प्रेग्रेंसीपूर्वी आणि नंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल घडतात.(Stretch marks home remedies) त्यातील एक स्ट्रेच मार्क्स. स्ट्रेच मार्क्समुळे महिलांच्या शरीराचे सौंदर्य खराब होते.(Coconut oil for stretch marks) ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.(Natural remedy for stretch marks) आई झाल्यानंतरच्या काळात प्रत्येक आपल्याला शरीराबाबत त्यांच्या मनात न्यूनगंड तयार होत. (Skin care for stretch marks)पोट आणि मांड्यांवरील स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या क्रीम्स लावतो.(Fade stretch marks naturally) पण तरीही स्ट्रेच मार्क्स काही जात नाही. पोटावर- मांड्यांवर पांढऱ्या किंवा निळ्या रंगाच्या रेषा दिसू लागतात.(Homemade stretch mark cream) अनेकदा वजन कमी केल्यानंतरही स्ट्रेच मार्क्स काही जात नाही. (Essential oils for skin repair)स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी आपण काही सोपा घरगुती उपाय करुन पाहू शकतो.
स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणतात स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी नारळाचे आणि बदामाचे तेल फायदेशीर आहे. रोज सकाळ-संध्याकाळ पोट, कंबर आणि मांड्यांवर हलक्या हाताने मालिश केल्यास स्ट्रेच मार्क्स कमी होतील. तसेच यावेळी आपल्याला भरपूर पाणी पिणे महत्त्वाचे आहे. तसेच संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे देखील महत्त्वाचे आहे. जेव्हा आपल्या शरीराला आतून हायड्रेट आणि पोषण तत्व मिळते तेव्हा त्वचेची स्थिती सुधारते आणि स्ट्रेच मार्क्स वेगाने कमी होऊ लागतात.
स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी कोरफडीच्या गराचा देखील आपण वापर करु शकतो. यामुळे त्वचेची दुरुस्ती होते तसेच त्वचा खोलवर मॉइश्चरायझ होते. आपण आठवड्यातून दोनदा लिंबू, मध, ओट्स आणि दुधाने चेहरा हलका स्क्रब करावा. यामुळे मृत त्वचा निघून जाते आणि त्वचेचा रंग सुधारतो. या काही सोप्या घरगुती उपायांनी आपण पोट आणि मांड्यांवरील स्ट्रेच मार्क्स घालवू शकतो.