उन्हाळा म्हटलं की घाम, चिपचिपित त्वचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्किन टॅनिंग आपसूकच आलं... रणरणत्या प्रखर उन्हामुळे त्वचेवर टॅनिंग, काळेपणा आणि निस्तेजपणा दिसू लागतो. घराबाहेर पडताना सूर्य किरणांचा थेट परिणाम त्वचेवर होत असल्याने चेहऱ्याची नैसर्गिक चमक कमी होते आणि स्किन टोन असमान दिसू लागतो. कडक उन्हामुळे त्वचेवर आलेले काळे चट्टे आणि टॅनिंगमुळे आपला संपूर्ण लूकच खराब होतो. आरशात पाहताना चेहरा काळवंडलेला आणि निस्तेज दिसला की कोणालाही टेन्शन येतं(homemade face mask for tan removal).
उन्हामुळे येणारे काळे डाग आणि टॅनिंगमुळे चेहऱ्याचं नैसर्गिक सौंदर्य हरवतं. काळवंडलेला चेहरा आणि स्किन टॅनिंग घालवण्यासाठी, महागड्या सनस्क्रीनवर पैसे खर्च करतो, पण टॅनिंग (best face pack for sun tanning) काही केल्या जात नाही. मग आपण विचार करतो पार्लरमध्ये जाऊन महागडं फेशिअल किंवा डी-टॅन करावं. परंतु स्किन टॅनिंग घालवण्यासाठी आपल्या किचनमध्येच असे काही 'मॅजिकल' पदार्थ असतात, ज्या कोणत्याही महागड्या ट्रीटमेंटपेक्षा जास्त फायदेशीर असतात...या उन्हाळ्यात तुमची त्वचा (natural tan removal remedies) काचेसारखी नितळ आणि टवटवीत ठेवण्यासाठी नेमकं काय करायचं? ते पाहूयात...
स्किन टॅनिंग घालवण्यासाठी घरगुती सोपा उपाय...
उन्हाळ्यात त्वचेवरील स्किन टॅनिंग घालवण्यासाठी घरगुती फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला १/२ कप बटाट्याचा रस, १ टेबलस्पून लिंबाचा रस, १ टेबलस्पून गव्हाचं पीठ, १ टेबलस्पून कॉफी पावडर, १ टेबलस्पून खोबरेल तेल इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
नेमका उपाय काय करायचा ?
एका मोठ्या बाऊलमध्ये कच्च्या बटाट्याचा किस काढून त्याचा रस घ्यावा. या बटाट्याच्या रसात लिंबाचा रस, गव्हाचं पीठ, कॉफी पावडर आणि थोडं खोबरेल तेल घालूंन सगळं मिश्रण कालवून एकजीव करून घ्यावं. उन्हाळ्यासाठी खास त्वचेवरील सन टॅनिंग कमी करणारा घरगुती फेसमास्क वापरण्यासाठी तयार आहे.
चमचाभर बडीशेप करेल केस काळेभोर! स्वस्तात मस्त 'केमिकल-फ्री' हेअरडाय - कमी खर्चात पार्लरसारखा लूक...
हा फेसमास्क वापरायचा कसा ?
तयार फेसमास्क ब्रशच्या किंवा बोटांच्या मदतीने त्वचेवर लावून ठेवावा. त्यानंतर १० ते १५ मिनिटे किंवा तो पूर्णपणे सुकेपर्यंत त्वचेवर तसाच राहू द्या. मग सुकल्यावर बोटांनी हलकेच दाब देत स्क्रब करत काढून घ्यावा. मग कोमट किंवा थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा हा उपाय केल्यास यंदाच्या उन्हाळयात स्किन टॅनिंगच्या समस्येचा त्रास होणार नाही.
आरशात पाहताच डोळ्यांखालची डार्क सर्कल्सच दिसतात, करा काकडी उपाय-डोळ्यांवरुन हटणार नाही नजर...
हा फेसमास्क स्किन टॅनिंग काढण्यासाठी कसा फायदेशीर...
१. बटाट्याचा रस :- बटाटा हा नैसर्गिक 'ब्लिचिंग एजंट' म्हणून ओळखला जातो. यामध्ये असलेले 'कॅटेकोलेज' (Catecholase) एन्झाईम त्वचेवरील काळे डाग आणि टॅनिंग घालवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
२. लिंबाचा रस :- लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन-सी आणि सायट्रिक ॲसिड असते. हे घटक त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करतात. लिंबाचा रस एक नैसर्गिक क्लिन्झर म्हणून काम करतो, ज्यामुळे उन्हामुळे काळवंडलेली त्वचा पुन्हा एकदा टवटवीत आणि उजळ दिसते.
३. गव्हाचं पीठ :- गव्हाच पीठ त्वचेसाठी 'एक्सफोलिएटर' म्हणून काम करते. हे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषून घेते आणि त्वचेला घट्टपणा देते. जेव्हा आपण हा मास्क सुकल्यावर स्क्रब करून काढतो, तेव्हा गव्हाच्या पिठामुळे त्वचेवरील साचलेली धूळ आणि प्रदूषण सहज निघून जाते.
४. कॉफी पावडर :- कॉफीमध्ये मुबलक प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात. हे घटक त्वचेला 'इन्स्टंट ग्लो' देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. कॉफीमुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे चेहरा फ्रेश दिसतो. तसेच कॉफीमधील खडबडीतपणा त्वचेवर जमा झालेलं टॅनिंग काढून टाकण्यास मदत करतो.
५. खोबरेल तेल :- उन्हाळ्यात त्वचा अनेकदा कोरडी आणि निस्तेज पडते. खोबरेल तेल त्वचेला खोलवर मॉइश्चराईज करते. खोबरेल तेल हे अँटी - बॅक्टेरियल असल्याने त्वचेवरील पुरळ आणि रॅशेसपासूनही संरक्षण देते.
Web Summary : Combat summer tanning with a homemade face mask. Potato juice, lemon, wheat flour, coffee, and coconut oil blend for radiant, tan-free skin. Apply 2-3 times weekly for best results.
Web Summary : गर्मी में टैनिंग से छुटकारा पाएं घर पर बने फेस मास्क से। आलू का रस, नींबू, गेहूं का आटा, कॉफी और नारियल तेल मिलाकर त्वचा को निखारें। सर्वोत्तम परिणामों के लिए हफ्ते में 2-3 बार लगाएं।