बाहेर काढण्यास मदत करतो. नियमितपणे काजळ लावल्याने डोळ्यांची चमक वाढते आणि ते स्वच्छ राहतात. मात्र बाजारातील रसायनयुक्त काजळ वापरण्यापेक्षा घरी बनवलेले नैसर्गिक काजळ वापरल्यास डोळ्यांचे आरोग्य अधिक चांगले राहते.
३. डोळ्यांवर ताण येऊ नये म्हणून दिवसातून काही वेळ डोळ्यांचे व्यायाम करणे उपयोगी ठरते. डोळे फिरवणे, पापण्या मिटून हलके दाब देणे किंवा काही सेकंद दूरच्या हिरवळीकडे लक्ष केंद्रित करणे हे व्यायाम डोळ्यांना विश्रांती देतात.
४. पाणी पुरेशा प्रमाणात प्यायल्याने डोळ्यांचा कोरडेपणा कमी होतो आणि डोळे अधिक ताजेतवाने दिसतात. संगणक किंवा मोबाइलवर काम करताना दर काही वेळाने डोळ्यांना विश्रांती देणेही गरजेचे आहे.
५. सुंदर डोळ्यांसाठी आणि स्पष्ट दिसण्यासाठी फक्त बाहेरून काळजी घेणे पुरेसे नाही, तर शरीराला आवश्यक पोषण मिळाले पाहिजे. जीवनसत्त्व 'ए' आणि 'ई' युक्त आहार डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे. गाजर, पालक, बदाम, आणि हिरव्या भाज्या खाल्ल्यास डोळ्यांचे तेज वाढते. त्यामुळे हे काही उपाय नियमित केल्याने फायदा नक्की जाणवेल.