Lokmat Sakhi >Beauty > 'या' पद्धतीने त्वचा आणि केसांना लावा तांदुळाचे पाणी; आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात फायदे..

'या' पद्धतीने त्वचा आणि केसांना लावा तांदुळाचे पाणी; आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात फायदे..

The Power of Rice Water: A Secret to Healthy Hair and Glowing Skin : तांदुळाच्या पाण्याचा वापर केस आणि त्वचेसाठी कसा करावा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2024 10:00 AM2024-06-13T10:00:59+5:302024-06-13T12:01:26+5:30

The Power of Rice Water: A Secret to Healthy Hair and Glowing Skin : तांदुळाच्या पाण्याचा वापर केस आणि त्वचेसाठी कसा करावा?

The Power of Rice Water: A Secret to Healthy Hair and Glowing Skin | 'या' पद्धतीने त्वचा आणि केसांना लावा तांदुळाचे पाणी; आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात फायदे..

'या' पद्धतीने त्वचा आणि केसांना लावा तांदुळाचे पाणी; आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात फायदे..

भात बनवल्यानंतर त्यात जास्त पाणी उरते. ते पाणी आपण फेकून देतो (Rice Water). पण भाताच्या पाण्याचे अनेक फायदे आहेत. आपण भात किंवा तांदुळाच्या पाण्याचा वापर विविध गोष्टींसाठी करू शकता (Skin Care Tips). या पाण्यातील गुणधर्मामुळे आरोग्याला अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात (Hair Care Tips).

यासोबतच त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर मानले जाते. पण केसांसाठी आणि त्वचेसाठी तांदुळाच्या पाण्याचा वापर कसा करावा? आयुर्वेदात त्वचेच्या आणि केसांच्या अनेक समस्यांवर तांदळाचे पाणी फायदेशीर ठरत असल्याचं म्हटलं आहे. याबाबत आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. वरलक्ष्मी यनामंद्रा यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तांदुळाच्या पाण्याचे फायदे किती पाहूयात(The Power of Rice Water: A Secret to Healthy Hair and Glowing Skin).

महिन्यातून दोनदा केस कापावे लागतील इतके वाढतील केस; फक्त 'या' तेलात कांद्याचा रस मिसळा

त्वचा आणि केसांसाठी तांदुळाच्या पाण्याचे फायदे

त्वचेसाठी तांदुळाच्या पाण्याचे फायदे

तांदळाच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट्स असतात. त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी हे आवश्यक आहेत. तांदळाच्या पाण्याचा कूलिंग इफेक्ट असतो, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते. त्वचेवर तांदुळाच्या पाण्याचा वापर केल्याने खाज, जळजळ किंवा लालसरपणा दूर होते. वृद्धत्वाची लक्षणे देखील कमी होतात.

केसांसाठी तांदुळाच्या पाण्याचे फायदे

तांदळाच्या पाण्यात बी कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे आणि इनॉसिटॉल संयुगे असतात. हे संयुगे केसांना मॉइश्चरायझ आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामुळे डोक्यातील कोंडा आणि खाज येण्याची समस्याही नियंत्रित होते. याच्या वापराने केस चमकदार दिसतात.

केस गळतीमुळे हैराण? खोबरेल तेलात मिसळा '१' खास पावडर; केस होतील घनदाट

केसांना तांदुळाचे पाणी कसे लावावे?

आपण तांदुळाचे पाणी हेअर सीरम म्हणून वापरू शकता. यासाठी तांदुळाचे पाणी तयार करा. एका डब्यात हे पाणी साठवून ठेवा. तांदुळाचे पाणी केसांना लावा आणि मसाज करा. काही वेळानंतर शाम्पूने केस धुवा. आपण हेअर मास्कमध्ये तांदुळाचे पाणी मिक्स करू शकता. शिवाय तांदुळाच्या पाण्यात आपण एलोवेरा जेल किंवा खोबरेल तेलही मिक्स करू शकता. यामुळे केसांना अधिक पोषण मिळेल.

Web Title: The Power of Rice Water: A Secret to Healthy Hair and Glowing Skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.