lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > लग्नात उठून दिसायचं? चमचाभर साखर अन् दह्याचे करा डायमंड फेशिअल; दिसाल फ्रेश - तेजस्वी

लग्नात उठून दिसायचं? चमचाभर साखर अन् दह्याचे करा डायमंड फेशिअल; दिसाल फ्रेश - तेजस्वी

Step by step diamond Glow facial at home in 10 min : उन्हाळ्यात स्किन टॅन झाली असेल तर, एकदा स्वस्तात मस्त डायमंड फेशिअल करून पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2024 10:01 AM2024-04-20T10:01:00+5:302024-04-21T11:13:13+5:30

Step by step diamond Glow facial at home in 10 min : उन्हाळ्यात स्किन टॅन झाली असेल तर, एकदा स्वस्तात मस्त डायमंड फेशिअल करून पाहा..

Step by step diamond Glow facial at home in 10 min | लग्नात उठून दिसायचं? चमचाभर साखर अन् दह्याचे करा डायमंड फेशिअल; दिसाल फ्रेश - तेजस्वी

लग्नात उठून दिसायचं? चमचाभर साखर अन् दह्याचे करा डायमंड फेशिअल; दिसाल फ्रेश - तेजस्वी

लग्न असो किंवा वाढदिवस. घरात कोणतंही फंक्शन असो, बऱ्याच जणी हौशीने फेशिअल करतात (Skin Care Tips). कारण चारचौघात आपण उठून दिसावं, शिवाय आपला चेहरा कायम ग्लो करावा, यासाठी फेशिअल आपण करीत असतो (Beauty Tips). पण बऱ्याचदा फेशिअल केल्यानंतर चेहऱ्यावर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. अनेक ब्यूटी उत्पादनांमध्ये केमिकल रसायने असतात. ज्यामुळे स्किन खराब होण्याची दाट शक्यता असते.

मग अशावेळी महागडे फेशिअल करून आपण पैसे घालवले की काय? असा प्रश्न निर्माण होतो. तुमचंही असच होत असेल, शिवाय फेशिअल केल्यानंतर स्किन खराब होऊ नये, असे वाटत असेल तर, साखर आणि दह्याचा वापर करून फेशिअल क्रीम तयार करा. यामुळे स्किन तर ग्लो करेलच, शिवाय मुरुमांचे डाग, टॅनिंग, डेड स्किन, डल स्किनची समस्या सुटेल. पण चेहऱ्यावर डायमंड फेशिअलचा वापर कसा करावा? पाहूयात(Step by step diamond Glow facial at home in 10 min).

डायमंड फेशिअल करण्यासाठी लागणारं साहित्य

साखर

दही

टोमॅटोचा रस

खोबरेल तेल

ना रस - ना पेस्ट; ५ रुपयांच्या काकडीने करा फेशिअल; चेहरा करेल ग्लो - टॅनिंग होईल गायब

बेसन

कॉफी पावडर

'या' पद्धतीने तयार करा फेशिअल क्रीम

डायमंड फेशिअल क्रीम तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये एक चमचा साखर, एक चमचा दही, एक चमचा टोमॅटोचा रस, एक चमचा खोबरेल तेल, एक चमचा बेसन आणि एक चमचा कॉफी पावडर घालून मिक्स करा. २ मिनिटांसाठी पेस्ट तशीच ठेवा.

२ मिनिटानंतर चेहरा धुवून घ्या. तयार पेस्ट चेहऱ्यावर ब्रशने लावा. आपण या पेस्टचा वापर अंडरआर्म्स किंवा पायाचे टॅनिंग काढण्यासाठी देखील करू शकता. तयार पेस्ट चेहऱ्यावर १० मिनिटांसाठी लावून ठेवा. १० मिनीटानंतर पेस्ट हाताने काढा. यामुळे डेड स्किन, मुरुमांचे डाग यासह चेहऱ्याच्या निगडीत अनेक समस्या दूर होतील. हाताने पेस्ट काढल्यानंतर ओल्या कापडाने चेहरा पुसून काढा. नंतर आईसक्यूब घ्या, याने चेहऱ्याला मसाज द्या. यामुळे स्किन फ्लफी दिसेल, आणि ग्लो करेल.

केस गळून विरळ झालेत? टक्कलही पडले? खोबरेल तेलात मिसळा २ पाने; केसांची होईल कंबरेपर्यंत वाढ

चेहऱ्याला दही लावण्याचे फायदे

उन्हाळ्यात दही खाण्यासोबत चेहऱ्यालाही लावण्याचे अनेक फायदे आहेत. दह्यामध्ये व्हिटॅमिन-डी आणि प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड देखील असते. जे टॅनिंग आणि डेड स्किन काढून टाकण्यास मदत करतात. याचा वापर आपण फेशिअल करण्यासाठी नक्कीच करू शकता.

Web Title: Step by step diamond Glow facial at home in 10 min

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.