अभिनय क्षेत्र हे असं आहे की जिथे कलाकाराचा चेहरा सगळ्यात आधी बोलतो. त्यामुळे त्या प्रोफेशनची गरज म्हणून अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला अधिकाधिक फोकस त्यांच्या त्वचेवर, सौंदर्यावर, चेहऱ्यावर, त्यांच्या लूकवर द्यावा लागतो. त्यामुळे त्यांना वेगवेगळे कॉस्मेटिक्स वापरावे लागत असले तरी त्यांचा भर बऱ्याचदा पारंपरिक घरगुती सौंदर्योपचार करण्यावर असतो. जया बच्चन, मलायका अरोरा, क्रिती सेनन, तमन्ना भाटिया यांनीही त्यांचं स्किन केअर रुटीन बऱ्याचदा सोशल मीडियावर शेअर केलेलं आहेच (Rakul Preet Singh shared her skin care routine and beauty secret). आता रकुलप्रीत सिंगनेही तिच्या काही ब्यूटी टिप्स चाहत्यांसोबत शेअर केलेल्या आहेत.(home remedies by Rakul Preet Singh for glowing skin)
ग्लोईंग त्वचेसाठी रकुलप्रित सिंगने सांगितल्या सोप्या घरगुती ब्यूटी टिप्स..
१. रकुलप्रीत सांगते की बऱ्याचदा त्वचा खूप ड्राय, काेरडी दिसते. अशी कोरडी झालेली त्वचा पुन्हा एकदा मऊ, कोमल करायची असेल तर केळीचा खूप चांगला उपयोग होतो.
थंडीमुळे कोरडी, काळी पडलेली त्वचा केळीच्या सालांमुळे होईल तुकतुकीत, २ पद्धतीने वापरा, चेहरा चमकेल
यासाठी अर्धी केळी घ्या आणि ती हातानेच कुस्करून घ्या. त्यामध्ये दही आणि मध घालून तिन्ही पदार्थ चमच्याने फेटून एकजीव करा. आता हा मास्क चेहऱ्याला लावा. १२ ते १५ मिनिटांनी हलक्या हाताने मालिश करून चेहरा धुवून टाका. यामुळे त्वचा छान मऊ होते.
२. जर तुमची त्वचा खूप ऑईली झाली असेल तर दही, बेसन आणि चिमूटभर हळद एकत्र करून त्याचा लेप चेहऱ्याला लावा. एखादा मिनिट हलक्या हाताने त्वचा चोळून घ्या. त्यानंतर साधारण ८ ते १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. टॅनिंग, डेडस्किनही कमी होईल आणि त्वचा जास्त फ्रेश दिसेल.
सॅलाड म्हणून 'या' भाज्या कधीही कच्च्या खाऊ नका- पोटाला त्रास होऊन तब्येत बिघडेल
३. याशिवाय टोमॅटोचा रस चेहऱ्याला लावणे, कच्च्या दुधाने त्वचेला मालिश करणे, पपई, केळी किंवा इतर कोणतेही फळ चेहऱ्याला लावून मसाज करणे, असे उपाय रकूलप्रित सिंग नेहमीच करत असते.
Web Summary : Rakul Preet Singh shares her beauty secrets for glowing skin. Her tips include using banana and yogurt masks for dry skin and a turmeric, besan, and yogurt mask for oily skin. She also suggests applying tomato juice and massaging the skin with raw milk and fruit.
Web Summary : रकुल प्रीत सिंह ने दमकती त्वचा के लिए अपने ब्यूटी सीक्रेट्स साझा किए। उनकी टिप्स में रूखी त्वचा के लिए केला और दही मास्क और तैलीय त्वचा के लिए हल्दी, बेसन और दही मास्क का उपयोग शामिल है। वह टमाटर का रस लगाने और कच्चे दूध और फल से त्वचा की मालिश करने का भी सुझाव देती हैं।