Join us

कोपर, मान, ढोपर, गुडघे दिसतात काळेकुट्ट ? १ घरगुती पॅक करेल जादू - काळवंडलेली त्वचाही दिसेल उजळ, चमकदार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2025 17:51 IST

how to whiten dark knees and elbows naturally : remove darkness from neck and elbows : home remedies for dark knees and elbows : मान, हाताचे कोपर, ढोपर आणि गुडघ्यावरील काळपटपणा घालवण्यासाठी घरगुती पॅक आहे फायदेशीर...

शरीराच्या काही भागाच्या त्वचेचा रंग असमान असतो. कुठे त्वचा फारच गोरीपान तर कुठे त्वचा अतिशय काळपट, काळवंडलेली दिसते. विशेषतः ही समस्या मान, कोपर, ढोपर आणि गुडघ्याच्या त्वचेवर दिसून येते. अनेकदा दुर्लक्षामुळे मान, कोपर, ढोपर गुडघे या भागातील त्वचा काळवंडते आणि कोरडी पडते. आपल्या इतर अवयवांचा रंग वेगळा असतो आणि हे भाग त्यापेक्षा जास्त काळे असतात(home remedies for dark knees and elbows).

अनेकदा आपण चेहऱ्याच्या सौंदर्याकडे अधिक लक्ष देतो, पण शरीराच्या काही भागांकडे जसे की मान, हाताचे कोपर, ढोपर आणि गुडघे याकडे दुर्लक्ष होते. या भागांवरील त्वचा काळवंडणे, कोरडी पडणे आणि जाड होणे ही एक सामान्य समस्या आहे. घर्षण, सूर्यप्रकाश आणि त्वचेची योग्य काळजी न घेणे यांमुळे हा काळेपणा वाढतो, ज्यामुळे त्वेचेच्या असमान रंगामुळे आपला आत्मविश्वास कमी होऊ शकतो. यावर घरगुती उपाय म्हणून आपण घरच्याघरीच एक खास घरगुती पॅक तयार करु शकतो. हा घरगुती पॅक एक नैसर्गिक क्लींजर आणि उत्तम एक्सफोलिएटर म्हणून काम करतो. हा घरगुती डेड स्किन काढून टाकतो, त्वचेला पोषण देतो आणि हळूहळू त्वचेचा काळवंडलेला रंग उजळवण्यास मदत होते. मान, हाताचे कोपर, ढोपर आणि गुडघ्यावरील काळपटपणा घालवण्यासाठी घरगुती पॅक (remove darkness from neck and elbows) कसा तयार करायचा याचे खास सिक्रेट पाहूयात. 

 मान, हाताचे कोपर, ढोपर आणि गुडघ्यावरील काळपटपणा होईल कमी... 

मान, हाताचे कोपर, ढोपर आणि गुडघ्यावरील काळपटपणा कमी करण्यासाठी घरगुती पॅक तयार करण्यासाठी, प्रत्येकी २ टेबलस्पून बेसन, हळद, इनो, खोबरेल तेल, लिंबाचा रस, कोमट दूध इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

हिवाळ्यात फुटलेल्या टाचांसाठी ६ घरगुती उपाय! भेगाळलेल्या टाचाही होतील मुलायम, सुंदर - वेदना, दुखणे होईल कमी... 

हा घरगुती उपाय नेमका आहे काय ? 

एका बाऊलमध्ये, बेसन घेऊन त्यात इनो, हळद, खोबरेल तेल, कोमट दूध घालून सगळे मिश्रण एकत्रित करून चमच्याने कालवून घ्यावे. काळवंडलेल्या त्वचेसाठी खास घरगुती पॅक तयार आहे.  

केसांतील डँड्रफ आणि खाज होईल गायब! ब्राह्मी तेलाचा असरदार उपाय - केस होतील लांबसडक, चमकदार...

हा तयार पॅक मान, हाताचे कोपर, ढोपर आणि गुडघे या भागातील त्वचेवर लावून हलकेच हाताने घासून त्या भागावर मसाज करावा. त्यानंतर ५ ते १० मिनिटे हा पॅक त्वचेवर तसाच लावून ठेवावा. मग पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. आठवड्यातून किमान २ वेळा हा उपाय करावा. या उपायामुळे मान, हाताचे कोपर, ढोपर आणि गुडघे यावरील काळपटपणा कमी होण्यास मदत होते. 

 हा उपाय कसा फायदेशीर...

१. बेसन :- बेसन नैसर्गिक एक्सफोलिएटर असल्यामुळे बेसन मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते आणि काळवंडलेला रंग उजळवण्यास मदत करते.

२. हळद :- हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक असतो, जो त्वचेचा रंग उजळवतो आणि हायपरपिग्मेंटेशन कमी करतो.

३. दूध :- दुधातील लॅक्टिक ॲसिड त्वचेला मॉइश्चराइझ करून मऊ करते आणि सौम्यपणे काळपटपणा दूर करते.

४. लिंबाचा रस :- लिंबामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म आहेत, जे त्वचेचा काळपटपणा जलद कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.

५. खोबरेल तेल :- खोबरेल तेल त्वचेला खोलवर पोषण देऊन कोरडेपणा कमी करते आणि त्वचेवरील रखरखीतपणा व काळपटपणा घालवण्यास मदत करते.

English
हिंदी सारांश
Web Title : Home remedy pack for dark elbows, knees, and neck unveiled.

Web Summary : Uneven skin tone, particularly on elbows, knees, and neck, can be improved with a homemade pack. This pack, made with besan, turmeric, and coconut oil, exfoliates dead skin, nourishes, and lightens dark patches. Regular use will reveal brighter, more even-toned skin.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय