Join us  

Skin Care Tips Winter Care : पिंपल्स, काळपटपणानं चेहरा खराब झालाय? फक्त दह्याचा असा वापर करून मिळवा सॉफ्ट, ग्लोईंग त्वचा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 11:46 AM

Skin Care Tips Winter Care : तुमच्या त्वचेचा रंग खराब झालाय आणि तुम्हाला चेहरा स्वच्छ करायचा असेल तर दही तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे.

सगळ्याच मुलींमुळे मासिक पाळीच्या आधी नंतर तोंडावर पुळ्या येण्याची समस्या उद्भवते. तर थंडीत त्वचा कोरडी होऊन काळपटपणासुद्धा येतो. जर तुमच्या त्वचेचा रंग खराब झालाय आणि तुम्हाला चेहरा स्वच्छ करायचा असेल तर दही तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण, यामुळे तुमचा रंग तर स्वच्छ होतोच, पण पिंपल्सपासूनही सुटका मिळते. या घरगुती फेस पॅकचा वापर केल्यानंतर, तुम्ही दररोज तुमच्या त्वचेच्या रंगात फरक पाहू शकाल. रंग उजळदार करण्यासाठी दही कसे वापरावं (Curd benefits for face)  ते जाणून घेऊया.

 

पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी हे ट्राय करा (How to remove pimples)

चेहरा उजळदार बनवणारा हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्ही  1 चमचा चंदन पावडर, बेसन आणि गव्हाचे पीठ, 2 चमचे दही मिसळावं लागेल. यासोबत थोडे गुलाबपाणी आणि अर्धा चमचा हळद घालून चांगली पेस्ट बनवा. फेसवॉश केल्यानंतर ही पेस्ट चेहरा आणि मानेवर जाडसर लावा. अर्ध्या तासानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. हा फेस पॅक आठवड्यातून 4 वेळा वापरा.

चेहरा उजळदार बनवण्यासाठी

सर्व प्रथम, 3 चमचे दह्यात 2 चमचे चंदन पावडर, 1 चमचे तांदळाचे पीठ आणि 1 चमचे गुलाबपाणी मिसळा. या सर्व गोष्टी नीट मिसळा आणि चेहरा आणि मानेला लावा. साधारण 20-25 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा आणि चेहरा पुसून मॉइश्चरायझर लावा. हे आठवड्यातून 3 वेळा करा. जसजसा तुमचा रंग स्पष्ट होईल तसतसे डागही दूर होतील आणि चमक वाढेल.

दह्यात कॅल्शियम , प्रथिनं आणि अनेक जीवनसत्त्वं असतात. तसंच त्वचेसाठी उपयुक्त ड जीवनसत्त्वंही दह्यात असतं. दह्यात असलेलं लॅक्टिक अँसिड त्वचेवरच्या सुरकुत्यांविरुध्द काम करतं. त्याचप्रमाणे त्वचा कोमलही करतं. दह्याचा वापर चेहेर्‍यावर केल्यास चेहेर्‍यावरची चमक वाढते. शिवाय मुरुम पुटकुळ्या त्यामुळे होणारी लालसर त्वचा या त्वचेशी निगडित समस्याही सहज सुटतात.

टॅग्स :त्वचेची काळजीब्यूटी टिप्सथंडीत त्वचेची काळजी