Join us

महागडे फेशिअल-डी टॅन कशाला? टोमॅटो अन् बटाट्याने करा टॅनिंग दूर; १० रुपयात दिसेल तजेलदार चेहरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2024 17:41 IST

Skin Whitening Tomato & Potato Face Pack - D'tan Face Pack at Home : उन्हाळ्यात बाहेर पडून जर स्किन टॅन झाली असेल तर, टोमॅटो अन् बटाट्याचा सोपा उपाय करा

उन्हाळा सुरु झाल्यानंतर स्किनच्या निगडीत समस्या प्रचंड प्रमाणात वाढतात. ज्यामुळे स्किन टॅन तर होतेच, शिवाय स्किनच्या संबंधित इतर समस्याही निर्माण होतात (Skin Care Tips). उन्हाळ्यात घराबाहेर पडल्यानंतर स्किन काळपट पडते. त्यामुळे बरेच जण बाहेर पडताना स्कार्फ, टोपी किंवा गॉगलचा वापर करतात. पण तरीही स्किन टॅन होते. स्किन टॅन झाल्यावर फेशिअल करण्याशिवाय पर्याय उरत नाही. ब्यूटी पार्लरमध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा, आपण घरीच टोमॅटो आणि बटाट्याचा वापर करून स्किन क्लिन करू शकता (Facial at Home).

या दोन्हीतील गुणधर्म स्किनचे पोर्स क्लिन करतात. यासह टॅनिंग दूर करण्यासही मदत करतात (D-Tan Face Pack). पण स्किनसाठी टोमॅटो आणि बटाट्याचा वापर कशा पद्धतीने करावा? टोमॅटो आणि बटाट्याच्या वापराने स्किन क्लिअर होते का? टॅनिंग घालवण्यासाठी घरगुती फेशिअल कसे करावे? पाहा(Skin Whitening Tomato & Potato Face Pack - D'tan Face Pack at Home).

टॅनिंग घालवण्यासाठी टोमॅटो - बटाट्याचा सोपा उपाय

लागणारं साहित्य

पहिल्याच धुण्यात कपड्यांचा रंग फिका पडतो? तुरटीचा करा सोपा उपाय; कपड्यांचा रंग अजिबात जाणार नाही..

बेसन 

टोमॅटो

बटाटा 

अशा पद्धतीने तयार करा टॅनिंग रिमुव्हल क्रीम

सर्वप्रथम, टोमॅटो आणि बटाटा चिरून घ्या. मिक्सच्या भांड्यात टोमॅटो आणि बटाट्याचे तुकडे घालून पेस्ट तयार करा. एका बाऊलमध्ये एक चमचा बेसन आणि तयार टोमॅटो-बटाट्याची पेस्ट घालून मिक्स करा. अशा प्रकारे टॅनिंग रिमुव्हल क्रीम वापरण्यासाठी रेडी.

अशा पद्धतीने करा टॅनिंग रिमुव्हल पेस्टचा वापर

सर्वप्रथम, चेहरा स्वच्छ धुवून घ्या, सुती कापडाने चेहरा पुसून घ्या. नंतर तयार पेस्ट चेहऱ्याला लावा. जिथे टॅनिंग असेल तिथे आपण या क्रीमचा वापर करू शकता. क्रीमचा वापर करण्याच्या १५ मिनिटानंतर चेहरा सामान्य पाण्याने धुवून घ्या.

टोमॅटोचे स्किनसाठी फायदे

टोमॅटो फक्त खाद्यपदार्थांसाठी नसून, स्किनसाठीही याचा वापर करता येऊ शकते. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई आढळते. जे त्वचेच्या खोलवर काम करतात. यातील गुणधर्म मुरूम आणि सुरकुत्या दूर करतात. शिवाय टॅनिंगही दूर करतात.

उन्हाळा सुरु होताच डास सळो की पळो करतात? ५ घरगुती गोष्टी; डास घरात फिरकणार नाहीत

चेहऱ्यासाठी बटाट्याचा वापर

बटाटा प्रत्येक भाजीमध्ये फिट होतो, तसाच स्किनसाठी फायदेशीर ठरतो. बटाट्यामध्ये अँटी-एजिंग गुणधर्म आढळतात. ज्यामुळे स्किनच्या निगडीत बरेच समस्या दूर होतात.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्स