Join us  

ग्लोईंग स्किनसाठी कॉफी अन् गव्हाचा Anti Ageing फेस पॅक; फेशियलसाठी पार्लरला जाणचं सोडून द्याल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 1:01 PM

Skin care Tips : कमीत कमी खर्चात तुम्हाला ग्लोईंग स्किन, सुरकुत्या, निघून जाणं असे अनेक फायदे मिळतील.

ठळक मुद्देगव्हाचे पीठ एंटी-एजिंग गुणधर्मांनी भरलेले आहे. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही पीठापासून बनवलेला हा फेसपॅक नक्की वापरायला हवा.आपल्या त्वचेला उन्हापासून होणारं नुकसान दूर करण्यासाठी दूध हा एक उत्तम उपाय मानला जातो. त्यामध्ये उपस्थित लॅक्टोज त्वचेचा टोन हलका करण्याबरोबरच गडद डागही हलके करतात.

त्वचा ग्लोईंग, डागविरहीत दिसावी म्हणून आपण महिन्यातू दोन ते तीनवेळा पार्लर जाऊन पैसे घालवतो. नेहमीच पार्लरला जाण्यापेक्षा एखाद्यावेळी घरातल्या गुणकारी पदार्थांचा वापर तुम्ही त्वचेवर करू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळही लागणार नाही. कमीत कमी खर्चात तुम्हाला ग्लोईंग स्किन, सुरकुत्या, निघून जाणं असे अनेक फायदे मिळतील.

गव्हाचे पीठ केवळ आपल्या आरोग्यासाठीच नव्हे तर आपल्या त्वचेसाठी देखील चांगले आहे. विशेषत: पावसाळ्यात, आपल्या त्वचेची चमक वाढविण्यासाठी आणि वृद्धत्वाच्या साईन्स कमी करण्यासाठी आपण या पिठासह फेसपॅक बनवू शकता. कारण गव्हाचे पीठ एंटी-एजिंग गुणधर्मांनी भरलेले आहे. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही पीठापासून बनवलेला हा फेसपॅक नक्की वापरायला हवा.

साहित्य 

एक चमचा गव्हाचं पीठ

एक चमचा कॉफी पावडर

चार चमचे दूध

तयार करण्याची पद्धत

सर्व प्रथम, गव्हाचे पीठ आणि कॉफी पावडर चांगले मिक्स करावे. कारण गव्हाचे पीठ चिकट आणि कॉफी पावडर खडबडीत असते. त्यामुळे द्रव मिसळून त्यांना मिसळण्यात अडचण येऊ शकते. तर प्रथम या दोन गोष्टी मिसळा. आता गहू आणि कॉफी पावडरच्या मिश्रणामध्ये 4 चमचे दूध घालून पेस्ट बनवा.

ही पेस्ट चेहर्‍यावर आणि गळ्यावर लावा आणि हलक्या हातांनी गोलाकार मसाज करा.आपल्याला ही मालिश किमान 5 मिनिटे करावी लागेल. यानंतर हा पॅक कोरडा  होईपर्यंत राहू द्या. 10 मिनिटांनंतर आपण ताज्या पाण्याने धुवा आणि ते स्वच्छ करा.  नंतर आपल्याला  त्वचेवर एक खास स्वच्छता आणि मऊपणा जाणवेल.

फायदे

गहू तेलकट त्वचेची समस्याच दूर करत नाही तर मुरुम आणि त्याचे डाग कमी करण्यासही मदत करतो. हा पॅक त्वचेची पोत सुधारतो आणि त्वचा घट्ट करतो.

कॉफी हा खूप चांगला एक्सफोलेटर मानला जातो. त्यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडेंट मृत पेशी काढून नवीन पेशी बनविण्यास मदत करतात. हे आपल्या त्वचेवर जमा होणारी घाण काढून टाकते.

आपल्या त्वचेला उन्हापासून होणारं नुकसान दूर करण्यासाठी दूध हा एक उत्तम उपाय मानला जातो. त्यामध्ये उपस्थित लॅक्टोज त्वचेचा टोन हलका करण्याबरोबरच गडद डागही हलके करतात.

गव्हाचे पीठ, दूध आणि कॉफी पावडरपासून बनविलेले हे फेस पॅक आपल्या त्वचेवर स्क्रब आणि एक्सफोलीएटर म्हणून देखील कार्य करतो. जर आपण आपल्या तोंडावर नको असलेले केस जास्त असतील  या पॅकमुळे केस निघून जाण्यासही मदत होईल. 

संपूर्णपणे घरगुती पदार्थांपासून बनविलेला हा पॅक आपल्या डोळ्याभोवती तयार झालेले डार्क सर्कल्स आणि बारीक रेषा काढून टाकण्यास देखील फायदेशीर आहे. या पद्धतीने आठवड्यात ३ ते ४ वेळा या पॅकचा वापर कराल तर नक्कीच फरक जाणवेल. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी