Join us

ऐन तारुण्यात चेहऱ्यावर डाग- वयापेक्षा म्हातारा दिसतो चेहरा? घरीच करा गाजराचे मॉइश्चयराझर, कांती दिसेल तरुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2025 15:45 IST

Face spots in early age: Look younger home remedies: Carrot moisturizer benefits: त्वचा सुंदर आणि मऊ बनवायची असेल आपण घरच्या घरी गाजराचे मॉइश्चरायझर बनवू शकतो.

ऋतूमानानुसार आपल्या चेहऱ्यावर त्याचा परिणाम होत असतो. (Face spots in early age) हल्ली कमी वयातच त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.(Look younger home remedies) किशोरवयीन अवस्थेत गेल्यानंतर मुरुमे, पिंपल्स येण्यासारख्या समस्या सामान्य असतात. या वयामध्ये चेहऱ्याच्या अनेक तक्रारी वाढतात. (Carrot moisturizer benefits)चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक महागडी केमिकल्स असणारी उत्पादने वापरतो.(Natural remedies for facial spots) परंतु, त्यात असणाऱ्या केमिकल्समुळे चेहरा तजेलदार होण्याऐवजी तो खराब दिसू लागतो.(How to reduce face spots naturally) बाजारात आपल्याला विविध प्रकारचे लोशन आणि मॉइश्चरायझिंग क्रीम मिळतात.(Night skincare routine with carrot) ज्यामध्ये सुगंध चांगला असतो, परंतु, त्यात वापरली जाणारे रसायने चेहऱ्यासाठी हानिकारक असतात. ज्यामुळे त्वचेवर नकारात्मक परिणाम होतो. त्वचा सुंदर आणि मऊ बनवायची असेल आपण घरच्या घरी गाजराचे मॉइश्चरायझर बनवू शकतो. (Homemade carrot moisturizer for glowing skin)

तुम्ही ‘हे’ पदार्थ रोज खाता, म्हणून चेहऱ्यावर येतात मुरुम-पुटकुळ्या-डागही जाता जात नाहीत

गाजर खाल्ल्याने शरीराला जितके फायदे होतात तितकेच चेहऱ्याला होतात. यामध्ये असणारे व्हिटॅमिन ए, सी आणि ई आपली त्वचा उजळवण्यास मदत करते. यात असणारे अँटीऑक्सिडंट्स डाग कमी करतात. तसेच त्वचेची चमक वाढवण्यासाठी देखील गाजर फायदेशीर आहे. 

गाजराचे मॉइश्चयराझर कसे बनवायचे? 

सगळ्यात आधी एक गाजर घेऊन त्याला किसून घ्या. किसलेले गाजरला मिक्सरमध्ये घेऊन त्यात गुलाब पाणी घालून वाटून घ्या. गाजरचा रस गाळून घ्या. २ चमचे कोरफडीच्या गरात गाजराचा रस मिक्स करा. यामध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला. हे मॉइश्चयराझर आपण रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावायला हवे. तसेच फ्रीजमध्ये ठेवल्यास आठवडाभर राहिल. फ्रेश आणि ताजे मॉइश्चयराझर त्वचेला लावल्यास सुरकुत्या-डागांपासून सुटका होईल. त्वचा उजळण्यासही मदत होईल.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी