सध्या वातावरण प्रचंड दूषित आहे. त्यामुळे शरीराच्या सौंदर्याची फारच वाट लागत चालली आहे. (Struggling With White Hair? Take These 5 Remedies - Look Younger Forever)तत्वेचे रोग होतात. चेहऱ्यावरचा ग्लो निघून जातो. अशा अनेक समस्या वाढत आहेत. आणखी एक समस्या म्हणजे केसांची पार वाट लागून जाते. स्ट्रेस तसेच प्रदूषण आदींमुळे केस प्रचंड गळतात. एवढंच नाही तर वीशीतच पांढरे व्हायला लागतात. मग वयाच्या आधीच म्हातारपण आल्यासारखं वाटायला लागतं.(Struggling With White Hair? Take These 5 Remedies - Look Younger Forever) शरीरावर होणारा रसायनांचा मारा याला कारणीभूत आहे. त्याच प्रमाणे अति विचार करण्याचा स्वभावही कारणीभूत ठरतो.जीवनसत्त्वांची कमतरता असल्यानेही असे होते. आजकाल मुलींमध्ये थायरोईडचे प्रमाण वाढले आहे , त्याचाही केसांवर परिणाम होतो. केसांना हवी तेवढी सत्वे न मिळाल्यामुळे केस पांढरे होतात.
यावरती मुली औषधं घेतात. केसाला रंग लावतात. मेंदी लावतात. तरी काही परिणाम होत नाही. कारण ते तात्पुरते उपाय आहेत. हे पाच उपाय करून बघा. केस मस्त घनदाट व काळेभोर राहतील.
१. जास्वंदाचे फुल घ्या. ते सुखवा. त्याची पावडर तयार करा. ती पावडर दह्यात घाला. आणि नहाण्याआधी हा हेअर पॅक केसांना लावा. केस पांढरे होणार नाही.
२. भृंगराज व आवळ्याचे तेल बाजारात मिळते. त्या तेलाने झोपताना डोक्याला मसाज करा. केसांच्या मुळांशी लावा. त्या तेलाने टाळूला छान मसाज करा. आठवड्यातून तीनदा तरी करा. केस गळायचे ही थांबतील.
३. रोज सकाळी अश्वगंधाचा चहा प्यायला सुरवात करा. याचे अनेक फायदे आहेत . शरीरासाठी तर ते चांगले आहेच. तसेच ते केसांसाठी व त्वचेसाठीही चांगले आहे. केस पांढरे होणार नाहीत.
४. केसांच्या आरोग्यासाठी योगासने आहेत. त्या योगासनांमध्ये सर्वांगासनाचा समावेश होतो. अनेक जणांना सर्वांगासनाने गुण आला आहे. तसेच हलासन ही केसांसाठी चांगले ठरते. रोज थोडावेळ ही दोन्ही आसने करत जा.
५. केसांचे स्वास्थ्य बिघडण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे ओमेगा-३ ची कमतरता. केसांना त्याची फार गरज असते. त्यामुळे अक्रोड,जवस असे पदार्थ खात जा.त्यामध्ये भरपूर ओमेगा-३ असते.