शरीरावर नको असणारे अनावश्यक केस काढण्यासाठी आपण शेविंग, वॅक्सिंग करतो.(skin care tips) पण यानंतर आपल्याला त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.(facial hair growth) काहीवेळा त्वचा लालसर होणे, त्वचेवर पुरळ येणे किंवा खाज सुटण्याच्या समस्या उद्भवतात.(threading vs waxing) चेहऱ्यावरील वारंवार येणारे केस महिलांसाठी मोठी समस्या बनते.(facial hair removal tips) कधीकधी हे अनुवांशिक कारणांमुळे तर कधी हार्मोनल बदलांमुळे होते.(dermatologist advice for hair removal) काही महिलांच्या चेहऱ्यावर हलके केस असतात. ज्यामुळे त्यांना जास्त त्रास सहन होत नाही. पण अनेकदा चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी थ्रेडिंग करावी की, वॅक्सिंग असा प्रश्न कायम महिलांना पडतो. (painless facial hair removal)
भुवयांचे पांढरे केस होतील काळे- घनदाट, लसणाचा सोपा उपाय- पार्लरचा खर्च वाचेल, पाहा जादू
त्वचारोग तज्ज्ञ डॉ. जावेरिया आतिफ म्हणतात की, चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी महिला अनेक क्रीमरचा वापर करतात. पण या क्रीम्स त्वचेसाठी हानिकारक असतात. यामुळे त्वचेवर काळे डाग पडणं, खाज सुटणे यांसारख्या समस्या उद्भवतात. ज्यामुळे ओठांच्या आजूबाजूची त्वचा अधिक काळवडते.
नाजूक भागाभोवतीची त्वचा काळी पडली, खाज सुटते? ४ उपाय - आठवड्याभरात काळपटपणा होईल दूर
चेहऱ्यावरील नको असणारे केस काढण्यासाठी महिला अनेकदा थ्रेडिंगचा वापर करतात. ही पद्धत सोपी असली तरी यामुळे त्वचा लालसर होते. संवेदनशील त्वचा असणाऱ्यांना थ्रेडिंगनंतर जळजळ आणि खाज सुटते. पण सतत थ्रेडिंग करणं हा त्वचेच्या आरोग्यासाठी चांगला पर्याय नाही. चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी अनेक पार्लरमध्ये वॅक्सिंगचा सल्ला दिला जातो. परंतू, चेहऱ्याच्या नाजूक भागासाठी हानिकारक मानले जाते. वॅक्सिंगमुळे त्वचेचा वरचा थर खराब होऊ शकतो. ज्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते.
डॉक्टर म्हणतात, चेहऱ्यावरील केसांपासून कायमची सुटका मिळवायची असेल तर रेझर किंवा लेसर दोन्ही पर्याय चांगले आहेत. रेझर वापरून घरी केस सहजपणे काढता येतात. यामुळे वेदनाही होत नाही आणि त्वचेला हानी देखील पोहोचत नाही. लेझर उपचार हा सर्वात प्रभावी आणि दीर्घकाळ टिकणारा पर्याय आहे. यामुळे केसांची वाढ कमी होते आणि जळजळ होत नाही. लेझर ट्रिटमेंट महागडी असली तरी हा त्वचेसाठी चांगला पर्याय आहे. यामुळे त्वचेचे नुकसान कमी होईल आणि पोत देखील निरोगी राहिल.