Lokmat Sakhi >Beauty > बाजारात हजारो प्रॉडक्ट्स, तुमच्या त्वचेसाठी कोणते बेस्ट? ‘ही’ घ्या यादी, आणि शोधा योग्य प्रॉडक्ट

बाजारात हजारो प्रॉडक्ट्स, तुमच्या त्वचेसाठी कोणते बेस्ट? ‘ही’ घ्या यादी, आणि शोधा योग्य प्रॉडक्ट

Thousands of products in the market, which one is best for your skin? Take this list and find the right product : त्वचेचा पोत ओळखा. त्वचेची गरज ओळखा मगच उपाय करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2025 17:23 IST2025-06-30T17:22:22+5:302025-06-30T17:23:10+5:30

Thousands of products in the market, which one is best for your skin? Take this list and find the right product : त्वचेचा पोत ओळखा. त्वचेची गरज ओळखा मगच उपाय करा.

Thousands of products in the market, which one is best for your skin? Take this list and find the right product | बाजारात हजारो प्रॉडक्ट्स, तुमच्या त्वचेसाठी कोणते बेस्ट? ‘ही’ घ्या यादी, आणि शोधा योग्य प्रॉडक्ट

बाजारात हजारो प्रॉडक्ट्स, तुमच्या त्वचेसाठी कोणते बेस्ट? ‘ही’ घ्या यादी, आणि शोधा योग्य प्रॉडक्ट

त्वचेसाठी केसांसाठी अनेक सत्वांची गरज असते. ऑल इन वन गुण मिळत नाहीत. त्यासाठी विविध पदार्थ उपाय करावे लागतात. जसे की केसांची मजबुती  कमी असेल तर त्यासाठी वेगळा पर्याय असतो आणि केसात कोंडा झाला असेल तर त्यासाठी वेगळा पर्याय असते. तसेच काहीसे त्वचेचेही असते. एखाद्याची त्वचा तेलकट असते तर कोणाची त्वचा कोरडी असते.(Thousands of products in the market, which one is best for your skin? Take this list and find the right product) इतरही अनेक प्रकार आहेत. त्वचेचा पोत पाहून त्याची काळजी घ्यावी लागते. त्वचा जर कोरडी पडत आहे आणि सुरकुतलेली दिसत आहे तर त्यामागे नक्की कोणत्या सत्वाची कमतरता आहे हे जाणून घ्या आणि त्यानुसार पर्याय करा. पाहा कोणते सत्व कशासाठी गरजेचे असते. 

 

१. त्वचा उजळवण्यासाठी आपण अनेक प्रयोग करत असतो. त्वचा सूर्यप्रकाशामुळे किंवा इतर काही कारणांमुळे काळवंडते मग पुन्हा आधीसारखी होत नाही. त्यासाठी काही खास उपाय करावे लागतात. मात्र जर सारखी त्वचा काळवंडत असेल तर जीवनसत्त्व 'सी' चा अभाव असू शकतो. त्वचा उजळवण्यासाठी जीवनसत्व सी युक्त पदार्थ खा आणि प्रॉडक्ट्स वापरा.  

२. चेहर्‍यावरील ओपन पोर्स आणि तेल कमी करण्यासाठी नियसीनामाइड गरजेचे असते. ज्यांची त्वचा फार तेलकट आहे त्यांनी हे गुणधर्म असणारे प्रॉडक्ट्स वापरावे. नियसीनामाइड हा जीवनसत्त्व 'बी३' चा एक भाग आहे. त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी गरजेचे असे हे सत्व आहे. त्यामुळे जर चेहरा सारखा तेलकट होत असेल तर शरीरात नियसीनामाइडची कमतरता असू शकते. 

३. त्वचेसाठी हायरॉनिक ॲसिड फार गरजेचे असते. अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये हे ॲसिड वापरले जाते. त्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते. त्वचा कोरडी पडू नये यासाठी हायरॉनिक ॲसिड मदत करते. त्यामुळे जर त्वचा सारखी कोरडी पडते तर मग हे ॲसिड असणारे प्कॉडक्ट्स वापरा. त्वचेला गरजेचा असलेला ओलावा मिळेल. 

४. अनेक जणी काहीही स्किन रुटीन करत नाहीत. मात्र तसे न करता फक्त मॉइश्चराइझर वापरायचे. तेवढेच केले तरी त्वचा छान राहते. धूळ, सूर्य, माती, प्रदूषण यामुळे त्वचा खराब होते. त्यापासून वाचण्यासाठी मॉइश्चराइझर उपयुक्त ठरते. चांगले मॉइश्चराइझर रोज वापरा. 

Web Title: Thousands of products in the market, which one is best for your skin? Take this list and find the right product

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.