हिवाळा आपल्या त्वचेसाठी अनेक समस्या घेऊन येतो. अनेकांना या काळात जाणवते की त्यांच्या त्वचेचा नैसर्गिक रंग, पोत बदलला आहे, त्वचा काळवंडली आहे, किंवा ती निस्तेज आणि कोरडी दिसू लागली आहे. थंडीच्या दिवसांत त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होते आणि त्वचेची काळजी घेण्याच्या पद्धतीतील बदलांमुळे ही समस्या अधिक तीव्र होते. हिवाळ्यात वातावरणातील वाढलेली थंडी, कोरडी हवा आणि सूर्यप्रकाशाचा अभाव याचा थेट परिणाम त्वचेवर होतो. या ऋतूमध्ये त्वचेतील ओलावा कमी झाल्याने त्वचा कोरडी, निस्तेज दिसू लागते आणि हळूहळू तिचा नैसर्गिक रंग काळवंडल्यासारखा दिसू लागतो. अनेकदा त्वचेचा पोत बदलतो, त्वचा राठ होते आणि त्वचेचे सौंदर्य व नैसर्गिक पोत बिघडतो. हिवाळयात हातापायांची त्वचा अधिक जास्त कळवंडते, अशावेळी त्वचेचा हरवलेला रंग आणि नैसर्गिक तेज पुन्हा मिळवण्यासाठी घरगुती उपाय फारच असरदार ठरतात(tips & tricks home remedy to remove darkness hands & feet).
घरच्याघरी सहज उपलब्ध असलेल्या नैसर्गिक पदार्थांचा योग्य वापर केल्यास त्वचेचा रंग आणि पोत सुधारता येतो. हिवाळयात खास त्वचेसाठी केलेला घरगुती उपाय केवळ त्वचेचे आरोग्य सुधारत नाहीत, तर काळवंडलेपणा दूर करून त्वचेला उजळ आणि चमकदार करण्यासाठी मदत करतात. हिवाळ्यात त्वचा काळवंडण्यामागची कारणे समजून घेऊन, त्वचेचा रंग आणि पोत (home remedy to remove dark hands and feet) सुधारण्यासाठी घरगुती उपाय नेमका काय आहे ते पाहूयात...
१. हिवाळ्यात हात - पाय जास्त काळे का दिसतात ?
हिवाळ्यात थंड आणि कोरड्या हवामानामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. त्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि त्वचेवर डेड स्किन सेल्स साचू लागतात आणि त्वचा जाड व काळवंडलेली दिसू लागते. याच कारणामुळे चेहऱ्याच्या तुलनेत हात - पायांची त्वचा अधिक काळी पडते. जर तुम्ही जास्त वेळ उन्हात राहत असाल, तर त्वचेवर हायपरपिग्मेंटेशन वाढू शकते. त्यामुळे केवळ मॉइश्चरायझर लावणं पुरेसं नसून त्वचेची योग्य निगा राखणं अत्यंत आवश्यक असते. जेणेकरून त्वचेचा नैसर्गिक रंग परत मिळू शकेल.
२. फक्त लोशन लावून फायदा होतो का ?
अनेकांना असं वाटतं की दिवसातून दोन - तीन वेळा लोशन लावल्याने त्वचा सुधारेल. पण लोशन फक्त वरवर ओलावा देतं. त्वचेवर साचलेली डेड स्किन न काढल्यास त्वचेचा रंग स्वच्छ आणि उजळ दिसत नाही. म्हणूनच त्वचा फक्त घासून नव्हे, तर योग्य पद्धतीने एक्सफोलिएट करणं गरजेचं असतं.
शिळ्या भातानं चमकेल त्वचा, ५ प्रकारे लावा भाताचा पॅक-काचेसारखी कोरियन त्वचा मिळण्याचा सोपा उपाय...
३. त्वचा उजळवण्यासाठी सोपा घरगुती उपाय...
आयुर्वेदतज्ज्ञांच्या मते हात - पायांचा काळेपणा कमी करण्यासाठी घरच्या घरी काही सोपे उपाय करता येतात. योग्य एक्सफोलिएशन, नैसर्गिक पदार्थांचा वापर आणि नियमित मॉइश्चरायझिंग केल्यास हिवाळ्यातही त्वचा मऊ, स्वच्छ आणि उजळ राहू शकते.
आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. प्रियंका यांच्या मते, हात - पायांवर येणारा काळेपणा दूर करण्यासाठी घरात सहज उपलब्ध असलेल्या फक्त दोन गोष्टी पुरेशा आहेत – लिंबू आणि साखर. लिंबू फक्त त्वचेवरील डागच कमी करत नाही, तर त्वचेला आतून उजळपणा देण्याचं कामही करतं. तर साखर त्वचेवर साचलेल्या डेड स्किन सेल्स काढून टाकण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा स्वच्छ, मऊ आणि नैसर्गिकरित्या उजळ दिसू लागते.
लिंबू साखरेचा उपाय फायदेशीर...
एक लिंबू मधोमध कापून घ्या. त्यावर जाड साखर घाला. आता हे लिंबू हलक्या हाताने हात आणि पायांच्या काळवंडलेल्या भागांवर चोळा. सुमारे ३ ते ४ मिनिटे स्क्रब करा. त्यानंतर हे मिश्रण १० मिनिटे तसेच त्वचेवर राहू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि हलकं मॉइश्चरायझर लावा. पहिल्याच वापरात त्वचा अधिक स्वच्छ आणि उजळ दिसू लागते. डॉ. प्रियंका यांच्या मते, हा उपाय बहुतेकदा पहिल्याच वेळेस परिणाम दाखवतो. मात्र, जर त्वचेवर जुने डाग असतील किंवा जास्त काळेपणा असेल, तर हा उपाय आठवड्यातून ३ ते ४ वेळा करता येतो.
Web Summary : Winter darkness on hands and feet? Cold weather causes dryness, hyperpigmentation. Exfoliate with lemon and sugar to remove dead skin cells, revealing brighter skin. Moisturize regularly for best results.
Web Summary : सर्दियों में हाथ-पैर काले पड़ गए हैं? ठंड से रूखापन बढ़ता है। नींबू और चीनी से डेड स्किन हटाएं, त्वचा निखरेगी। नियमित रूप से मॉइस्चराइज़ करें।