उन्हाळ्याचा तडाखा वाढला की घामाच्या धारा लागणं स्वाभाविक आहे. घाम येणे ही शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची एक नैसर्गिक प्रक्रिया असली तरी जेव्हा घाम त्वचेवरील बॅक्टेरियांच्या संपर्कात येतो, तेव्हा शरीराला दुर्गंधी येऊ लागते. अनेकदा महागडे पर्फ्युम्स, डिओड्रंट्स किंवा अत्तरं वापरुनही हा वास पूर्णपणे जात नाही.(Summer body odor home remedies) उलट काही वेळा घामाचा वास आणि पर्फ्युमचा सुगंध एकत्र येऊन अधिकच विचित्र वास येऊ लागतो. यामुळे चारचौघात वावरताना, ऑफिसमध्ये मीटिंगमध्ये बसताना किंवा प्रवासात आपल्याला सतत संकोचल्यासारखे वाटते. या समस्येवर उपाय म्हणजे आंघोळीच्या प्रक्रियेत काही सामान्य बदल करणे.(Ayurvedic tips for body odor) आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आढळतात. ज्यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल आणि नैसर्गिक सुगंधी गुणधर्म असतात. आंघोळीच्या पाण्यात या गोष्टी मिसळल्यास शरीरावरील दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि घामाचे प्रमाणही नियंत्रित राहते.(Body Odor Solution) यामुळे आपण दिवसभर कोणत्याही महागड्या स्प्रे विना नैसर्गिकरित्या फ्रेश आणि सुगंधी राहू शकता. पाहूयात आंघोळीच्या पाण्यात काय घालावं.
केमिकल कंडिशनरला करा बाय-बाय! शून्य खर्चात हेअर मास्क रेडी; केसगळती थांबून झाडूसारखे केस होतील रेशमी
1. तुरटीमध्ये नैसर्गिक अॅस्ट्रिंजंट आणि अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. आंघोळीच्या पाण्यात अर्धा चमचा तुरटीची पावडर किंवा तुरटीचा खडा थोडा वेळ फिरवा. यामुळे घामाची दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया मरतात आणि घामाचे प्रमाण कमी होते.
2. लिंबामध्ये असलेल्या सायट्रिक अॅसिडमुळे त्वचेची पीएच पातळी संतुलित राहते. आंघोळीच्या बादलीत एका लिंबाचा रस पिळा. लिंबाचा नैसर्गिक फ्रेश सुगंध आपल्याला दिवसभर ताजेतवाने ठेवतो. तसेच लिंबू त्वचेवरील तेलकटपणा कमी करुन बॅक्टेरिया वाढवण्यापासून रोखतो.
3. उन्हाळ्यात घाम साचल्यामुळे त्वचेवर घामोळ्या किंवा खाज येण्याच्या समस्या उद्भवतात. आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने उकळून ते पाणी मिक्स करा आणि पानांचा रस घाला. कडुलिंब हे उत्तम जंतुनाशक आहे. यामुळे घामाचा उग्र वास तर जातोच, पण त्वचेचे संसर्गही दूर होतात.
4. आपल्याला नैसर्गिक फुलांसारखा सुगंध हवा असेल तर आंघोळीच्या पाण्यात दोन चमचे गुलाबजल किंवा रात्रभर भिजवलेली मोगऱ्याची फुले घाला. यामुळे शरीराला सुगंध येत नाही, तर मनही प्रसन्न राहते.
5. उन्हाळ्यात कॉटनच्या कपड्यांचा वापर करा. सुती कपडे घाम शोषून घेतात आणि त्वचेला हवा लागते. शरीरात टॉक्सिन्स साचल्यामुळे घामाला जास्त वास येतो. भरपूर पाणी प्यायल्याने हे टॉक्सिन्स लघवीद्वारे बाहेर पडतात. जास्त मसालेदार आणि लसूण-कांदा युक्त पदार्थ खाल्ल्याने घामाचा वास अधिक उग्र होतो, त्यामुळे उन्हाळ्यात हलका आहार घ्या.
Web Summary : Combat summer body odor by adding ingredients like alum, lemon, neem, or rosewater to your bath. These natural remedies fight bacteria, balance skin pH, and leave you feeling fresh and fragrant all day. Choose cotton clothes and stay hydrated.
Web Summary : गर्मी में शरीर की दुर्गंध से निपटने के लिए फिटकरी, नींबू, नीम या गुलाब जल जैसी सामग्री मिलाएं। ये प्राकृतिक उपचार बैक्टीरिया से लड़ते हैं, त्वचा के पीएच को संतुलित करते हैं और आपको पूरे दिन तरोताजा रखते हैं। सूती कपड़े चुनें और हाइड्रेटेड रहें।