हिवाळा ऋतू आला की, आरोग्यासोबतच त्वचेची देखील तितकीच विशेष काळजी घ्यावी लागते. थंडीच्या दिवसांत शक्यतो, त्वचेचा ओलावा कमी होतो, ती कोरडी, निस्तेज आणि फाटलेली दिसू लागते, इतकंच नाही तर त्वचेवर सुरकुत्या देखील पडतात. अशावेळी बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींसारखी चमकदार आणि नितळ त्वचा हवी असेल, तर त्यांचे ब्यूटी सिक्रेट नेमके काय आहे ते पाहायला हवेच...मलायका अरोरा, अनुष्का शर्मा, करीना कपूर आणि इतर सेलिब्रिटी हिवाळ्यात आपल्या स्किनला हायड्रेटेड आणि ग्लोइंग ठेवण्यासाठी खास नैसर्गिक फेसमास्क वापरतात. ऐन कडाक्याच्या थंडीतही त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी या अभिनेत्री महागड्या ब्यूटी प्रॉडक्ट्स ऐवजी पारंपरिक आणि घरगुती उपायांवर अधिक विश्वास ठेवतात(Tips & Tricks Glowing Skin Tips Malaika Arora Anushka Sharma Reveal Benefits Of Winter Face Pack).
बॉलीवूड अभिनेत्रींचे हे विंटर स्किन केअर रुटीन मधील खास फेसमास्क त्वचेला आतून पोषण देऊन तिचा ग्लो वाढवतात आणि कोरडेपणापासून संरक्षण करतात. मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांसारख्या बॉलिवूड अभिनेत्री थंडीतही त्वचा चमकदार आणि टवटवीत ठेवण्यासाठी खास कोणते (homemade winter face masks) घरगुती फेसमास्क वापरतात ते पाहूयात...
बॉलिवूड अभिनेत्रींचे विंटर स्किनकेअर रुटीन...
१. केळं, संत्र, दही :- थंडीच्या दिवसात त्वचेचा कोरडेपणा आणि खाज कमी करण्यासाठी हा फेसमास्क फायदेशीर ठरतो. एका वाटीत दही घ्या आणि त्यात मॅश केलेलं केळं तसेच संत्र्याचा रस मिसळून घ्या. हा फेसपॅक चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे लावून ठेवल्यानंतर धुवून घ्या. यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येईल.
लग्न जवळ आलं पण चेहऱ्यावर ग्लो नाही? ‘हा’ फेसपॅक लावा, काही मिनिटांत चेहरा चमकेल सोन्यासारखा..
२. केळं आणि हळद :- जर त्वचेवर मोठे ओपन पोर्स दिसत असतील, तर हे पोर्स टाईट करण्यासाठी थंड पाण्याने फेसपॅक धुवून काढावा. याव्यतिरिक्त, केळं आणि हळद यांचा उपाय करता येईल. चेहऱ्यावर केळं आणि हळदीचा फेसपॅक देखील लावला जाऊ शकतो. हा फेस पॅक बनवण्यासाठी एका केळ्यामध्ये एक छोटा चमचा हळद मिसळा. त्याच मिश्रणात एक चमचा दही मिसळून घ्यावे, हा पॅक चेहऱ्यावर १५ मिनिटे लावून ठेवल्यानंतर धुवून टाकावा. अँटीबॅक्टेरियल गुणांनी समृद्ध असलेली हळद त्वचेवरील पिंपल्स आणि डाग यांचे प्रमाण कमी होते आणि त्वचेला मुलायम व हायड्रेटेड ठेवते.
२. केळं, दूध, मध :- एका केळ्यामध्ये कच्चे दूध, मध आणि गुलाबपाण्याचे काही थेंब मिसळून घ्या. हे मिश्रण चेहऱ्यावर १५ मिनिटे लावून ठेवा आणि नंतर धुवून घ्या. यामुळे त्वचा खूप मुलायम आणि मऊ राहील.
मलायका अरोरा, अनुष्का शर्मा, करीना कपूर यांसारख्या बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या विंटर स्किन केअर रुटीनमध्ये या खास फेसपॅकच समावेश करतात. अनेक मुलाखतींमध्ये मलायका अरोरा आणि अनुष्का शर्मा यांनीही सांगितले आहे की, विशेषतः थंडीच्या सिझनमध्ये त्या अशा प्रकारच्या पॅकचा नियमित वापर करतात. हे तिन्ही पॅक थंडीमुळे त्वचेला येणारा कोरडेपणा, पुरळ/लाल चट्टे यापासून संरक्षण करतात. तसेच, त्वचेचे पोर्स टाईट करतो आणि त्वचेला मॉइश्चराइझ करतो, ज्यामुळे हायड्रेशन टिकून राहते आणि त्वचा खूप चमकदार दिसते. विशेष म्हणजे हे उपाय घरगुती असल्याने कोणताही दुष्परिणाम होण्याची भीती नसते.
