Join us

आयुर्वेदिक पद्धतीने करा स्किन डिटॉक्स! त्वचेच्या समस्या होतील दूर - फरक दिसेल काही दिवसांत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2025 19:30 IST

Tips For Ayurvedic Skin Detox : According To Ayurveda How To Do A Full Skin Detox : Detox Your Skin Ayurvedic Cleansing Techniques : Ayurvedic Detoxification: Purify Your Body Naturally with Traditional Methods : पार्लर कशाला ? घरच्याघरीच करा आयुर्वेदिक पद्धतीने स्किन डिटॉक्स, त्वचा दिसेल तजेलदार...

बाहेरील वातावरण, धूळ, प्रदूषण यांचा थोडाफार परिणाम आपल्या त्वचेवरही होतो. या सगळ्यामुळे आपली त्वचा खराब तर होतेच, शिवाय त्वचेचा पोत बिघडतो आणि त्वचेशी (Tips For Ayurvedic Skin Detox) संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. जसे आपण आपले शरीर आणि आरोग्याची योग्य ती काळजी घेतो, तसेच त्वचेची काळजी घेणे देखील तितकेच (Detox Your Skin Ayurvedic Cleansing Techniques) गरजेचे असते. शरीराचीच (Ayurvedic Detoxification) काळजी घेण्यासाठी जसे बॉडी डिटॉक्स (Purify Your Body Naturally with Traditional Methods) केले जाते, तसेच त्वचेचे आरोग्य आणि सौंदय टिकवून ठेवण्यासाठी आयुर्वेदानुसार त्वचा वेळच्यावेळी डिटॉक्स करणे गरजेचे असते. 

रामहंस चॅरिटेबल हॉस्पिटलचे आयुर्वेदिक डॉक्टर श्रेय शर्मा यांनी onlymyhealth ला दिलेल्या मुलाखतीनुसार, त्वचेला डिटॉक्सिफाय करण्याचे अनेक मार्ग आहेत. जे केवळ त्वचेचे सौंदर्यच वाढवत नाहीत तर शरीराला देखील आतून शुद्ध करतात आणि त्वचेची योग्य ती काळजी घेतात. आयुर्वेदिक डॉक्टर श्रेय शर्मा यांनी त्वचेला डिटॉक्स करण्याचे तीन सोपे आयुर्वेदिक उपाय सांगितले आहे. या साध्यासोप्या उपायांचा वापर करून आपण अगदी सहजपणे आपली त्वचा डिटॉक्स करु शकतो. 

आयुर्वेदानुसार स्किन डिटॉक्स करण्याची सोपी पद्धत पाहूयात... 

१. त्वचेला घाम येणे :- आयुर्वेदानुसार, शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी त्वचेला घाम येणे खूप गरजेचे असते. सौना किंवा स्टीम बाथमधून घाम गाळल्याने त्वचेच्या आत साचलेली घाण आणि विषारी पदार्थ बाहेर पडतात. जेव्हा आपल्या त्वचेला घाम येतो तेव्हा आपल्या त्वचेवरील छिद्रे उघडतात आणि ही क्रिया त्वचा स्वच्छ करण्यास अधिक मदत करते. घामामुळे रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे त्वचेला अधिक ऑक्सिजन आणि पोषण मिळते. आयुर्वेदानुसार, शरीरातील दोष संतुलित करण्यासाठी घाम येणे खूप फायदेशीर आहे. स्टीम बाथचा नियमित वापर शरीराच्या नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रियेला गती देतो. ज्यामुळे त्वचा केवळ निरोगी आणि चमकदार राहतेच, शिवाय आरोग्य देखील सुधारते. जर तुम्ही स्टीम बाथ घेत असाल तर आठवड्यातून २ ते ३ वेळा स्टीम बाथ घेणे फायदेशीर ठरेल. जेणेकरून तुमच्या शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर पडतील.

फक्त वाटीभर बेसन पिठात मिसळा 'हे' ६ पदार्थ, विकतचे फेसमास्क जाल विसरुन - त्वचा दिसेल सुंदर....

२. ड्राय ब्रशिंग :- आयुर्वेदात, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी त्वचेवर ड्राय ब्रशिंग करण्याची पद्धत वापरली जाते. हा एक प्राचीन उपाय आहे जो डेड स्किन काढून टाकण्यासाठी आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी केला जातो. ड्राय ब्रशिंगमुळे त्वचेच्या पृष्ठभागावर साचलेली डेड स्किन आणि घाण निघून जाते, ज्यामुळे त्वचा फक्त स्वच्छच होत नाही तर ती उजळ देखील होते. खबरदारी म्हणून, ही प्रक्रिया त्वचेवर हळूवारपणे करावी आणि कापसाचा किंवा सौम्य नैसर्गिक ब्रशचा  वापरावा. स्क्रबिंग करताना त्वचेचे घर्षण टाळण्यासाठी, ते हलक्या हातांनी करावे. 

३. त्वचेला मालिश करणे :- आयुर्वेदात, अभ्यंग म्हणजेच त्वचेला तेलाने मालिश करणे  गरजेचे असते. त्वचेला मालिश केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचे मानले जाते. हा एक असा उपाय आहे जो केवळ त्वचेचे पोषण करत नाही तर शरीरातील विविध दोषांचे संतुलन देखील करतो. मालिश केल्यामुळे त्वचेला ओलावा मिळतो आणि त्वचेची चमक वाढवण्यासोबतच त्वचा मऊ आणि चमकदार होते. 

केसांच्या समस्यांसाठी वरदान ठरतील तुमच्याच बागेतील रोपं ! पानाफुलांचा 'असा' करा वापर - केस दिसतील सुंदर...

मालिशसाठी नेमके कोणते तेल वापरावे ? 

१. वात दोषासाठी तिळाचे तेल :- तिळाचे तेल उष्ण असते, जे वात दोष संतुलित करण्यास मदत करते. हे शरीराला उबदार ठेवते आणि त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवते.

२. पित्त दोषासाठी नारळाचे तेल :- नारळाचे तेल थंड असते. जे पित्ताला शांत करते आणि त्वचेला आराम देते. हे त्वचेची जळजळ आणि सूज कमी करण्यास देखील मदत करते.

३. कफ दोषासाठी मोहरीचे तेल :- मोहरीचे तेल उष्ण असते, जे कफ दोष कमी करते आणि शरीरात रक्ताभिसरण वाढवते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी