सुंदर दिसणे कुणाला आवडत नाही. हल्ली प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असे वाटते. सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक महागडी उत्पादने वापरतो.(Potato Juice for Tanning and Dark Circles) परंतु यात असणारी काही उत्पादने आपल्या चेहऱ्याला सूट होत नाही. त्यामुळे रॅशेस किंवा पिंपल्स सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.(How to Use Potato Juice for Summer Skin Care) उन्हाळा म्हटलं की, आरोग्यासह त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते.
उन्हाळ्यात सूर्याच्या अतिनिल किरणांमुळे टॅनिंग आणि डार्क सर्कलच्या समस्या उद्भवतात. (How Potato Juice Can Help Reduce Dark Circles and Tan) घराबाहेर पडण्यापूर्वी आपण त्वचेला सनस्क्रीन, मॉइश्चरायझर लावतो. चेहऱ्याची पुरेशा प्रमाणात काळजी घेऊन सुद्धा त्वचा काळी पडते किंवा डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसतात.(Potato Juice Face Packs for Skin Brightening and Acne) याचे कारण वाढता तणाव किंवा चुकीचा आहार देखील असू शकतो. परंतु आपल्या स्वयंपाकघरात आढळणारा बटाटा फायदेशीर ठरेल.
होळी रे होळी!! नखांवरचा रंग लवकर निघत नाही? होळी खेळण्यापूर्वी 'अशी' घ्या काळजी
बटाटाच्या रसात अनेक नैसर्गिक गुणधर्म आहेत जे केवळ त्वचेचा रंग सुधारत नाही तर टॅनिंग आणि डार्क सर्कलपासून देखील आपली सुटका करते. जर आपल्याला सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवाची असेल तर बटाट्याच्या रसाचे काही सोपे उपाय करुन पाहूया.
1. बटाट्याचा रस
जर आपल्या चेहऱ्यावर डाग असतील बटाट्याचा रस त्वचेवर लावू शकता. बटाटा सोलून, किसून घ्या त्याचा रस काढा. नंतर हा रस चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. २० ते २५ मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. आठवड्यातून तीन दिवस असे केल्याने डाग कमी होण्यास मदत होईल.
2. बटाटा आणि टोमॅटोचा रस
बटाटा आणि टोमॅटोचा रस चेहऱ्यावरील डाग हलके करण्यास प्रभावी ठरतात. अर्धा चमचा टोमॅटोच्या रसात एक चमचा बटाट्याचा रस मिसळा. हे मिश्रम चेहऱ्यावर लावा. अर्ध्या तासानंतर चेहरा स्वच्छ कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. टोमॅटो डाग हलके करण्यास आणि त्वचेला उजळवण्यास मदत करतो.
3. बटाट्याचा रस आणि कोरफडीचा गर
जर आपली त्वचा कोरडी असेल आणि डागांचा त्रास होत असेल तर बटाट्याच्या रसात कोरफडीचा गर मिसळा. एक चमचा बटाट्याचा रस आणि दोन चमचे कोरफडीचा गर मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर किंवा डागांवर लावा. ३० मिनिटांनंतर पाण्याने धुवा. कोरफड त्वचेला हायड्रेट करते तसेच डाग कमी करण्यास मदत करते.
4. बटाट्याचा रस आणि ग्लिसरीन
बटाट्याच्या रसात ग्लिसरीन मिसळून वापरता येईल. ग्लिसरीन हे आपल्या त्वचेला ओलावा देते. तसेच त्वचेला मऊ ठेवण्याचे काम करते. २ चमचे बटाट्याच्या रसात ४ ते ५ थेंब ग्लिसरीन मिसळून चेहऱ्यावर लावा. अर्ध्या तासाने कोमट पाण्याने धुवा. असे आठवड्यातून ४ ते ५ वेळा केल्याने आराम मिळेल.