Lokmat Sakhi >Beauty > चहाच्या पाण्यात 'अशी' भिजवा मेहेंदी, केसांच्या सौंदर्यासाठी आणि आरोग्यासाठी एकदम मस्त उपाय

चहाच्या पाण्यात 'अशी' भिजवा मेहेंदी, केसांच्या सौंदर्यासाठी आणि आरोग्यासाठी एकदम मस्त उपाय

Soak mehendi in tea water, a great solution for haircare, beauty and health tips : चहाच्या पाण्यात मेहेंदी भिजवण्याचे फायदे. केसांसाठी अगदी औषधी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2025 14:58 IST2025-09-11T14:57:32+5:302025-09-11T14:58:19+5:30

Soak mehendi in tea water, a great solution for haircare, beauty and health tips : चहाच्या पाण्यात मेहेंदी भिजवण्याचे फायदे. केसांसाठी अगदी औषधी.

Soak mehendi in tea water, a great solution for haircare, beauty and health tips | चहाच्या पाण्यात 'अशी' भिजवा मेहेंदी, केसांच्या सौंदर्यासाठी आणि आरोग्यासाठी एकदम मस्त उपाय

चहाच्या पाण्यात 'अशी' भिजवा मेहेंदी, केसांच्या सौंदर्यासाठी आणि आरोग्यासाठी एकदम मस्त उपाय

मेहेंदीचा वापर केसांना रंग देण्यासाठी आणि केसांचे आरोग्य राखण्यासाठी वर्षानुवर्षे केला जात आहे. मेहेंदी फक्त पाण्यात भिजवून लावली तरी रंग छान येतो. मात्र केसांना छान रंगासोबत पोषणही देण्यासाठी मेहेंदी चहाच्या पाण्यात भिजवता येते. या पद्धतीने मेहेंदी लावल्याचे अनेक फायदे मिळतात. (Soak mehendi in tea water, a great solution for haircare, beauty and health tips)चहामध्ये असणारे टॅनिन्स मेहेंदीतील रंगद्रव्याशी मिसळतात त्यातून प्रतिक्रिया तयार होते आणि त्यामुळे केसांना येणारी छटा अधिक गडद व टिकाऊ असते. साध्या पाण्यात भिजवलेल्या मेहेंदीपेक्षा चहाच्या पाण्यात भिजवलेल्या मेहेंदीचा रंग जास्त उठावदार दिसतो. म्हणूनच पांढर्‍या केसांवर किंवा साध्या केसांवरही या पद्धतीने मेहेंदी लावणे जास्त फायद्याचे ठरते.

चहा आणि मेहेंदी हे मिश्रण पूर्णपणे नैसर्गिक असल्याने केसांवर कोणतेही रासायनिक दुष्परिणाम होत नाहीत. बाजारातील रंगांमध्ये अमोनिया आणि इतर रसायने असल्याने केस कोरडे, कमकुवत व विरळ होतात. पण मेहेंदी व चहा एकत्रितपणे केसांना सुरक्षितपणे रंग देतात. मेहेंदीही नैसर्गिकच वापरा. यामुळे केसांना सुंदर तपकिरी-काळसर छटा मिळते आणि तो रंग दीर्घकाळ टिकतो. त्याचबरोबर मेहेंदी केसांना कोटिंग देऊन त्यांची मुळे बळकट करते. तर चहातील अँटी ऑक्सिडंट्स केसांना पोषण देतात. त्यामुळे केस गळणे कमी होते, टाळूला थंडावा मिळतो आणि कोंड्याचा त्रासही कमी होतो. याशिवाय हे मिश्रण नैसर्गिक कंडिशनरप्रमाणे काम करुन केसांना ओलावा व मऊपणा देते.

चहाच्या पाण्यात मेहेंदी भिजवण्याची पद्धत अगदी सोपी आहे. दोन कप पाणी उकळून त्यात दोन चमचे चहा टाकून गाळून घ्यावे आणि ते कोमट पाणी मेहेंदी भिजवण्यासाठी वापरावे. शक्य असल्यास ही मेहेंदी रात्री भिजवून ठेवावी आणि दुसऱ्या दिवशी केसांवर लावावी. दोन ते तीन तास ठेवल्यानंतर केस फक्त पाण्याने स्वच्छ धुवावेत. अशा प्रकारे लावलेली मेहेंदी केसांना नैसर्गिक रंग, चमक आणि आरोग्य देऊन रसायनांपासून सुरक्षित ठेवते. त्यामुळे आजही चहाच्या पाण्यात मेहेंदी भिजवण्याची जुनी पद्धत केसांसाठी सर्वोत्तम मानली जाते.

Web Title: Soak mehendi in tea water, a great solution for haircare, beauty and health tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.