Join us

जगात ‘तिचे’ केस ठरले सर्वात लांब-पाहा सुंदर केसांचं सिक्रेट-दाट केसांसाठी 'हा' पदार्थ लावतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 19:28 IST

Smita Shrivastav Long Hairs Secret स्मिता या आपल्या केसांना नेमकं काय लावतात असा प्रश्न खूप महिलांना पडतो.

बऱ्याच महिलांचे असे स्वप्न असते की आपले केस लांबसडक, दाट असावेत अनेकदा प्रयत्न करूनही खूप जणींचे केस वाढतच नाहीत.  स्मिता श्रीवास्तव (Smita Shrivastav) या महिलेच्या लांबसडक केसांचा झाले  गिनिज बुक ऑफ वर्ल्डमध्ये रेकॉर्ड झाला आहे. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील रहिवासी असलेल्या स्मिता श्रीवास्तव यांचे केस  २०२३ मध्ये  ७ फूट ९ इंच लांब होते. त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आहे आहे.  स्मिता या आपल्या केसांना नेमकं काय लावतात असा प्रश्न खूप महिलांना पडतो. (The special secret of Smita Srivastava's 7 feet 9 inch hair)

१४ वर्षांच्या असल्यापासून स्मिता श्रीवास्तव केस वाढवत आहेत. आज त्यांचे केस ७ फुटांचे केस आहेत.  त्यानंतर त्यांनी आपले केस कधीच कापले नाही. (Long Hairs Secret) समोर आलेल्या माहितीनुसार त्यांचे केस धुवायला ४५ मिनिटं लागतात. स्मिता यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी आपल्या लांब,  दाट केसांचे सिक्रेट सांगितले आहे. या व्हिडीओत त्यांनी एका तेलाबद्दलही सांगितले आहे. ज्याचा वापर त्या नियमित आपल्या केसांवर करतात. (Hair Care tips)

नारळाचे तेल केसांसाठी उत्तम

त्या नारळाच्या तेलाचा वापर करतात. ज्यात एक चमचा मेथी दाणे पावडर मिक्स करून आपल्या केसांना लावतात. हे तेल केसांना लावल्यास केसांची चांगली वाढ  होते. स्मिता यांनी गिनीज बुक ऑफ  वर्ल्ड रेकॉर्डच्या एका इंटरव्हयूमध्ये सांगितले आहे की  जेव्हा माझे केस गळून तुटायचे तेव्हा फेकण्याऐवजी गोळा करायचे. कारण केस फेकून देण्याचा विचार मनाला खूप त्रास द्यायचा आणि मी उदास  व्हायचे.

आईबाबांनी ‘या’ ४ गोष्टी केल्या तर मुली होतात खंबीर, जन्मभर राहतील आनंदात

स्मिता सांगतात की त्या नॅच्युरल हेअर ट्रिटमेंट फॉलो करतात. मार्केटमधील शॅम्पू, कंडिशनर लावणं टाळतात. आपल्या केसांवर त्या कांद्याचा रस,  एलोवरा यांसारख्या वस्तूंचा वापर करतात. जर तुम्हालाही स्मितासारखे लांब केस हवे असतील तर तुम्ही घरगुती उपाय करू शकता. नारळाचे तेल हा केस वाढवण्याचा एक सुंदर उपाय आहे. नारळाचे तेल केसांना लावल्यानं केसांची वाढ चांगली होते. रोज या तेलानं मसाज केल्यास केसांचे पोर्स स्ट्राँग होतात आणि केस मजबूत होतात. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी